समयासी सादर व्हावें

Ойын-сауық

समयासी सादर व्हावें - संत सावतामाळी अभंग
________________________________________
समयासी सादर व्हावें ।
देव ठेविले तैसें रहावें ॥धृ०॥
कोणे दिवशीं बसून हत्तीवर ।
कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।
कोणे दिवशीं पायांचा चाकर ।
चालून जावें ॥ १ ॥
कोणे दिवशीं बसून याचीं मन ।
कोणें दिवशीं घरांत नाहीं धान्य ।
कोणे दिवशीं द्रव्याचें सांठवण ।
कोठें साठवावें ॥ २ ॥
कोणे दिवशीं यम येती चालून ।
कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ।
कोणे दिवशीं स्मशानीं जाऊन ।
एकटें रहावें ॥ ३ ॥
कोणे दिवशीं होईल सद्‌गुरूची कृपा ।
कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।
कोणें दिवशीं सावत्याच्या बापा ।
दर्शन द्यावें ॥ ४ ॥
ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ
गायक :- शैलेश पाटील
पखवाज :- शिवनाथ नाईक
तबला :- एकनाथ नाईक

Пікірлер

    Келесі