सुतकाचे २३ नियम || Sutak niyam in marathi || sutak after death rules (Marathi)

Тәжірибелік нұсқаулар және стиль

सुतकाचे २३ नियम || Sutak niyam in marathi || sutak after death rules (Marathi)
सुतकात पाळावयाचे २३ नियम
(सुतकाचे २३ नियम)
१. सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जाऊ नये.
२. सूतक पडलेल्या घरातील कोणत्याही स्त्री व पुरूषाने तिलक किंवा टिकली लावू नये.
३. घरामध्ये दहा दिवस काळा चहा वगळता काहीही बनवू नये.
४. आप्तेष्ट, शेजारी किंवा इतर नातेवाईक अन्न आणून देतात ते ग्रहण करावे.
५. घरात अन्न शिवजवल्यास त्यात फोडणी घालू नये.
६. कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही.
७. सुतकामध्ये केस व दाढी कापू नये.
८. सुतक घरासोबत भावकी तसेच आडनाव बंधूनाही लागू असते.
९. सुतकात घरातील सदस्यांनी बाहेर पडू नये.
१०. दररोज आंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लाऊ नये.
११. सुतकामध्ये पलंग, गादीवर झोपू नये.
१२. हरिपाठ वाचन, गायत्री मंत्र सोडून इतर नाम जप, किर्तन, प्रवचन करण्यास हरकत नाही.
१३. नवीन वस्त्र परिधान करू नये.
१४. अत्तर वापरू नये.
१५. दहाव्या दिवशी दशक्रिया विधी असतो ज्यात पिंडाला कावळा शिवला म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असे मानले जाते.
१६. दहावा झाल्यानंतर सुतक फिटते.
१७. दहाव्याच्या विधीला निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील पुरूष व्यक्तींनी डोईवरील संपूर्ण केस काढावेत. (टक्कल करावे.)
१८. दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी, सूतकातील सर्व कपडे धुवावीत आणि घरात गोमूत्र शिंपडावे.
१९. दहावा झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी तेरावा विधी करावा.
२०. तेराव्या विधीला नातेवाईकांना बोलवावे आणि गोडधोड खायला करावे.
२१. या दिवशी मयत व्यक्तीच्या कुटुंबातील पुरूष सदस्यांना गंध लावून त्या परिवाराच सुतक संपते.
२२. स्त्रियांनी दहाव्या किंवा तेराव्यानंतर टिकली किंवा गंध लावायला सुरुवात करावी.
२३. चौदाव्या दिवशी घरात निधनशांत व उदकशांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकऱ्यांना, नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे.
सुतक ही हिंदु धर्मातली एक महत्वपूर्ण प्रथा आहे. घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याच्या क्षणापासून सुतक सुरू होतं.
ॐ नमो नारायणा

Пікірлер: 69

  • @sangeeta7139
    @sangeeta7139 Жыл бұрын

    खुप छान म्हहीति धिली सर धन्यवाद 🙏🙏

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 Жыл бұрын

    हे सर्व करावेच करावे. कारण जे लोक सांगतात हे करु नये त्यांनी हे केल्यामुळे काय काय आणि कोणाचे नुकसान झाले ते सांगावे. समाजाला पुढे न्यावे... ह्या दिवसात रिकामटेकड्या राजकीय पुढाऱ्यांच्या सभेला पण जावू नये. व्होटिंग पण टाळावे.

  • @CSVID3
    @CSVID3 Жыл бұрын

    Khup changli mahiti dili sutakabaddal tyabaddal danyawad 🙏

  • @kishorshirgaonkar1172
    @kishorshirgaonkar117210 ай бұрын

    सुतक हे तस म्हणायला गेल तर 3 दिवसाचं असत .पण आपल्या अज्जा पंज्जानी रीत पाडली आहे ती आपण पुढे चालवत आलो आहे ..

  • @santoshgaikwad2644
    @santoshgaikwad2644 Жыл бұрын

    ओम नमोह नारायणा

  • @rameshshetye8036
    @rameshshetye8036 Жыл бұрын

    हि रीत तुमच्या गावाकडची आहे का, उगीच कसलंही उपदेश लोकांना करू नका.

  • @pushpapawar4422

    @pushpapawar4422

    4 ай бұрын

    अगदी खर, ही रिकाम टेकड्या लोकांसाठी ठिक आहे. पण नोकरी करीत संसार करणाऱ्यांची काय होईल. मुलांच्या final exam असतात त्यावेळी अश्या गोष्टी पाळल्या तर त्याच का😂

  • @user-qr4yl6mg8c
    @user-qr4yl6mg8c5 ай бұрын

    ।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।

  • @panditdhumal8442
    @panditdhumal844210 ай бұрын

    ज्यांना शक्य आहे त्यांनी पथ्य पाळावे, भारतातील अजूनही निम्याहून लोक खेड्यात राहतात त्यांना ते शक्य आहे. त्यातून सामाजिक सलोखा व बांधिलकी राहते .शहरातील प्लॅटमधून दुर्गंधी आल्यावर पोलीस किंवा महानगर पालिकेत कळवावे एवढेच सतकृत्य.

  • @sangeeta7139
    @sangeeta7139 Жыл бұрын

    ओम नमोनारायना

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS30679 ай бұрын

    Very nice video Dada

  • @santoshtanpure1418
    @santoshtanpure1418 Жыл бұрын

    🙏🙏

  • @user-vb9sc4je4k
    @user-vb9sc4je4k6 ай бұрын

    🌺🙏‼️🚩 llॐ नमो नारायणा ll 🚩‼️🙏🌺

  • @ShankarRahane-lw3xg
    @ShankarRahane-lw3xg2 ай бұрын

    Sutkat ekadashi dharayala chalel ka

  • @jyotisalunkevlogs8501
    @jyotisalunkevlogs8501 Жыл бұрын

    ,स्वामी म्हणतात सुतक म्हणजे मृताच्या कुटुंबांला दुखातुन सावरण्यासाठी मिळालेला वेळ आहे बाकी जे काही आहे ती मनाची कल्पना

  • @kundakadoo5251

    @kundakadoo5251

    Жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @nileshpatil238

    @nileshpatil238

    Жыл бұрын

    Your right

  • @sushamabhosale5085

    @sushamabhosale5085

    Жыл бұрын

    Ho na

  • @vidyakulkarni2646

    @vidyakulkarni2646

    10 ай бұрын

    Rightly said

  • @user-pe5uv5jz3k

    @user-pe5uv5jz3k

    8 ай бұрын

    हो अगदी बरोबर ❤❤❤

  • @jayashreeborate2472
    @jayashreeborate247210 ай бұрын

    Om नमो नारायणा 🙏

  • @girigosavi5770

    @girigosavi5770

    8 ай бұрын

    नमो नारायण

  • @sushmak2190
    @sushmak21902 ай бұрын

    10 दिवस आपल्याला कोण खायला देणार , घरात बसून...

  • @abhijitketkar1391
    @abhijitketkar1391 Жыл бұрын

    शेजाऱ्यांनी दिलेले आन खावे अस सांगतोय स पण शेजारी 1 दिवस देतील ते पण काम धंदे सोडून दुसऱ्याच्या घरच्या पंगती उठवतील का किती हा जुना विचार

  • @allinoneshona
    @allinoneshona2 ай бұрын

    मासिक पाळी मधे वर्षश्राद्ध ला जावू शकतो का plz plz reply konala mahit aahe ka

  • @DipaliPatil-wo2pl
    @DipaliPatil-wo2plАй бұрын

    Saheb chukichi mahihiti sangu naka vacha Ani sutkacha kahi pan sabnd nahi. Tumi matra roj anghol karata Ani dev tasacha parosa tevata Tumi 13 divas anghol Karu naka baguya Kay hotay jya ghari varale asel mati prayant thik ahe he

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 Жыл бұрын

    आजकाल ,हे सर्वच पाळता येईल का ----

  • @amardasdeole4061
    @amardasdeole4061 Жыл бұрын

    सुतक ही प्रथा सहे आहे .प्रथा ह्या काळानुसार बदलता येतात.

  • @pranalichavan7732
    @pranalichavan77322 ай бұрын

    हे नियम कुठल्या शास्त्रांना धरून आहेत te sangave, hi तुम्हाला माहित असलेली किंवा तुमच्याकडे करत असलेल्या परंपरा vatatat baki काही नाही.

  • @seemapawar7343
    @seemapawar73439 ай бұрын

    Om Namo Narayana🙏🙏🙇‍♀️

  • @Atmakeeawaz
    @AtmakeeawazАй бұрын

    धर्म बेसिक मध्ये काय आहे ? याची माहिती न घेता केलेला हा कोरडेपणा आहे

  • @mrs.dhanashreemahangade5249
    @mrs.dhanashreemahangade5249 Жыл бұрын

    उगाच पूर्वापार चालत आल आहे म्हणून आपण त्यामागचा उद्देश न बघताच ते पाळत बसतो

  • @kundakadoo5251

    @kundakadoo5251

    Жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @hitendrasarvankar2962
    @hitendrasarvankar2962 Жыл бұрын

    या सर्व andha श्रध्दा आहेत.

  • @lalitabhalerao9097
    @lalitabhalerao9097 Жыл бұрын

    Ashya pratha kunach tari man dukhvatat he ka kalat nahi lokana ekhadyachya janyan tyach kutumb udhvast ani he niyam palayla te kutumb nit tari rahatka

  • @smitagupte5403
    @smitagupte54035 ай бұрын

    काही कोणी आणून देत नाही .शहरात एवढे नियम पाळण शक्य नाही . अहो शेजारच्या घरात एखाद्या व्यक्तीच निधन झाल्यावर दरवाजे लावून घेतात .ही आहे प्लॅट संस्कृती .आणि तुम्ही काय बोलताय ?

  • @amitsuryawanshi6542
    @amitsuryawanshi6542 Жыл бұрын

    शनीमहिनम सौत्र वाचावे का किवा नवगह सौत्र वाचावे

  • @Bunnystoriess
    @Bunnystoriess9 ай бұрын

    इतके नियम पाळलेत् तर उपाशी राहावे लागेल

  • @chandrakantwadgaonkar3549

    @chandrakantwadgaonkar3549

    4 ай бұрын

    24 तास पोटाच्या मागे लागलेली माणसं पण अजुन काही पोट भरलं नाही थोडीफार संस्कृती जपा ही विनंती

  • @reshmanikam5992
    @reshmanikam59929 ай бұрын

    नवरात्री मधेच सुतक् अले तर् पाठ करावा का सप्तशातीचा

  • @DipaliBotale
    @DipaliBotale7 ай бұрын

    या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, आता जग किती पुढे गेले आहे.मेलेली व्यक्ती ही देवाघरीच गेलेली असते ना?

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le Жыл бұрын

    Marathi

  • @vaishalikale3288
    @vaishalikale3288 Жыл бұрын

    शहरांमध्ये कोणीही अन्न आणुन देत नाहीत तेव्हा काय करावे

  • @vaishalikale3288

    @vaishalikale3288

    Жыл бұрын

    अंधश्रद्धेला खतपाणी घातले जातेय

  • @vaishalikale3288

    @vaishalikale3288

    Жыл бұрын

    मी एका उच्च पदावर कार्यरत आहे या सर्व गोष्टी करणार कधी

  • @namdevshinde9765
    @namdevshinde9765 Жыл бұрын

    खूप मार्मिक माहीती दिली पण आनखी एक शंका होती प्रवचन कीर्तन आणि भजन हे कराव कोणत्या ग्रंथात सांगितले आहे तरी कृपया विदीत करावं धन्यवाद

  • @umeshraohodhlurkar4369

    @umeshraohodhlurkar4369

    5 ай бұрын

    garud puran vachle tar chalte

  • @roopenshinde482

    @roopenshinde482

    Ай бұрын

    या बाबत गरूड पुराणात सुतक असतांना काय करावे, व काय करू नये हे स्पष्ट सांगितलेले आहे .आपण हिंदू आहोत तर! जे शक्य असेल ते केले तरी मुक्त आत्म्यास सदगती मिळेल.

  • @raginideodhar1690
    @raginideodhar16907 ай бұрын

    Koni keli hi pratha??andhshraddha nusti ..jivant pani vicharat nahi tyana manat bhiti aste te kartat.maza trust nahi aslya goshtinwar. Kontyahi shastrat dewachi krushnachi geetwar sign aahe ka??

  • @vkarale46
    @vkarale4611 ай бұрын

    आती मामा मावशी अश्या नात्यांचं आपल्याला सुतक लागते का

  • @anujasule5632
    @anujasule5632 Жыл бұрын

    Wrong information

  • @jotiramkumbhar1814
    @jotiramkumbhar18145 ай бұрын

    थोतांड आहे हे

  • @manishahonale423
    @manishahonale4234 ай бұрын

    पिंड म्हणजे काय असतें

  • @user-yy7dh7hp9p
    @user-yy7dh7hp9p8 ай бұрын

    सुतक सूयर कसे तोडले जाते

  • @karbharitbapumalode7338
    @karbharitbapumalode73387 ай бұрын

    सूतकात ब्राह्मणाला दान / दक्षिणा द्यावे काय?

  • @madhuritalekar-tn7ok
    @madhuritalekar-tn7ok Жыл бұрын

    आजकाल जॉब करणाऱ्या स्त्रीला हे सगळे कस शक्य आहे

  • @miteshdhuri2807

    @miteshdhuri2807

    Жыл бұрын

    Mag Job Soda 😂

  • @ashokchaphekar9796
    @ashokchaphekar9796 Жыл бұрын

    काही तरी प्रॅक्टिकल उपाय सांगा.येथे दहा दिवस बाहेरचे लोक कशाला अन्न देतील? अश्या न पटण्यासारख काही सांगू नका

  • @shubhangigaikwad953

    @shubhangigaikwad953

    Жыл бұрын

    बघा ना काय तरिच सांगतात.म्हणे फक्त काळा चहा बनवा .ज्यांच्या घरी खानारी लहान मुले असतील तर ती इतका दिवस राहतील का उपाशी न जेवता

  • @dhanashreesmanepatil9324

    @dhanashreesmanepatil9324

    Жыл бұрын

    ​@@shubhangigaikwad953 j

  • @pandharinathsonar-we6qf
    @pandharinathsonar-we6qf Жыл бұрын

    Sutakat dewala diva lawawa ka bhavkiche sutak asel tardewala diva tulsila diva lawava ka? Plz sanga

  • @kundakadoo5251

    @kundakadoo5251

    Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ, कलर्स मराठी वाहिनीवर बघा, सर्व उत्तर मिळतील

  • @sangit336

    @sangit336

    Жыл бұрын

    नाही,

  • @rajeshmulay1907
    @rajeshmulay1907 Жыл бұрын

    तुमचा number देता का

  • @nileshpatil238
    @nileshpatil238 Жыл бұрын

    Wrong information

Келесі