'शंभरावं स्थळ' | 'Shambharave Sthal' | Dir.: Bansidhar Kinkar | Cast : Deepti Devi, Chinmay Udgirkar

'Shambharave Sthal' is a story of unplanned first meeting of eligible bachelor boy and girl in their late twenties, pressurised by their parents to get married & settle down.
Aadi Nirmitee in association with SNC Landmarks Presents,
'Shambharave Sthal'
Produced by
Gaurav Shah (SNC Landmarks)
Written & Directed by
Bansidhar Kinkar

Пікірлер: 2 200

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 Жыл бұрын

    In 29 minutes this Movie narrated what a 3 hr movie can not.....simply superb and mature handling... Deepti Quite subdued performance....highly expressive..last frame in the lift is a Cutest scene

  • @sachinshinde793

    @sachinshinde793

    Жыл бұрын

    true

  • @jaideepvaish

    @jaideepvaish

    Жыл бұрын

    Nothing more can agree

  • @pypycodes

    @pypycodes

    Жыл бұрын

    +1

  • @user-ps4jo1ui2t

    @user-ps4jo1ui2t

    Жыл бұрын

    Ho

  • @rupeshghorpade1977

    @rupeshghorpade1977

    10 ай бұрын

    Nowadays Girl's are becoming to arrogant. They never thinks about other family members . They seems that husbands Father and mother are the garbage including others members.

  • @sandeepparulekar8747
    @sandeepparulekar8747 Жыл бұрын

    फक्त अप्रतिम हाच शब्द योग्य वाटतो. चिन्मय आणी अनुजा दोघांचा अभिनय सहजसुंदर नैसर्गिक पातळीवरचा आहे. कॅमेरा, डायरेक्शन,नेपथ्य कौतुकास्पद. सगळ्यांचे अभिनय खुप छान.

  • @hemdivad7225
    @hemdivad72254 ай бұрын

    Khup Chan! I feel that Anuja learned about herself more from Chinu. She realized that he truly understands her! Her dedication towards her career. And he didn't try to change her in anyway. He accepted that they both are different and want different things from life. Maybe that's what gave Anuja the confidence to trust him and say yes. I feel we all smiled when Anuja smiled in the last shot. It would be interesting to watch how will two individuals who want different things in life become life partners! Please make a series with not just part 2 but many more parts. Excellent acting, clean direction and thoughtful writing.

  • @sanciacolaco9075

    @sanciacolaco9075

    7 күн бұрын

    Yes

  • @santoshwalke2747
    @santoshwalke2747 Жыл бұрын

    सर्वउत्कृष्ट मराठी सिनेमा मला हि मूव्ही मनापासून खुप खुप आवडली जगातील सर्व अवार्ड माझ्या तर्फे या मूव्हीला आर्पन 🏆

  • @tejaswarghade9540
    @tejaswarghade9540 Жыл бұрын

    Her smile at the last tells everything 🤩 Perspective can be changed at the end for that we have to understand each other feelings, emotions and values. Amazing movie 😍

  • @anjalibarve6672

    @anjalibarve6672

    Жыл бұрын

    Amazing movie beautifully taken Chinmay is a sooper actor dialogues crisp and to the point nice experience

  • @surveyorvaibhavsawarkar403

    @surveyorvaibhavsawarkar403

    11 ай бұрын

    Ashech barbad hotat sadhe bhole lok.

  • @prasadzende6209

    @prasadzende6209

    11 ай бұрын

    p​pp0:14 lp

  • @njnamaste20

    @njnamaste20

    6 ай бұрын

    Correct!! She is egoistic 😅😅

  • @swatiwaghmare760

    @swatiwaghmare760

    5 ай бұрын

    ​@@surveyorvaibhavsawarkar403😮😮

  • @amolgawale7070
    @amolgawale70704 ай бұрын

    जो पर्यंत आपण दुसऱ्याला भेटत नाही,जाणून घेत नाही तोपर्यंत आपले विचारांचं काहूर,आपला दृष्टिकोन आपल्याला सर्वोच्च वाटत राहतो. पण थोड्या वेळेसाठी सुध्दा आपण दुसऱ्याच्या संपर्कात आल्यावर आपण आपल्याला नव्याने जाणून घेऊ शकतो,आपली निरर्थक भिती निघून जाते.खूपच छान मूव्ही.....प्रेमात पडायला लावते.❤️

  • @aditioak2683

    @aditioak2683

    3 ай бұрын

    अगदी perfect.. 😊

  • @shilpa4881
    @shilpa4881 Жыл бұрын

    The way he describes his memories of her at school and college, tells he already liked her. But he was avoiding to say "yes" to proposal to save her career and future obstructions. He becomes ready to say "Yes" through his mother and take "No" from her,which actually is offending. But he is not only big hearted but is in real love and respect with her. As she realises this she nods "No" to say no. That is she says yes to this 100 the proposal.

  • @rs-xl9eg
    @rs-xl9eg Жыл бұрын

    फारच छान. आज youtube वर शेकड्यांनी शॉर्ट फिल्म उपलब्ध आहेत पण अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच छान आहेत त्यातलीच ही एक. दोघांचा सहजसुंदर अभिनय व संवाद, सर्वच कसे व्यवस्थित जुळून आले आहे.

  • @guruprasadjoshi5644
    @guruprasadjoshi5644 Жыл бұрын

    सर सिरीज संपूच नये असे वाटते तिचे शेवटच्या मिनिटात ले expression सर्व काही सांगून जातात. दोन्ही फॅमिली पण मस्त.. खूप खूप शुभेच्छा.. पुढील भाग आला तर खूप आनंद होईल.. कोणत्याही घाणेरड्या शिव्या, कारस्थाने न करता पण चांगल्या फिल्म्स करू शकता तुमच्या पूर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन

  • @sheetal9858

    @sheetal9858

    2 ай бұрын

    Yes, please release the 2nd part also 😍

  • @SwatiMhatre-br1ws

    @SwatiMhatre-br1ws

    2 ай бұрын

    4​@@sheetal9858

  • @richakulkarni2022
    @richakulkarni2022 Жыл бұрын

    विषय व मांडणी उत्तम.. खूप छान झालीय फिल्म... चिन्मयनी किती सहज सुंदर केलंय काम... पूर्ण टीमचं अभिनंदन! गाण्यामुळे आणखी मजा आली... waiting for the next part ... Best wishes Bansi !!

  • @amitasovani151

    @amitasovani151

    Жыл бұрын

    Atishay sunder nemkya bhavana yogy shabd sunder abhinay

  • @atharvjoshi.5495

    @atharvjoshi.5495

    Жыл бұрын

    Ya same here 😊

  • @adityashastri6843

    @adityashastri6843

    Жыл бұрын

    Wow ... Song superb

  • @vijayadhamdhere7944

    @vijayadhamdhere7944

    Жыл бұрын

    फिल्म पाहून झाल्यावर वाटल कमेंट तर करायलाच हवी...तुमची कमेंट वाचली ... अगदी तंतोतंत हेच तर ते शब्द...खुपचं छान 👌👌👍

  • @pratikmahajan403

    @pratikmahajan403

    Жыл бұрын

    Kharach sundear chinmay

  • @apurvakulkarni7581
    @apurvakulkarni75818 күн бұрын

    अनुजा ने एक तिच्या बाबत नवा दृष्टीकोन ऐकला. आणि तिला चिन्मय ची विचारांची प्रगल्भता दिसून आली. आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा दोघांच्याही भिन्न आहेत मात्र चिन्मय ला हे समजलय तर अनुजा ला नाही. दोघेही बरोबर आहेत फक्त जेव्हा तिला पटल ती खुलते तिला सखा हा शब्द माहित आहे अर्थाचा उलगडा आता झाला …. खूप कमी शब्दात जास्त परिणामकारक❤

  • @GauravRane02121989
    @GauravRane02121989 Жыл бұрын

    Very nicely shown current people's thinking about marriage as practical/materialistic partnership rather than hunt for soulmate. Thank you for making such a wonderful film.❤

  • @shilpavast5919
    @shilpavast5919 Жыл бұрын

    आजच्या तरुण पिढीचे एकदम परफेक्ट निरीक्षण.... महत्त्वाचा विषय सुयोग्य पद्धतीने पोहोचवल्या बद्दल पुर्ण टीम चे अभिनंदन आणि आभार ❤️ फिल्म बघताना खरंच मज्जा आली👍

  • @GoodStoryWellTold
    @GoodStoryWellTold Жыл бұрын

    कुठेही सिने मॅटिक न वाटणारी सहज सुंदर गोड अनुभव ----- मनःपूर्वक अभिनंदन संपूर्ण टीम चे

  • @surajsartape1350
    @surajsartape13508 күн бұрын

    असे विचार खरंतर लवकर जुळत नाहीत तरी ही आपल्याला भावनिक आणि संवीधीनशील बनवण्यासाठी फक्त हे छान आहे.

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye166926 күн бұрын

    छान फिल्म. हल्ली मुलांचं लग्न जमणं खूप कठीण झालं आहे. झालंच तर टिकणं कठीण झालं आहे.सर्वच कलाकारांचे रोल्स खूप छान.अभिनयही छान. सर्व कलाकार आणि टीमचंही मनःपूर्वक अभिनंदन .- सौ. मेघना लिमये.🎉

  • @truptikharote749
    @truptikharote749 Жыл бұрын

    अनु त्याच्या प्रेमात पड़न आणि त्याच क्षणी फ़िल्म बघनारा अचानक त्या फ़िल्म च्या लास्ट सीन च्या ऊँचीला समजन , परफेक्ट जमलय फ़िल्म मेकर ला , इतक साधे पणाच सुंदर स्क्रिप्ट कल्पकतेने मांडलय ।।। 👌

  • @sohampuranik933
    @sohampuranik933 Жыл бұрын

    थोड्या वेळातही इतकी सुंदर गोष्ट,वास्तव दाखवता येते याचे उत्तम उदाहरण! खूप आवडलं.

  • @user-fu3ib3wb7t
    @user-fu3ib3wb7t3 ай бұрын

    Wah..wah..What a story.!! सहजसुंदर अभिनय, नाजूक कथा. परंतु गौतम गंभीर विषय..😊🎉🤞

  • @snehalmaknikar9671
    @snehalmaknikar9671 Жыл бұрын

    This is so beautifully done. Can't wait to see more from the writers, directors, and lead actors of this piece. More power and luck.

  • @shivanieranade3748

    @shivanieranade3748

    7 ай бұрын

    Not at all. Such a boring film, they would have gotten a better actor instead of Deepti Devi

  • @vshiwalkar
    @vshiwalkar Жыл бұрын

    खुप छान.. दुसरा भाग नक्की आणा.. पुढे काय होते हे बघायची आतुरता आहे..

  • @vijaykalekar6434

    @vijaykalekar6434

    Жыл бұрын

    Yes

  • @nehasawant4794

    @nehasawant4794

    Жыл бұрын

    Yes

  • @bhagyashreevd

    @bhagyashreevd

    Жыл бұрын

    Yes

  • @jyotikharbe2732

    @jyotikharbe2732

    Жыл бұрын

    Yes

  • @smiley1409

    @smiley1409

    Жыл бұрын

    There is no second part. This story is complete. They got married and lived happily ever after 😊

  • @dnyaneshwarpawar2892
    @dnyaneshwarpawar2892 Жыл бұрын

    नाकारातून सुद्धा होकार दिला . आवडली कथा आणि अभिनय,

  • @ashisharav
    @ashisharav Жыл бұрын

    टिचा Focus आता तुज्या वर आला आहे.. आणि शेवट् जाताना ती नाही म्हटलिंये.. गेला आता 😃😃 काही खर नाही रे बाबा आता तुझ.. मस्त खूपच सुन्दर..

  • @anandb5036
    @anandb5036 Жыл бұрын

    अतिशय सुंदर कलाकृती.... विषय अगदी उत्तम रित्या हाताळलेला आहे. Arrange marriage च्या विषयाच्या माध्यमातून नकार म्हणजे प्रत्येक तरुण तरुणीने अनुभवलेले सत्य ( तो मिळाला तर वाईट वाटते हे नक्की...) किती सकारात्मकतेने हा नकार मांडला आहे या कलाकृतीतून.... अहहा.... "आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा" इतक्या सहजतेने नकार देताना चिन्मय ने सांगितला आणि अनुजा ला तो इतका भावला की नकळतपणे तिचा होकार प्रेक्षकांना मनापासून आवडला असे वाटते... उत्तम संवाद, उत्तम विषय, उत्तम direction.... थोडक्यात अगदी कमी वेळेत आभाळभर ज्ञान देणारी छोटी गोष्ट ... सर्व टीम चे अभिनंदन ... --- बी.आनंद

  • @ganeshmudegaonkar
    @ganeshmudegaonkar Жыл бұрын

    दुष्टिकोन.. हाच तर लागतो.. ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी.. उत्तम कलाकृती. खूप शुभेच्छा..!!

  • @purnimamuranjan4462
    @purnimamuranjan4462 Жыл бұрын

    खूपच सुंदर कलाकृती...अभिनय सुंदर...background गाणे तरल ...मोरपिसासारखे

  • @UnbrokenExploration
    @UnbrokenExploration Жыл бұрын

    ह्याच मुळे मला मराठी चित्रपटसृष्टी आवडते

  • @liveshow2230
    @liveshow2230 Жыл бұрын

    किती सुंदर... फक्त एकच शब्द... अप्रतिम कलाकृती

  • @sumanmahajan1127
    @sumanmahajan1127 Жыл бұрын

    उत्तम फिल्म.सगळ्यांचे काम खुप सुंदर. दिप्ती आणि चिन्मय खुप गोड. God bless you all. all teamमनापासून धन्यवाद,अप्रतिम कलाकृती दिलीत. 🙏

  • @adv.chandrashekharathalye2601
    @adv.chandrashekharathalye2601 Жыл бұрын

    बन्सी, कथानक एकदम मस्त ,आणि या कथानकासाठी निवडलेले कलाकार एकदम मस्त, सहज आणि सुंदर अभिनयमुळे तुझ्या कथानकाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला , ग्रेट,तुझ्याकडून अश्या दर्जेदार लघु चित्रपटाची निर्मती होवो ही अपेक्षा आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा,💐

  • @hvk5179
    @hvk51798 ай бұрын

    सकाळपासूनच खूप वेळा शेवटचं 10 मिनिट पाहत आहे, दीप्ती देवी, चिराग ने जीव ओतला आहे त्यामध्ये. दीप्तीचा डोळ्याने जे केलं आहे, मस्तच

  • @poeticworm97

    @poeticworm97

    4 ай бұрын

    दिप्तीच्या डोळ्यांनी नाळ च्या पहिल्या भागाच्या शेवटच्या १०-१५ मिनिटांत जे काही केलंय..अद्भुत !!

  • @Vyankatesh13datar
    @Vyankatesh13datar Жыл бұрын

    फिल्म खुप छान झालीय, फॅमिलीसह बघितली. सर्वांची एकंच प्रतिक्रिया: क्या बात है 👌

  • @prakashgavankar9040

    @prakashgavankar9040

    Жыл бұрын

    खूप सुंदर फिल्म 👍👍❤️💐💐

  • @sandeshmanedeshmukh3749
    @sandeshmanedeshmukh3749 Жыл бұрын

    खुप सुंदर सर्वांची कलाकारी होती. नकळत वाहत गेलो शेवटपर्यंत..... खूप छान वाटलं...

  • @vaishalipisolkar4676
    @vaishalipisolkar46767 күн бұрын

    पुढील भाग लवकर घेऊन या, खूपच छान आहे 👌🏻👌🏻❤️😊

  • @gajanandhore8621
    @gajanandhore8621 Жыл бұрын

    फारच छान.आताच्या पिढीतील भावना खूपच छान सादर केल्या आहेत.....

  • @seemakamble9522
    @seemakamble9522 Жыл бұрын

    अतिशय वास्तववादी लघुचित्रपट 👏🏻 सर्वांचा अभिनय एकमेकांना हवा तसाच पूरक ! दीप्ती न् चिन्मय अतिशय संयत , controlled भावभावनादर्शन 👌 गाणं सुरू होता होता दीप्तीची भावमुग्धता आणि बॅकग्राऊंड ला चिन्मयचा लाजवाब मुद्राभिनय 👏🏻एकंदरीतच सुखानुभूती ! Hats off captain of the ship & co-sailers 👌🏻नक्कीच पुढचा project मनमोहक होणार 😊 त्यासाठी सगळ्यांना च शुभेच्छा 🙏🏼

  • @shyamsawant6251

    @shyamsawant6251

    Жыл бұрын

    are waiting for next part yaar.....yaylach पाहिजे next part

  • @tanujajavdekar5714
    @tanujajavdekar5714 Жыл бұрын

    दीप्ती, चिन्मय acting best 👍. गाणं अगदी soulful आहे. पूजा ची छोटीशी भूमिका एक नवी सुरुवात आहे

  • @HusenMochi
    @HusenMochi Жыл бұрын

    अगदी मनाला स्पर्श करणारा संदेश♥️💔🤍🛐🙌🙌🙏खूप आनंद झाला जेंव्हा हा video पूर्ण पाहिलं 🚩🤍🤍🤍next episode कधी येणार?

  • @deepakgaikwad5632

    @deepakgaikwad5632

    10 ай бұрын

    नकी छान होता

  • @rk_dexter1299
    @rk_dexter1299 Жыл бұрын

    Expect the unexpected!! What an amazing Short Film 💙... Amazing just amazing!! 🙌 That smile and the song in the end will remain in my heart rent free for ages... Kudos to all crew members 🤗😍

  • @amrutdharmadhikari5159
    @amrutdharmadhikari5159 Жыл бұрын

    अप्रतिम कथा लेखन!! उत्तम सादरीकरण!!... अत्यंत संयुक्ततीक गीत.... एकूणच खूप छान मनाला भावणारी.. कमी वेळात, भाव पोचवणारा लघु चित्रपट...😊👌👍... खुप शुभेच्छा!!!

  • @tanujajavdekar5714
    @tanujajavdekar5714 Жыл бұрын

    खूपच अप्रतिम कलाकृती.. किणीकर sir congratulations 🎉. आशय खूपच चांगल्या प्रकारे व्यक्त झालंय. नवीन पिढीच्या point of view नी तर बेस्टच 👍👍

  • @shrirampanchal3262
    @shrirampanchal3262 Жыл бұрын

    अप्रतिम लघुचित्रपट आहे हा.....अत्यंत कमी वेळात सुंदर सादरीकरण आहे

  • @dipaliambekar2221
    @dipaliambekar2221 Жыл бұрын

    शेवटच गीत...हृदयस्पर्शी... All characters perfect.... Soo super.... Movie.... Watching in short time first.... ✌😊❤ Tnx a lot all team work

  • @pratikkalbhor8285
    @pratikkalbhor8285 Жыл бұрын

    जीवनातील अगदी महत्वाचा विषय व मांडणी उत्तम.. खूप छान झालीय फिल्म... अभीनंदन ईशानी 👌

  • @arpitasadhale2294
    @arpitasadhale2294 Жыл бұрын

    खूपच सुंदर. काळाची गरज असलेली फिल्म. सगळ्या उपवर असलेल्यांनी आणि पालकांनी बघावीच.

  • @nskumar532
    @nskumar5322 күн бұрын

    खूप सुंदर..... सहज सुंदर अभिनय.... दोघांचाही... व इतरांचा ही... सुंदर teamwork

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR10 ай бұрын

    अप्रतिम लघुपट, सर्वांचाच सहजसुंदर अभिनय, अतिशय नैसर्गिक वातावरण निर्मिती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एरवी ३ तास जे कथानक उगाचच लांबण लाऊन सांगितले जाते, ते अतिशय सुंदर पद्धतीने अर्ध्या तासातच मांडले आहे. 👌👌👌👌👌👏👏👏👏👏 🙂 🙂 🙂

  • @dilipshah6013
    @dilipshah6013 Жыл бұрын

    हल्ली मोठ्या शहरात मिळनारे मोठे पगार.महगाई मुळे संकुचीत होत चालेली मन. प्रत्येकाचा जीवना बदलचा विचार .बरेच कांही थोडक्यात लक्षात आणुन देणारे प्रयत्न.

  • @gigglygirl2099
    @gigglygirl2099 Жыл бұрын

    Part 2 apekshit.....❤️❤️❤️❤️❤️

  • @mhatreajit2547
    @mhatreajit2547 Жыл бұрын

    दुसरा भाग पाहिजेच 👌

  • @ajaymore8061
    @ajaymore8061Күн бұрын

    कितीही वेळा बघा नेहमी नवा अनुभव.... ❤❤❤

  • @vaidehikotasthane5393
    @vaidehikotasthane5393 Жыл бұрын

    सध्याच्या ज्वलंत विषयावर आधारित कथानक आवडले. मुली आत्मनिर्भर बनताना जोडीदाराच्या अभावी एकट्या पडताहेत. व्रुध्दपणी रिलेशनशिप साठी पेपरमध्ये जाहिराती देताहेत. त्याला चांगली चपराक आहे. इगो दुखावला गेला की आपोआपच मुली आत्मपरिक्षण करु लागतील.एक प्रकारची ही जनजागृती आहे विवाहसंस्था टिकण्यासाठी. धन्यवाद. फिल्मचे फिनिशिंग उत्कृष्ट आहे. शुभेच्छा👍

  • @sandhya_vp

    @sandhya_vp

    Жыл бұрын

    मुलींनी आत्मनिर्भर बनणे ही समाजाची गरज आहे... आज प्रत्येक प्रत्येकाला वैयक्तिक लेवलवर प्रगती करावीशी वाटते जेणेकरून आपण कुठे कमी पडू नये आपल्या सर्व सुख सोयी आणि . गरजा पूर्ण करता यावा मग तू मुलगा असेल किंवा मुलगी.. उदाहरण ह्या सिरीज च बघता , आज तिने जास्त प्रगती केली आहे म्हणून त्याने नकार दिला... म्हणजे बघा समाज या दृष्टीनेही बघतो की आज मुलींने एवढी प्रगती केली म्हणजे ती नक्कीच घमंडी आणि तिला नातं कुटुंब याबद्दल काही भावना नसेल... मुलांचाही इगो आड येतो जेव्हा उच्चशिक्षित आणि सेम लेवल ची मुलगी पार्टनर म्हणून निवडताना... मुली त्यांच्या इगो मुळेच हे सर्व करतात. हा दृष्टिकोन खूप चुकीचा आहे

  • @somesh64

    @somesh64

    Жыл бұрын

    @@sandhya_vp मुळात नकार नव्हताच तो

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 Жыл бұрын

    खूप छान. खूप आवडली. सुरेख नीटस मांडणी. अभिनंदन संपूर्ण टीमचे

  • @prasadratnaparkhi3910
    @prasadratnaparkhi3910 Жыл бұрын

    आपल्या अंतर मनात इतके विषय सुरू असतात ना की समोर असलेली चांगली संधी आपण गमावून बसतो. आज arrenge marriage म्हणजे असं झालं ना अपेक्षांचा डोंगर पार करावा लागतो. मुलीच्या अपेक्षा वेगळ्या.. आई वडिलांच्या अपेक्षा वेगळ्या.. नातेवाईकांना काय वाटेल..!! अहो आपण लग्न कशाला करतो हेच समजत नाहीये..! या शॉर्टफिल्म ने या विषयाला खूप छान आणि सुंदर पद्धतीने मांडलेलं मला खूप आवडलं. आणि हो निक्किच प्रत्येक आईवडिलांना पण आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्या ची काळजी असते म्हणून ते सुद्धा चांगल्या स्थळाबद्दल आग्रही असतात. खुप छान पुढच्या भाग नक्कीच बघू. धन्यवाद!👌👌👌 ⭐⭐⭐⭐⭐

  • @ruchadharangaonkar1586
    @ruchadharangaonkar1586 Жыл бұрын

    कित्ती गोड अणि सुंदर गोष्ट 👌👌😀

  • @nareshdev4119
    @nareshdev4119 Жыл бұрын

    Although I am a non-Marathi, I really loved this outcome from all angles. Rejection in life is really difficult to grasp, but endurance is the best remedy. Characterization of parents was really marvelous. Although Anuja's characterization for excellent, Chinma got 99.9% marks. Overall entertainment and a lesson of life that rejecting and being rejected should never be spontaneous, and strength is the best solution to move with life. Thanks for this nice movie. Time wasool indeed!

  • @mobalasahebthombare9278
    @mobalasahebthombare9278 Жыл бұрын

    होकार आणि नकार...इतकी सुंदर मांडणी होऊ शकते याचं उत्तम उदाहरण..🙏 ❤️💫💯

  • @vishalniungare4428
    @vishalniungare4428 Жыл бұрын

    प्रत्येकच्या आयुष्यातील हा क्षण .... हलकी फुलकी गोष्ट... गोष्टींची मांडणी सरळ सध्या पद्धतीने केलेली... लेखन , संवाद बेस्ट 👌

  • @prashantragir9678
    @prashantragir9678 Жыл бұрын

    खूप सुंदर... सुरुवातीला तिचा रागच येतो तो स्वभाव पण शेवट सर्व अगदी मनासारखेच घडले👌👌😍

  • @rajukhandalkar1085
    @rajukhandalkar1085 Жыл бұрын

    फिल्म खूप छान आहे. विषय खूप गहन आहे. सध्याच्या परिस्थितीत अतिशय relevant आहे. फक्त climax रोमँटिक व आदर्श वाटला तरी जरा पटत नाही. त्या मुलीला ते झेपेल का असे वाटते. अतिशय सुंदर कलाकृती. सर्व कलाकारांचे अभिनंदन.

  • @dilipjoshi6574

    @dilipjoshi6574

    Жыл бұрын

    ती बदलेल बऱ्यापैकी अशी आशा ठेवू या शेवटी लग्न हा जुगार आहेच पण हल्ली एकुलत्या एक मुलांचे आईवडील काळजीत पडलेत हे मात्र सत्य😂

  • @anitasoman4502
    @anitasoman4502 Жыл бұрын

    मुलगी arrogant आहे. ती जेव्हा नकार देते तेव्हा काही वाटत नाही. पण स्वतःला आलेला नकार पचवू शकत नाही. "वर तू मला होकार दे म्हणजे मला Satisaction की मला Zero Rejections आहेत". असे सांगते. म्हणजे मग ही त्याला नकार देणार. हे विचारच विचित्र आहेत.

  • @sanhitakelkar3691

    @sanhitakelkar3691

    Жыл бұрын

    100% correct this behaviour is very wrong and egoistic and many times parents r responsible for this who don't show mirror to their children to self reflect

  • @shundi5

    @shundi5

    Жыл бұрын

    असल्या मुली पुढे भारी पडतात संसारात

  • @mystyle123go

    @mystyle123go

    Жыл бұрын

    mulgi arrogant ahe. pan tyach kay

  • @mystyle123go

    @mystyle123go

    Жыл бұрын

    @@shundi5 apan kashasati ahot. shiv parvati

  • @dilipjoshi6574

    @dilipjoshi6574

    Жыл бұрын

    अहो तुम्ही शेवटपर्यंत बघा ना तीच्या तील बदल तिचा चेहरा च सांगतोय आणि काय हवं उलट आधी मुलगा सर्व क्लिअर करतोय की पुढील भेटीला अजून क्लिअर करेल ही शॉर्ट फिल्म आहे किती दाखवतील 🙂🙏 बघा पटतंय का

  • @madhu7087
    @madhu70878 ай бұрын

    In this case Chinmay deserves some1 else who will respect his thoughts and his emotions. ❤❤ Khup chan hoti film, aani acting saglyanchi best hoti ❤❤

  • @sunandabhosalepatil9171
    @sunandabhosalepatil9171Ай бұрын

    अतिशय ह्रुदयस्पर्शी कथा

  • @sanjaybharamgondapatil4729
    @sanjaybharamgondapatil472911 ай бұрын

    मस्त विषय, उत्कृष्ट मांडणी, मनाला भिडणारी मुव्ही...सर्व टीमचं अभिनंदन

  • @rajashrirote3857
    @rajashrirote3857 Жыл бұрын

    श्री.किंकर यांच्याच शब्दात सांगायचं तर....It's amazing!

  • @sunilmirashi1720
    @sunilmirashi1720 Жыл бұрын

    खूप दिवसांनी काही चांगलं पाहिल्याचे समाधान मिळाले .....सगळी भट्टी चांगली जमली आहे reject करण्यासारखं काहीच नाही. तुम्हा सर्व टीमला मनापासून दाद व पुढील वाटचालीस शुभेच्छा. प्रेक्षक वर्गाकडून काही विशेष अपेक्षा असेल तर कळविणे. Be Good Do Good God Bless you all

  • @pallavideshpande2214
    @pallavideshpande2214 Жыл бұрын

    Very realistic and now a days we can see such cases around us ....Todays generation view about arrange marriage is arranged means complecation...you have perfectly represented real life situations in the movie... eagerly waiting for the next part 👌👍

  • @jdevdatta16123
    @jdevdatta161234 ай бұрын

    मी आता गेल्या आठवड्यात हे फिल्म पाहिली आणि पाठोपाठ तीन वेळा पाहिली. खरं सांगायचं तर एवढं सगळं उत्कृष्ट आहे की मन तृप्त होतच नाही. आपल्या सर्वांचे अभिनंदन आणि एवढ्या उत्कृष्ट सादरीकरणात बदल आपल्याला धन्यवाद.

  • @anandindiaus
    @anandindiaus Жыл бұрын

    खरंच खूप काही शिकण्यासारखं होतं माझ्यासाठी काही क्षण माझ्या आयुष्यातलेच वाटले 💗

  • @curiousmind777
    @curiousmind777 Жыл бұрын

    A different kind of film...touches the heart! Great performances. Must watch with family!

  • @amitabandivdekar8661
    @amitabandivdekar86612 ай бұрын

    आजच्या जनरेशन मध्ये हा कळीचा मुद्दा.. खुप छान मांडला आहे.

  • @jamesT008
    @jamesT008 Жыл бұрын

    Surely this is "Unmatched" couple..deepti is too much dominating while chinmay is ground to earth

  • @amitkumarhatunje6256
    @amitkumarhatunje6256 Жыл бұрын

    जबरदस्त. आमच्या कोल्हापूरच्या भाषेत सांगायचं, तर एकदम 'नाद खुळा' 'काटाकिर्र' 'जबराट' वगैरे वगैरे वगैरे 😊

  • @nilc7836
    @nilc7836 Жыл бұрын

    अप्रतीम खूप छान. खूप वर्षांचा अनुभव असलेल्या एका डायरेक्टरने ही फिल्म केलेली असावी असे वाटते 👏👏💐 Best of luck for the upcoming 👍

  • @seemakamble9522

    @seemakamble9522

    Жыл бұрын

    खरंच कुठेतरी गुलजार साहेबांची व्यक्त अव्यक्त अशी झलक जाणवते ...

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 Жыл бұрын

    केवळ अप्रतिम ! फिल्म आवडली. चिन्मयची भूमिका किती सहजसुंदर वाह...! तरुणाईला बोध व्हावा...

  • @vibhavarikulkarni2231
    @vibhavarikulkarni2231 Жыл бұрын

    खूप प्रगल्भ अभिजात सकस दर्जेदार आशयघन निर्मिती 🙏🙏🙏🙏🙏🙏 खूप धन्यवाद. ही सीरीज बघायला आवडेल.

  • @nikhilsapre5562
    @nikhilsapre5562 Жыл бұрын

    very different Fabulous short story

  • @deepakarekar1895
    @deepakarekar1895 Жыл бұрын

    Sundar, Vastwatil Katha... Khup Chhan. Waiting for Next Part...

  • @Dvolume
    @Dvolume4 ай бұрын

    आज पहिल्यांदाच ही स्टोरी बघितली.... खुप छान वाटलं की असे पन थॉट्स आजकालच्या पीढ़ी मधे बघायला मिळतात...नक्कीच याचा जर एक्सटेंडेड एपिसोड बनवला तर आवडेल लोकांना.

  • @jayashrikulkarni8934
    @jayashrikulkarni89343 ай бұрын

    सध्याच्या धकाधकीच्या जीवनात दोघांनी ही एकमेकांना पूर्ण समजून घेतलं ,तर योग्य निर्णय घेण्यास खूप मदत होते आणि पुढील गोष्टी सहज सोप्या होत जातात.... खूपच छान कथानक , केवळ 30 मिनीटात प्रेक्षकांच्या मनात शिरण्याची जबरदस्त ताकत....!!!!

  • @dr.aditimangsuli7111
    @dr.aditimangsuli7111 Жыл бұрын

    खूप छान फिल्म. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत सगळेच मस्त जमले आहे.....👌👌 Waiting for many more in future.

  • @appasahebs.jagtap2672
    @appasahebs.jagtap2672 Жыл бұрын

    अनुजाची लिफ्टमधील "लास्ट पाॅझीटिव्ह रिअॅक्शन"....🙋

  • @ashwin0044
    @ashwin0044 Жыл бұрын

    किती सुंदर आणि मनमोहक बनवला आहे लघुपट!!! चिन्मय विचारांनी किती परिपक्व आहे हे फार योग्य आणि मस्त शब्दात त्यांनी मांडले आहे... त्याचे किती किती प्रेम असते तिच्यावर हे त्याच्या विचारातून दिसून येत... फार आवडली त्याची acting... त्याचे आई वडील, आजी, ती मुलगी आणि तिचे आई वडील व बहीण ह्यांचे रोल पण अगदी लक्ष्यात राहतात.. hats off to Director!! अतीमंतः, अनुजा विषयी.. फार हुशार, बुद्धिमान, गर्विष्ठ, तरी प्रेमळ (वडिलांना वडीलकी भावनेने गोड ख्यायला सक्त ताकीद देते) ही भूमिका तिने अगदी छान पर पाडली आहे!! आणि जेव्हा तिला त्याचे विचार, आचार, त्यांच्या छोट्याश्या संभाषणातून कळतात , तर ती झटकन त्याच्याशी लग्न करण्याचं निर्णय घेते (मनातून) त्याला ते कळत नाही.. शेवटी लिफ्ट मध्ये दरवाजा बंद होताना, किती गोड नजरेने आणि हावभाव व्यक्त करून त्याला नकर द्यायला नाही म्हणते, त्यात ती त्याच्या किती प्रेमात पडली आहे हे जाणवते!! ❤❤❤ दिग्दर्शकांना एक खूप खूप विनंती, ह्याचा एक sequel नक्की काढा!!

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Жыл бұрын

    खरंच चांगली movie आहे, चिन्मय उदगीरकर चा make over 👌👌

  • @milindrelekar502
    @milindrelekar502 Жыл бұрын

    खूप छान. विषय, आशय, संगीत, संवाद सर्वकाही अप्रतीम. 👍👌👌

  • @sangeetajere
    @sangeetajere Жыл бұрын

    फिल्म चा विषय खूप छान आहे..आणि तो छान पद्धती ने हाताळला आहे..सर्वांची कामं सुन्दर झाली आहेत...खूप आवडली ....👌

  • @TusBrockLesnar
    @TusBrockLesnar3 ай бұрын

    Good clip. Last scene is excellent. Actor showed good maturity while interacting with actress ..❤❤❤❤😊

  • @maheshshinde3077
    @maheshshinde3077 Жыл бұрын

    Beautiful, superb .... खरंच खूप दिवसातून अशी सुंदर फिल्म बघितली.. Waiting for next episode...

  • @latarane3550
    @latarane3550 Жыл бұрын

    मनाला मुग्ध करणारी तरल फिल्म. चिन्मय आणि अनुजा लाजवाब. दिवसभराच्या रुटीन मध्ये सुखदायक क्षण ह्या फिल्मने मिळाले. संपूर्ण टीम ला..........जस्ट कीप इट अप.

  • @user-xg6pg6fs3b

    @user-xg6pg6fs3b

    Ай бұрын

    Chan aahy film

  • @arajanaik1185
    @arajanaik1185 Жыл бұрын

    Really nice movie... Keeps you involved every moment... The song is really amazing....the best part is you don't want it to end... Love the expression that the actress gives right at the end....

  • @rameshbhivare9429

    @rameshbhivare9429

    Жыл бұрын

    last moment expressions are fabulous.... mind think that never end this inward glance

  • @Amolraut-qm3pe
    @Amolraut-qm3pe Жыл бұрын

    आणि अतिशय सुरेख चित्रपटाचा मान मिळतोय.....

  • @shubhangikulkarni6982
    @shubhangikulkarni6982 Жыл бұрын

    खूपच सुंदर..अगदी मंत्रमुग्ध करणारे..👌❤️

  • @sandeepkulkarni5788
    @sandeepkulkarni5788 Жыл бұрын

    विषयाची मांडणी अतिशय उत्तम रित्या केली आहे आणि सर्वांचं कामही सुरेश झाले आहे भविष्यातल्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा 👍

  • @girijabhagwat8107
    @girijabhagwat8107 Жыл бұрын

    खूप छान फिल्म ... अप्रतिम विषयाची मांडणी, आणि गाणं अप्रतिम

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai73498 ай бұрын

    पुठचा भाग कधी येणार. खुप खुप छान होता भाग खुप खुप अप्रतिम 👌👌👌👌जेव्हा तिला नकार ऐतो तेव्हा ती तीच्या मनापासून दुसर्‍या गोष्टी चा विचार करते हे खुप खुप छान मांडले खुप खुप छान काॅन्फिडटं मुलगी सरळ मुलांला जाऊन भेटली 👌👌👌👌👌👌त्या मुलाने खुप खुप छान पध्दतीने नकार का दिला ते मांडले पण पुठचा भाग हवा होता

  • @aadinirmitee

    @aadinirmitee

    8 ай бұрын

    'शंभरावे स्थळ' बनवताना पुढच्या भागाचा काहीच विचार केला नव्हता. पण प्रेक्षकांच्या कडून सातत्याने विचारणा होत असल्याने आम्ही पुढील भागाचा विचार सुरु केला आहे. निर्णयाबद्दल सर्वांना लवकरच कळवू. प्रेक्षकांना जे देऊ ते विचार करून चांगलं काही देऊ हे मात्र नक्की! धन्यवाद! : आदि निर्मिती

  • @pallavipatil6503
    @pallavipatil65037 ай бұрын

    Thanks to writer and director Bansidhat kinkar sir. मी खूपदा बघीतली ही फिल्म. मी प्रेमात पडले ह्या कथा आणि पात्रांच्या......आणि गाणी सुमधूर. धन्यवाद.

  • @aadinirmitee

    @aadinirmitee

    7 ай бұрын

    धन्यवाद!

  • @pawalavalkar7621
    @pawalavalkar7621 Жыл бұрын

    Excellent story, Excellent direction, Excellent starcast, Excellent shoot, Excellent music....... Congratulations.

  • @prabodhd
    @prabodhd Жыл бұрын

    Excellent subject, very aesthetic treatment, great role play by Chinmay and Anuja. In short, a feel of fresh air with fragrance. After a long long time I watched a short film with curiosity and interest. Great screen play, good dialogues and the song was simply apt for the movie, excellent !

  • @pratimagaikwad381
    @pratimagaikwad381 Жыл бұрын

    खुपच सुंदर ... मनातले सरळ आणि sopya भाषेत सांगितले आहे

  • @jamesT008
    @jamesT008 Жыл бұрын

    Khup chhan....who ever written script is outstanding....near to practicle life..char selection..situation..cinematography...all class

Келесі