RACHANA FILM

सर्व रसिक प्रेक्षकांना मकर संक्रांतीची भेट...
एक नवी कोरी गोष्ट, नवीन सिनेमा...
रचना (Rachana)
Producer - Sharad Ponkshe, Anita Abasaheb Tupe, Sharada Gajanan Khot Executive Producer - Prasad Satvalekar
Writer, Director - Prasad Satvalekar
DOP - Sidharth S. Mitragotri
Editor- Aniket Kale
Associate Director - Ashwani Umbarkar
Art - Rakesh Sutar
Costume - Prachi Mukesh Dhediya
Make-up - Jui Suhas Gole
DI - Montage 1.0
DI Colorist - Bhushan Sahastrabudhe
Sound Design And Mix - Nimish Joshi
Background Score - Nishant Ramteke
Poster Design - Suchet Gavai
Artist - Vivek Joshi, Rucha Apate and Sharad Ponkshe

Пікірлер: 629

  • @priyanikam2607
    @priyanikam26075 ай бұрын

    क्या बात है! कथा ,अभिनय, सादरीकरण,शेवट सर्व सुरेख.सर्वांचे अभिनंदन.रटाळ ,बुद्धीला न पटणार्या सिरीयल पहाण्यात पेक्षा हे पहाताना आनंद मिळाला.अप्रतिम .

  • @shobhatulve2578
    @shobhatulve25785 ай бұрын

    ऋचा आपटे.सुंदर अभिनय.अनपेक्षित शेवट.फारच सुंदर कथानक.

  • @udaychitnis1904
    @udaychitnis19045 ай бұрын

    कमालीची सुंदर फिल्म! फक्त संवादाच्या आणि अप्रतिम अभिनया च्या जोरावर तुम्ही प्रेक्षकांना अक्षरशः खुर्चीला खिळवून ठेवता..! ग्रेट!

  • @advaitthakur9934
    @advaitthakur99345 ай бұрын

    उत्तम कथा, तो अपघात आमच्या डोळ्यासमोर उभा केलाय दोघांनी. संवादही उत्तम . ❤

  • @truptikulkarni289
    @truptikulkarni28916 күн бұрын

    छान कथा, लेखन संवाद व अभिनय .. दोघांचा अभिच कौतुकास्पद👌👌👏👏

  • @priteshkhamkar3975
    @priteshkhamkar39755 ай бұрын

    सुंदर सिनेमा, एकतर शरद पोंक्षे सर, हयात अर्धी बाजी जिंकली. लेखाला आणि त्याच्या विचाराला लाख सलाम.

  • @vidyavaidya9928
    @vidyavaidya99285 ай бұрын

    मस्तच.. खिळवून ठेवले... शरदजी तुम्ही तर उत्तम अभिनेता आहातच पण ऋचाचे काम पण छानच झाले....

  • @sakshibadarayani8787
    @sakshibadarayani87873 ай бұрын

    बापरे!! जबरदस्त अभिनय, नाट्य, वळण आहे कथानकाला....थोडक्या वेळात, कमीत कमी साधने वापरून केलेला चित्रपट👏👏👏✨👌👌🙌💫 ऋचा आपटे ची संवादफेक लाजवाब🎉🎉शरद जींचा अभिनय तर उत्तमच😎👌👌👏👏✨

  • @TanujaVijay5115
    @TanujaVijay51155 ай бұрын

    आपले कर्म आपली कधीच पाठ सोडत नसतात....सुंदर सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखेच आहे हे... उत्तम अभिनय शरद जी आणि रूचा तुमचे अभिनंदन....बऱ्याच दिवसांनी उत्कृष्ट संवाद ,कथा दिग्दर्शन पाहिल्यामुळे आनंद झाला.... शरद जी आपण उत्तम अभिनेते आणि एक सुंदर व्यक्तिमत्त्व आहात..... मला आपल्या अस्तित्वाचा आणि अमृत वाणीचा गर्व आहे.... धन्यवाद .....🙏

  • @kulkarnikp9
    @kulkarnikp95 ай бұрын

    मी नथुराम बोलतोय हे नाटक आम्हाला परत पाहता येणार नाही याची खंत आहे. "हिमालयाची सावली" या येऊ घातलेल्या आपल्या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपणासही उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हि सदीच्छा.

  • @dipalishedge8964
    @dipalishedge89645 ай бұрын

    खूप सुंदर जमलं आहे सगळं, शरद आपण उत्तम अभिनय करताच पण ऋचा चा अभिनय देखील कमाल झाला आहे....सगळ्या टीम च अभिनंदन आणि खूप कौतुक

  • @AK-hb5hy
    @AK-hb5hy5 ай бұрын

    फारच विलक्षण अनुभव ! पोंक्षे सर आपल्या अभिनयाला खरोखरच तोड नाही

  • @ksawool
    @ksawool5 ай бұрын

    पोंक्षे सर नेहमी प्रमाणे जबरदस्तच. पण पोंक्षें सारख्या प्रचंड अनुभवी नटासमोर जराही न डगमगता कसलेला अभिनय करणं यासाठी ऋचा चं विशेष कौतुक.

  • @rashmipotnis8622
    @rashmipotnis86225 ай бұрын

    सावरकर ऐकून ऐकून तुमची खूप मोठी मी फॅन झाले or आहे. तुमची बोलायची शैली अति सुंदर आहे. स्पष्ट मराठी ऐकायला छानच वाटतं. सर्व अभिनया प्रमाणे हा ही सुंदर आहे. ऋचा पण तोडीस तोड आहे. खूप मस्त सिनेमा आहे.

  • @chintamanipalekar2491
    @chintamanipalekar24915 ай бұрын

    उत्तम कथानक. मी तुमच्या अभिनयाचा चाहता. मी सामान्य तुम्हाला किंवा तुमच्या अभिनयाला प्रमाणपत्र देण्याएव्हडा मोठा नाही. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळो. तुमचे चित्रपट आणि नाटकं पाहायला मिळोत.

  • @VeenaShirur
    @VeenaShirur5 ай бұрын

    एक अप्रतिम कलाकृति पाहिल्याचं समाधान लाभलं! केवळ शब्दांतून सर्व दृश्ये मनःचक्षू समोर साकारली गेली! पटकथा मनाची चांगलीच पकड घेणारी आहे. दिग्दर्शनही कथानकाला अगदी अनुरूप. पोंक्षेंच्या अभिनया बद्दल आम्हा पामरंनी काय बोलाव बरे! कौतुकाने पहात रहणेच बरे! ऋचा आपटेने ही अतिशय सुरेख संयत कथेला सजेसाच उत्तम अभिनय केलाय! व्वा खूपच छान!!

  • @vidyasammannavar4943
    @vidyasammannavar49435 ай бұрын

    असा चित्रपट किती तरी. वर्षांत पहिला नव्हता. चित्त खिळवून ठेवले. अद्भुत असे पाहायला मिळाले.

  • @malleshidongare7977

    @malleshidongare7977

    5 ай бұрын

    apratim aahe chitrapat💯💯❣❣

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar90495 ай бұрын

    शरद पोंक्षे एक उत्तम अभिनेता आहे आणि काय खिळवून ठेवलाय प्रेक्षकांना सस्पेन्स काय भारी आहे चित्रपटात.

  • @MaithiliPhysio
    @MaithiliPhysio5 ай бұрын

    उत्तम कथा, संवाद व अभिनय. "मरण्यापेक्षा कठीण आहे कटु घटना विसरणं" "आपली कर्म कधी आपली पाठ सोडत नाहीत." "न्याय या गोष्टीचा अर्थ खुप व्यापक आहे" हि वाक्य तंतोतंत पटली. धन्यवाद शरद सरजी🙏

  • @chintamanipalekar2491

    @chintamanipalekar2491

    5 ай бұрын

    खरं आहे. एकाच वाक्यात खूप काही सांगितलं आहे अन् सामावलेले आहे.जीवन अर्थपूर्ण आहे.

  • @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng

    @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng

    5 ай бұрын

    🙏🙏

  • @vaibhaviketkar3320

    @vaibhaviketkar3320

    5 ай бұрын

    कथेचे उत्तम सादरीकरण, मला ऐकू कमी येते पण subtitles मुळे समजण्यास जास्त सोप्पे जाते, subtitles साठी धन्यवाद🙏🏻🙏🏻 शेवटी पाठीशी घालणारा त्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोच हे त्रिवार कटू सत्य 🙏🏻🙏🏻

  • @deepaliraut7620

    @deepaliraut7620

    5 ай бұрын

    Uttam katha,patkatha ,digdarshan,abhinay,sanvad....aani saglach

  • @annapurnakamat9770

    @annapurnakamat9770

    5 ай бұрын

    Excellent concept ​@@chintamanipalekar2491

  • @_SamruddhiShukla
    @_SamruddhiShukla5 ай бұрын

    निव्वळ स्तब्ध करणारी सुरेख कलाकृती, अशीच नवनवीन पाहायला आवडेल या वाहिनी वर 🧿🌸

  • @arunachoudhari8780
    @arunachoudhari87805 ай бұрын

    अप्रतिम चित्रपट 🙏🙏रचना आणि शरद पोंक्षे यांचा सुंदर अभिनय , संवाद 👌👌

  • @amitrahalkar8270
    @amitrahalkar82705 ай бұрын

    अप्रतिम चित्रपट , अगदी खुर्चीला खिळून राहिलो . बऱ्याच वर्षांनी मी आज एक चित्रपट सुरवातीपासून अखेरपर्यंत पाहिला. आभारी आहे तुमचा ह्या सुरेख सादरीकरणासाठी 🙏

  • @amitbarve136

    @amitbarve136

    4 ай бұрын

    same here

  • @shubhasathe1710
    @shubhasathe17105 ай бұрын

    कथा, सादरीकरण, अभिनय, संवादफेक.... सगळंच अप्रतिम!!!! पोंक्षे सर मनःपूर्वक अभिनंदन!!! रचना हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे पण अभिनंदन!!@

  • @meerapathak2386

    @meerapathak2386

    5 ай бұрын

    😊

  • @ananddeo3528
    @ananddeo35285 ай бұрын

    चार कलाकारांमध्ये, खरं म्हणजे दोनच कलाकारांमध्ये उत्तम सादरीकरण. वेगळाच विषय हाताळला आहे. खूप छान वाटलं

  • @dr.bharatipatil3074
    @dr.bharatipatil307416 күн бұрын

    Oh my god.......what a fantastic movie.....ashya ....Marathi movies.....pahun......atyanand.....hoto......beautiful......movie......yala mhantat......chitrpat......yala mhantat....abhinay......kiti kami kharchacha set......pan.....output.....jabardast.......Din ban gya.......aajcha divas......safal...zala....asa.....atiuchh darjacha chirtpat pahun......Thanks a lot to everyone of you who is directly or indirectly associated in making of this movie💐👌👍👏👏👏👏🙏

  • @harshalchougule9649
    @harshalchougule96495 ай бұрын

    3 अभिनेते फक्त, त्यातही दोन प्रमुख मस्त KZread वर आसून ही चित्रपट गृहात आहोत असे वाटते very nice 👍👍👍 bollywood,south industri should learn how to make film.

  • @himanshutillu8013
    @himanshutillu80135 ай бұрын

    अतिशय दर्जेदार कलाकृती! गोष्ट आणि अभिनय केवळ अप्रतिम! शरदजी करत आहेत म्हणजे प्रश्नच मिटला!

  • @smitarane
    @smitarane5 ай бұрын

    सुंदर रहस्यमय चित्रपट.मराठी मध्ये आता असेच सिनेमे यायला पाहिजे.सर्वांचा अभिनय सुंदर.पोंक्षे सर नेहेमी प्रमाणेच उत्कृष्ट पण रचानाचे काम पण मस्त.

  • @vinodpatil2770
    @vinodpatil27705 ай бұрын

    Perhaps this could only film in the world with 2.5 characters without scene location without any vulgarity. Just cannot imagine what I have seen now...admire Sharad sir.. truly unbelievable

  • @prakashdeshpande5589

    @prakashdeshpande5589

    5 ай бұрын

    अतिशय सुंदर चित्रपट आहे, अभिनंदन आणि धन्यवाद

  • @sumukh112
    @sumukh1125 ай бұрын

    एखादा चित्रपट आपणास नावाने समजत नाही तरी त्या वरून निश्चित आपणस कथेची कल्पना येत नाही . पण कथा कोठे नेते आणि कोठे जाऊ शकते हे चित्रपट बरोबर जमवतो असे वाटते . अनेक दिवस असा खास वेगळा चित्रपट पाहायचे होते तो अशा माध्यमातून मिळाला.

  • @snehalsathe3672
    @snehalsathe3672Ай бұрын

    अतिशय सुंदर अभिनय सर्वांचा.खूप छान उत्सुकता पूर्ण वेगळा चित्रपट आहे. धन्यवाद

  • @yashwantdatar5554
    @yashwantdatar55545 ай бұрын

    ☀जबरदस्त ! कथानक आणि अभिनय अप्रतीम , मस्तचं , उत्तम , शेवट पर्यंत खिळवून ठेवणारं .....

  • @dileepgupte6750
    @dileepgupte67505 ай бұрын

    शरदराव, तुम्ही अभिनय करता आहात हे पटतच नाही. अतिशय नैसर्गिक होते

  • @deepakapte8748
    @deepakapte87485 ай бұрын

    एका मागोमाग एक , अनपेक्षित वळणं घेणारी , रोमांचक रहस्यकथा ! शरद पोंक्षेना , अभिनयातला , शब्दफेकीतला मुकुटमणी म्हणता यावा असा चित्रपट !

  • @rohininikte5928
    @rohininikte59285 ай бұрын

    अप्रतिम आणि अगदी वेगळी कथा !

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar23875 ай бұрын

    माझे खुप आवडते कलाकार श्री शरद पोंक्षे . नथुराम पाहिलय अप्रतिम कलाकृती.👌👌👌

  • @Atmakeeawaz
    @Atmakeeawaz5 ай бұрын

    उत्कृष्ट - कथा पात्र अभिनय पार्श्वसंगीत इत्यादी सर्वच !

  • @prakashkamlakar3730
    @prakashkamlakar37305 ай бұрын

    .. अतिशय सुंदर लिखाण, अप्रतिम सुंदर अभिनय , ऊतम रचना

  • @ashokaher6090
    @ashokaher60905 ай бұрын

    अत्यंत प्रतिभावान पोंक्षे, आणि कलाकारांनी उत्कृष्ट सिनेमा❤ दिलेला आहे , खुप छान, गुंतवून ठेवतो

  • @kailaskhareofficial7703
    @kailaskhareofficial77035 ай бұрын

    Climax कमाल आहे चित्रपटाचा... ग्रेट... 👌🏻👌🏻👌🏻 शरदजींच्या अभिनयाला तर तोडच नाही.. नेहमीप्रमाणेच भेदक नजर..आणि जबरदस्त संवादफेक...क्या बात हैं..!!!👌🏻👌🏻♥️♥️

  • @shobhanakale2980
    @shobhanakale29805 ай бұрын

    कमाल आहे लघुपट , फारच सुंदर !

  • @anitamore4844
    @anitamore48445 ай бұрын

    अतिशय सुंदर , शरद पोंक्षे यांना नाटक चित्रपट यामध्ये पाहणे म्हणजे पर्वणीच, काही दिवसापूर्वी सरकारने एक कायदा बनवण्याचा प्रयत्न केला (हिट अँड रन) पण ट्रक चालक आणि बरेचजण संप करून जनतेचा जीव मेटाकुटीला आणून हा कायदा मागे घ्यायला लावला. खुप रेलटेड वाटते, हा चित्रपट पाहून तरी लोकांना कळायला हवे हा कायदा असणे किती गरजेचे आहे, अपघात हे होतातच पण पळून जाणे हा उपाय नाही, आणि असे हे कायदे वापरून गुन्हेगार मात्र सुटूच शकतो. बाकी चित्रपटाची ' रचना ' उत्तमच .

  • @aniruddhaumrani6981
    @aniruddhaumrani69815 ай бұрын

    जबरदस्त! खरं तर क्लायमॅक्स कळला होता.. पण शेवटचा धक्का निव्वळ अतर्क्य! सिनेमाच्या नावामागचे कारण अचानक लख्ख प्रकाश पडावा तसे अचानक क्षणार्धात कळले!!

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar86385 ай бұрын

    वाह एक अतिशय सुंदर कथा पहायला मिळाली 😊👍 फार च छान

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar60015 ай бұрын

    फारच सुंदर खिळवून ठेवणारे कथानक आणि अभिनयाच्या बादशहाबद्दल त्रास बोलायलाच नको.कसलीही झगझगीतपणा नसूनही अभिनयाच्या जोरावर सुंदर कलाकृती साकार करण्यातलं कसब अप्रतीम. रचना सकार करणारी ऋचाही कुठेच कमी पडली नाही .शेवट अतिशय अनपेक्षित. भरकटलेल्या मालिका बघायला आवडत नाहीत. शरद पोंक्षे नाव ऐकून आणि त्यांचा फोटो बघून सहज बघावे म्हणून लावले आणि सव्वा तास खिळवून ठेवले या सहजसुंदर अभिनयाने. खूप खूप अभिनंदन आपल्याबरोबर ऋचा या अभिनेत्रीचे पण.

  • @pranalideobhakta5186

    @pranalideobhakta5186

    Ай бұрын

    अप्रतिम.खूप दिवसांनी इतकी सुरेख कलाकृती बघितली.दोघांची कामे तोडीस तोड.धन्यवाद.

  • @shirishchitale114
    @shirishchitale1145 ай бұрын

    अप्रतिम. खुप छान चित्रपट . वेगळे आणि खिळवून ठेवणारे कथानक, शरद जी तुमचा अभिनय तर नेहमीच नंबर वन, आणि ऋचा चा सुद्धा सुरेख.

  • @vaishnavichaphekar8779
    @vaishnavichaphekar87795 ай бұрын

    खूप दिवसातून इतकी कमाल शॉर्ट फिल्म पाहिली

  • @kishorkabra8216
    @kishorkabra82164 ай бұрын

    खुपच विस्मयकारी धक्का देनारा शेवट! .....संदेश ... कर्म कधी पाठ सोडत नाहीत...शरद पोंक्षे विलक्षण ताकदी चे कलाकार तर आहेच,त्रीचा आपटे यांचे सुध्दा उत्तम अभिनय!.….फार सुंदर पिक्चर.

  • @shraddhanivande8816
    @shraddhanivande8816Ай бұрын

    अप्रतिम , कथानक खूपच जबरदस्त, शेवट पर्यंत खिळवून ठेवणारी कथा, शरद पोक्षेंचा शेवटचा डायलॉग 👍👏🏻🙏

  • @mrunalinijoshi2238
    @mrunalinijoshi2238Ай бұрын

    केवळ अप्रतिम ! कथा, कलाकारांचे अभिनय सगळंच सुंदर ! शरद सर, खरोखर अभिनयाचे बादशहा आहात आपण. मी नत्थुराम... आणि हिमालयाची सावली ही दोन्ही नाटकं अप्रतिम ! ऋचा आपटे यांचेही विशेष कौतुक ! 🎉

  • @sanjalipatil2090
    @sanjalipatil20905 ай бұрын

    Apratim, khum chan ,survatiipasun khilvuun thevto ..actors masst....abhinay khuuupch chan..

  • @adv.mahadevjavalagi1864
    @adv.mahadevjavalagi1864Ай бұрын

    युक्त्या हे शोधण वकिलांची काम असत, कदाचीत घडलेली घटना गैरही असेल,गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहीजेत. परंतु वकिली पेशी ,पैसे कमावणे हे सर्व वास्तव आहे., कथा रचना सुंदर आहे.

  • @itsvpk11
    @itsvpk115 ай бұрын

    अतिशय उत्तम, खिळवून ठेवणारा चित्रपट.. आम्ही सहपरिवार बघितला.. आता परत बघणार आहे 😊😊

  • @asmitadixit8612
    @asmitadixit86125 ай бұрын

    मस्त आहे film. ऋचा आपटे, सुंदर अभिनय 🎉 धन्यवाद

  • @srk.priyarvi369
    @srk.priyarvi3695 ай бұрын

    शेवटच्या सिन नंतर 2 मिनिट अस झाल की,"काय हिनी?" मला शरद पोंक्षे हे पहिल्यापासूनच खरंच खूप आवडतात.कमाल माणूस आहे.मला जर त्यांना कधी भेटता अल तर आवडेल मला.

  • @BirdwatcherShilpa
    @BirdwatcherShilpa5 ай бұрын

    कायदा काय चीज ...त्यातील खाचा खोचा दोघांच्या संभाषणातून फारच छान पद्धतीनं मुद्देसूद लिखाण.

  • @ashleshalele6050
    @ashleshalele60505 ай бұрын

    खूप छान सादरीकरण, संवाद. नवीन अभिनेत्री चा अभिनय नक्की च वाखाणण्याजोगा. मस्त च. 👍👍👍

  • @cancer4684

    @cancer4684

    5 ай бұрын

    She is rucha apte, kshitish date's wife. Not so famous, but known for reels video and acted in dil dosti, tuzhyat jeev rangla as supporting actress.

  • @shakuntalakashetti7522

    @shakuntalakashetti7522

    5 ай бұрын

    😮 hmm😂 😂😂​@@cancer4684 😂

  • @venkateshkulkarni2145
    @venkateshkulkarni21454 ай бұрын

    किती सुंदर कथा आहे खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar57003 ай бұрын

    सुंदर कथानक, सुंदर दोघांचा अभिनय, जबरदस्त, खुप आवडली कथा

  • @pratibhadiwan8154
    @pratibhadiwan81545 ай бұрын

    अति़शय सुंदर विषय अभिनय दिग्दर्शन स्रर्वच खूप छान.

  • @mukundbhandare3105
    @mukundbhandare31055 ай бұрын

    शेवट पर्यंत सस्पेन्स राखण्यात आला आहे ,सर्वच मस्त ,असेच वरचेवर लिहित जा

  • @gourangjoshi92
    @gourangjoshi925 ай бұрын

    पोंक्षे सर तुम्ही एक उत्तम अभिनेते आहात.

  • @rajendrabadve5289

    @rajendrabadve5289

    5 ай бұрын

    प्रश्न च नाही

  • @architthelion6034

    @architthelion6034

    5 ай бұрын

    Very nice thanks,,,send one more like this.

  • @sumannaolekar3538

    @sumannaolekar3538

    5 ай бұрын

    ❤​@@rajendrabadve5289

  • @Facts4India01

    @Facts4India01

    5 ай бұрын

    Movie telling truth about truckers protest against rto bill

  • @arunjagdale8137

    @arunjagdale8137

    5 ай бұрын

    ​@rajendrabadve5289 ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @omkarhirve6456
    @omkarhirve64565 ай бұрын

    सव्वा तास जागेवर खिळून राहिलो. खूपच सुरेख चित्रपट आहे आणि आजच्या काळाशी सुसंगत आहे. शरद पोंक्षे यांची नजर, शब्दफेक उत्तम. ऋचा आपटे हिने भूमिका उत्तम निभावली आहे. प्रसाद सावतळकर यांचे कथानक सुरेख आहे. बाकी शब्दांची मांडणी अप्रतिम, छायाचित्रण करताना काहीच कसर ठेवलेली नाही. खूप दिवसांनी मराठीत असा हृदयाला ठाव घालणारा चित्रपट पाहिला. पूर्ण चमुचे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन आणि आभार.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @dinkarprabhudesai6638

    @dinkarprabhudesai6638

    5 ай бұрын

    जबरदस्त ! साऱ्यांच काम सुरेख.

  • @bhaktikale21
    @bhaktikale215 ай бұрын

    शरद पोंक्षेंचा कमाल अभिनय. ऋचाचा पण सुंदर अभिनय. कथानक जबरदस्त

  • @smitagadgil7586
    @smitagadgil75865 ай бұрын

    कमाल रहस्य... अप्रतिम फिल्म!!शरदजी तर...शब्दच नाहीत.

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar47865 ай бұрын

    जबरदस्त सस्पेन्स आणि शेवटचा धक्का!!! अप्रतीम मांडणी, उत्कृष्ट अभिनय...ऋचा आपटे उत्तम 👌👌 अर्थपूर्ण आणि विचार करायला लावणारे डायलॉगस्...सारंच उत्तुंग!!

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat84435 ай бұрын

    शरद पोंक्षे तर मुरलेले , नट आहेतच, पण ऋचा आपटे चा अभिनय, लाजवाब ! फार सुरेख काम केलंय, वर्णन करण्यास शब्द कमी पडतात...she has great future !

  • @Silkworm2020

    @Silkworm2020

    5 ай бұрын

    Thanks a lot 🙏🏻

  • @user-pf6tq9ty5b

    @user-pf6tq9ty5b

    5 ай бұрын

    ऋचा अप्रतिम अभिनय.खूप छान चित्रपट

  • @KVBHAGWAT

    @KVBHAGWAT

    5 ай бұрын

    खरच ऋचा आपटे मॅडम खूप छान अभिनय केलायत 🎷👑

  • @rohitkale24RK

    @rohitkale24RK

    4 ай бұрын

    mam यांना पहिल्यांदा तुझ्यात जीव रंगला मध्ये पाहिले होते. ..अप्रतिम अभिनय असतो तुमचा 😊

  • @padmakarfadnis4281

    @padmakarfadnis4281

    4 ай бұрын

    सर तर सर आहे पण ऋचा आपटे यांच्या अभिनय अतिशय उत्तम शुभेच्छा

  • @sunitawani129
    @sunitawani1294 ай бұрын

    अप्रतिम! अचानक धक्का... मराठी चित्रपट, मराठी कलाकार का इतका श्रेष्ठ याचं उत्तर प्रत्येक भाषिकानं कधीतरी अशा दिग्गज मराठी कलाकारांना भेटाल्यावर , मराठी चित्रपटाना बघितल्यावरच मिळेल. इतकं अनपेक्षित वळण! इतका भयचकित अभिनय! वाह!!🙏🏼

  • @ganeshkulkarni5889
    @ganeshkulkarni58894 ай бұрын

    सुंदर. कॅची.खिळवुन ठेवणारी. अभिनयात शाम पोंक्षे समोर समर्थपणे अभिनय करणारी अभिनेत्री. ब-याच दिवसांनी पाहण्यास मिळालं एक सुंदर कथानक, समर्थ अभिनय.

  • @ranjanasonawane9493
    @ranjanasonawane94935 ай бұрын

    अप्रतिम, हिमालयाची सावली ह्याची वाट बघतोय

  • @monalidesai9023
    @monalidesai90234 ай бұрын

    सुंदर film no words ❤❤❤ शरद सर आणि ऋचा सुंदर अभिनय....

  • @arvindkulkarni5439
    @arvindkulkarni54395 ай бұрын

    अप्रतिम मस्तच शरदजी. उत्तम. अभिनय नमस्कार.

  • @aniruddhabhave96
    @aniruddhabhave965 ай бұрын

    अप्रतिम सिनेमा दोघांचाही अभिनय उत्तम

  • @vijayaraut6168
    @vijayaraut61685 ай бұрын

    अप्रतिम कथानक.. तरीही माणूस म्हणून एक खूप प्रकर्षाने वाटतं.. जर अपघात, घातपात पूर्व वैमनस्यातून घडले तर कदापि माफ केलं जाऊ नये... जगातील न्यायालयातून सुटलात तरी कर्म पाठ सोडणार नाही जन्म जन्मांतरीचे भोग बनून फेडावे लागतील.. माणसाने स्वतः कडून तरी प्रयत्न करावा सतत माणुसकी जपण्याचा..🙏

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni81715 ай бұрын

    सुंदर ...काय सुरेख..कथानक.जबरदस्त कलाकार❤

  • @ashagiri4301
    @ashagiri43015 ай бұрын

    लखेन ऊत्कृष्ट .दोघांचा अभिनय अप्रतिम . शेवट मात्र एकदम अनपेक्षित.

  • @vijayrandive2900
    @vijayrandive29005 ай бұрын

    काय आहे, बऱ्याच दिवसांनी एक छान सिनेमा पाहिल्याचं समाधान मिळालं. कथा, संवाद, दिग्ददर्शन सारचं सुंदर. शेवटी जे व्हायचं ते होतचं. शरद जी,कमालीचा अभिनय, संवाद वा! ऋचा ग्रेट ,तिचं बोलणं अभिनय आवडले . अभिनंदन।🎉🎉

  • @shrish72
    @shrish725 ай бұрын

    अप्रतिम ..!! असे चित्रपट आणखी यावेत .

  • @nikhilp5925
    @nikhilp59254 ай бұрын

    अतिशय छान शेवट. छान परफोर्मन्सेस. 2 महीन्यान पूर्वी भारताबाहेर तीनवेळी भेट झाली. उत्क्रुष्ट अभिनेते, हिंदुंचे अभिमान शरदजी.

  • @prakashbuldana
    @prakashbuldana5 ай бұрын

    मी आताच बघितला चित्रपट. अत्यंत सुंदर कलाकृती. रचना दिसायला तर सुंदर आहेच पण तेवढाच सुंदर तिचा अभिनय आहे ❤️

  • @ravindranene8500
    @ravindranene85005 ай бұрын

    शरद पोंक्षेजी एक नितांत सुंदर चित्रपट बघीतल्याच समाधान झाल.एकूणच उत्सुकता शेवट पर्यंत ताणून राहीली होती व शेवट तर अत्यंत अनपेक्षित होता.कमालीचा सुंदर चित्रपट. रविंद्र नेने वाशी.

  • @varshasovani3917
    @varshasovani39175 ай бұрын

    Khup chhan lekhan, saadarikaran. Jabardastta, khilavun thevanaari, uttam vaatavaran nirmiti. Shevati asaa shevat houn asaa vichar pahaanaaryachya manaat yete toch akalpit kalaatani ! Achambit karanaari ! Film KHUP AAVADALI ! Namaskar.

  • @Poluvstories
    @Poluvstories5 ай бұрын

    Awesome story... Uncle ji aap awesome ho..but co actress 🥴... Cool story - sahi hai... Revenge lene wala gaya, senior bhi gaya...👍

  • @prasadsanwatsarkar6412
    @prasadsanwatsarkar64125 ай бұрын

    छानच चित्रपट.. निदान मराठीत तरी जरा वेगळा विषय... काही गोष्टी अंदाजाने ओळखू येतात पण शेवट मात्र अकल्पित 👍 अभिनंदन टीम 🙂

  • @dattatrayashembekar2713
    @dattatrayashembekar27135 ай бұрын

    सुंदर चित्रपट आहे. सर्वांची कामेही छानच आहेत. शेवटचा ट्विस्ट तर जबरदस्त

  • @radhikajoshi5990
    @radhikajoshi59905 ай бұрын

    सुंदर अभिनय दोघांचीही ‌.स्टोरी ‌मस्तच!,शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा सिनेमा.

  • @geetaagashe
    @geetaagashe4 ай бұрын

    अप्रतिम स्टोरी 👍🏻 उत्तम अभिनय 👏🏻👏🏻

  • @santoshjoshi7895
    @santoshjoshi78952 ай бұрын

    Sir🙏 आपला अभिनय अप्रतिम आहे .

  • @NitinPatil-xt4ic
    @NitinPatil-xt4ic2 ай бұрын

    Best conversation between criminal and lawyer, Rucha Aapte jabardast abhinay ponkshe sir tyanchya vicharana kay todach nahi Rashtray Swaha ❤❤

  • @anvitaphansalkar7385
    @anvitaphansalkar73855 ай бұрын

    उत्तम कथा,युक्तीवाद ,आणि संपूर्ण फिल्म छान.....प्रसाद आणि पूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @prasadsatawalekar3353

    @prasadsatawalekar3353

    5 ай бұрын

    thanks a lot! 😊

  • @sidmitragotri5375

    @sidmitragotri5375

    5 ай бұрын

    धन्यवाद

  • @poojakarekar37
    @poojakarekar375 ай бұрын

    दोघांचा ही अतिशय उत्तम अभिनय, उत्कृष्ट सवांद लेखन, संवाद फेक आणि दिग्दर्शन 👍

  • @user-bu8rd7hq1p
    @user-bu8rd7hq1p5 ай бұрын

    फारच सुंदर, खिळवून ठेवणारी फिल्म

  • @vandanaphadke2205

    @vandanaphadke2205

    5 ай бұрын

    खरंच, खूपच छान. शेवटपर्यंत ऐकत रहावसं वाटलं ते ऐकत राहिलेही .तरीहि शेवट काय असेल हे समजलेच नाही आणि अचानक कल्पनातीत असा शेवट पाहिला मिळाला. कथानक मनात घर करून राहिले . दोघांचाहि अभिनय उत्कृष्ट..धन्यवाद.

  • @suhasMahajani
    @suhasMahajani3 ай бұрын

    उत्तम कथा,नेमके संवाद,अगदी शेवटी दिलेला धक्का... पोंक्षे कसलेले-अनुभवी अभिनेते आहेतच..... आपल्या सहज -कसदार अभिनयानं ऋचा आपटेही स्मरणात राहतात.त्यांच्या अन्य टेलीफिल्म पाहण्याची उत्सुकता आहे.

  • @prakashphadke4606
    @prakashphadke46065 ай бұрын

    कथेच्या शेवटाने आधीची कथाच फिरवली. अप्रतिम.

  • @user-vu1rb8by9k
    @user-vu1rb8by9k5 ай бұрын

    तुमचा आवाज हृदयास जाऊन भिडतो sir! I love your voice.

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis52155 ай бұрын

    सुपर्ब फिल्म, अफलातून सस्पेन्स ,आणि दोन्ही ACTORS कमाल, टफ अ‍ॅक्टींग 5 /5 star*****❤❤❤

  • @surekhashaha6373
    @surekhashaha63735 ай бұрын

    शरद जी उत्तम कलाकार आहेत सर्वात जास्त अभिनय रुचाने केलाय तोडीस तोड ...अगदी वकीली प्वाईंट जबरदस्त मांडले ...

  • @sunitamandavgane662
    @sunitamandavgane6625 ай бұрын

    तुमचे डायलॉग्ज अतिशय सुंदर, आणि सिनेमा सस्पेन्स.

  • @prashanttiwari3842
    @prashanttiwari38425 ай бұрын

    क्या बात! अप्रतिम कथा, दोनच पात्र..यावरून कळतं खिळवून टाकणारी कथा असल्यावर कसलाच तामझाम गरजेचा नसतो! फार सुंदर नि अप्रतिम❤️👏🏻👌🏻

  • @sangeetakulkarni8770
    @sangeetakulkarni87705 ай бұрын

    Excellent film .Sharad Ponkshe ,too good.❤

Келесі