Actress ते यशस्वी Producer, Shweta Shinde यांच्याशी आरपार गप्पा | Women Ki Baat| Devmanus

चार दिवस सासूचे, अवंतिका, वादळवाट, अवघाची हा संसार अशा अनेक अजरामर मालिकांमून दिसलेला एक आश्वासक चेहरा म्हणजे श्वेता शिंदे... सध्या ती फारशी स्क्रिनवर झळकत नसली तरी, अनेक मालिकांच्या मागची सूत्रधार श्वेता आहे... देवमाणूस, लागिरं झालं जी, नवे लक्ष्य, मिसेस मुख्यमंत्री अशा अनेक मालिकांची निर्मात्याची खंबीर बाजू श्वेता अगदी सहजपणे सांभाळते. मराठीतील एक यशस्वी निर्माती म्हणून आपण तिचं नाव नक्कीच घेऊ शकतो, अशा या गुणी, कॉन्फिडंट अभिनेत्री, निर्मातीच्या मन की बात आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय. तिनेही अगदी मनमोकळेपणाने आपल्या मनातल्या गोष्टी आरपारवर सांगितल्या आहे... ही तुम्हाला खिळवून ठेवणारी मुलाखत असेल ही खात्री!
👉 • Actress ते यशस्वी Prod...
आरपार: आरपार देखोगे तोह लाईफ बन जाएगी
आपल्या आयुष्यातले काही क्षण थोडे हटके आणि हॅपनिंग करायचे असतील तर अनेक लोकं अनेक वेगवेगळ्या पद्धतीने त्यासाठी प्रयत्न करत असतात. कोण पुस्तक वाचतं, कोण कला जोपासतं तर कोण आपल्या माणसांशी मनसोक्त गप्पा मारतं. पण या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या, पहायच्या असतील तर आमचं आरपार हे चॅनल आहे. कला, कविता, सिनेमा, गाणी, गप्पा आणि गोष्टींचं अनलिमिटेड पॅकेज म्हणजे आरपार! आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो, आरपार देखोगे तोह लाईफ बन जाएगी.

Пікірлер

    Келесі