रंगपंढरी Face-to-Face: Chandrakant Kulkarni - Part 3

Ойын-сауық

'वाडा चिरेबंदी', 'मग्न तळ्याकाठी' आणि 'युगांत' ह्या महेश एलकुंचवारांच्या तीन गाजलेल्या नाटकांचा सलग आठ तास, एकसंध प्रयोग सादर करणारे चंद्रकांत कुलकर्णी हे प्रतिभावान नाट्यदिग्दर्शक माहीत नाहीत असा मराठी रंगकर्मी किंवा नाट्यरसिक जगभरात शोधूनही सापडणार नाही.
आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ आणि दैदीप्यमान कारकीर्दीत चंदू सरांनी त्रिनाट्यधारेखेरीज 'रंग उमलत्या मनाचे', 'चारचौघी', 'गांधी विरुद्ध गांधी', 'डॉक्टर तुम्हीसुद्धा', 'यळकोट', 'ध्यानीमनी', 'व्यक्ती आणि वल्ली', 'चाहूल', 'आषाढ बार', 'हॅम्लेट' या आणि अशा अनेकोत्तम नाट्यकृती प्रेक्षकांसमोर प्रस्तुत केल्या आहेत.
संहितेचा एकंदर आशयच नव्हे तर त्यातला शब्दनशब्द आपलासा करुन अत्यंत चोख तयारीने चंदू सर नाटक उभं करण्याच्या प्रक्रियेला सामोरे जातात. मात्र हे काटेकोर नियोजन, नाट्यशास्त्राचा केलेला रीतसर अभ्यास, अनेक व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांचा अनुभव ह्यांपैकी कशाचंही ओझं मात्र ते होऊ देत नाहीत. अतिशय तन्मयतेने, उत्स्फूर्तपणे आणि बारकाईने सादरीकरणाच्या विविध शक्यता ते नटांबरोबर आणि तंत्रज्ञांबरोबर पडताळून पाहतात; आणि प्रत्येक वेळी प्रेक्षकांना एक रसरशीत, नावीन्यपूर्ण रंगानुभव देण्याचा प्रयत्न करतात.
संहितेचं पुनर्लेखन ही दिग्दर्शकाने नाटककाराला स्वतःच्याच विचारांशी करून दिलेली पुनर्भेट कशी असते, प्रत्यक्ष उभं राहण्यापूर्वी नटाने संवादांवर काय काम करावं, नाटकातील हालचाली आणि आकृतीबंध हे मुद्दामहून ठरवण्याऐवजी आपोआप उमलू कसे द्यावेत, नेपथ्य आणि संगीताचा वापर द्विमितीतील रंगमंचीय अवकाश त्रिमितीत परिवर्तित करण्यासाठी कसा करावा, प्रयोग हलू नये म्हणून काय काळजी घ्यावी, काही सुचत नसेल अशा वेळी दिग्दर्शकाने काय करावे अशा अनेक रोचक विषयांवर चंदू सर आज बोलणार आहेत.

Пікірлер: 58

  • @amolkshirsagar1191
    @amolkshirsagar1191 Жыл бұрын

    तीन भागातील ही मुलाखत "त्रीनाट्य धारेईतकीच " सुंदर रंगली आहे , मराठी रंगभूमीच्या इतिहासात त्रीनाट्य धारेचे जसे महत्त्वाचे स्थान आहे तसेच चंद्रकांत कुलकर्णी यांचे दिग्दर्शक म्हणून एक स्वतंत्र स्थान आहे हे या निमित्ताने परत एकदा अधोरेखित होते ...।

  • @sohaminamdar8405
    @sohaminamdar8405 Жыл бұрын

    परत अखंड मुलाखत ऐकली ज्यानी जीवंत समोर नाटक ३ अंकी पाहिली. इतकी सुन्दर मुलाखत ! "चन्द्रकांत उवाच" असचं म्हणावं. प्रयोग अतीशय रंगला ! ❤️

  • @itsskyway7047
    @itsskyway7047 Жыл бұрын

    चंदू सरांची ही मुलाखत नवीन कलाकारांसाठी विद्यापीठ प्रमाणे काम करेल.....खूप बुद्धिमान व्यक्ती आपल्या मराठी रंगमंच्याला मिळालेला आहे.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 Жыл бұрын

    रंगपंढरी, तुम्हाला असं वाटतं नाही का चंद्रकांत कुलकर्णांची मुलाखत अजून ५-७ भाग तरी व्हायला हवी!!!! He himself is the one man institute !!! सरांना आदरपूर्वक नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @RangPandhari

    @RangPandhari

    Жыл бұрын

    😊Indeed. धन्यवाद!

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 Жыл бұрын

    रंगपंढरी टीमचे विशेष आभार! नाटकाबद्दल किती छान माहिती विनासायास कळतेय! कुलकर्णी सर खरंच ग्रेट!! नाटक कसे बघायचे हे ही कळतेय.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 Жыл бұрын

    विचार किती सुस्पष्ट असावेत !!! आणि ते परत योग्य शब्दात मांडता येणं ही तर कमालीची ताकद आहे. 🙏🏻

  • @vinitamarathe5317
    @vinitamarathe5317 Жыл бұрын

    आळेकर सरान नंतर खूप अभ्यास पूर्ण अशी मुलाखत आज बघायला / ऐकायला मिळाली . दिग्दर्शक म्हणून. ह्या दोघांच्या मुलाखती ऐकल्यावर नाटक कसे बघायचे हे आत्ता कळायला लागले

  • @arunajadeja9324
    @arunajadeja9324 Жыл бұрын

    सर, तुमच्या मुलाखतीतूच आम्हास शांतता मिळाली, भरपूर ऊर्जा पण. धन्यावाद .

  • @madhumatideshpande9911
    @madhumatideshpande9911 Жыл бұрын

    मुलाखती चे तिन्ही भाग पाहिले , साहित्यिक मेजवानी च मिळाली आणी आता पुढे कुठलंही नाटक बघताना नविन दृष्टीकोनातून ते बघायला खुप मजा येईल .वा!वा!

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi Жыл бұрын

    धन्यवाद , रंगपंढरी ! एका अभ्यासू दिग्दर्शकाच्या मुलाखतीने केवळ नाट्यकर्मींनाच नव्हे तर प्रेक्षकांना देखिल खूप काही मिळाले.

  • @ninadkulkarni7660
    @ninadkulkarni7660 Жыл бұрын

    उत्तमता आणि प्रतिभा यांचा सुरेख संगम!! प्रेक्षक म्हणून प्रगल्भ करणारी मुलाखत👌👌

  • @vineetavartak3450
    @vineetavartak34503 ай бұрын

    खुपच सुंदर मुलाखत!! मधुराणी तुम्ही मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तीला खुप छान मोकळेपणाने बोलू देता मधे अडवत नाही त्यामुळे सलग बोलणं ऐकून छान वाटत.मी रंग पंढरी वरच्या मुलाखती नेहमी ऐकते

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 Жыл бұрын

    तीन तास खिळवून ठेवणारी ही मुलाखत अविस्मरणीय अनुभव देवून गेली हे नक्की.धन्यवाद परत एकदा दोघांनाही.विचार समृध्दी म्हणजे काय तर हे सगळं.धन्यवाद आणि आभार ही.

  • @supriyabrahme4132
    @supriyabrahme4132 Жыл бұрын

    अतुल कुलकर्णी ची मुलाखत बघायला आवडेल तुमच्या या कार्यक्रमात🙏🏻

  • @oriandcalliartshop2491

    @oriandcalliartshop2491

    Жыл бұрын

    Very true

  • @mrs.varshaathavale6841
    @mrs.varshaathavale6841 Жыл бұрын

    अप्रतिम. गेल्या चार दशकांमधला नाटकाचा प्रवास अनुभवायला मिळाला. रंगपंढरी धन्यवाद. सर्व दिग्दर्शकांमधील उत्तम मुलाखत.

  • @supriyabrahme4132
    @supriyabrahme4132 Жыл бұрын

    अप्रतिम परिपूर्ण अशी मुलाखत! अत्यंत उंचीवरील आणि समृद्ध अश्या व्यक्तीमत्वाविषयी ऐकायला अतिशय आनंद झाला आणि खूप शिकायला मिळाले. 🙏🏻🙏🏻👍🏻

  • @smadam4243
    @smadam4243 Жыл бұрын

    या मुलाखती मधून नाटकाचे माहित नसलेले आयाम कळले. आता नाटक अधिक जाणीव पूर्वक पाहता येईल.धन्यवाद

  • @manasiborkar8305
    @manasiborkar8305 Жыл бұрын

    एका देवदूत कडून मिळालेली एक अप्रतिम वैचारिक मेजवानी आभारी आहे

  • @dhanashreedivekar8052
    @dhanashreedivekar8052 Жыл бұрын

    परिपुर्ण मुलाखत, आता ही सगळी नाटकं पुन्हा एक-दोन वेळा बघायला मज्जा येईल.

  • @sureshshelar2534
    @sureshshelar2534 Жыл бұрын

    धन्यवाद. एका उत्तम दिग्दर्शकाला ऐकायला मिळालं. आता वामन केंद्रे सरांना ऐकायला आवडेल.

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni343 Жыл бұрын

    अतिशय उत्तम मुलाखत खुप हुशार विवेकी उच्च दर्जाची अभिरुची उत्तम जाण अभ्यासपुर्ण काम करणारे चंद्रकांत कुलकर्णी खुप खुप अभिनंदन मधुराणी खुप खुप धन्यवाद तुझ्या अभ्यासपुर्ण मुलाखतकार असण्याचा अभिमान वाटतो

  • @RangPandhari

    @RangPandhari

    Жыл бұрын

    तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, रसिका जी. तुमच्यासारख्या साक्षेपी प्रेक्षकांमुळे आम्हाला अजून चांगलं काम करायचा हुरूप येतो. योगेश तडवळकर - निर्माता, दिग्दर्शक रंगपंढरी

  • @vinitamarathe5317
    @vinitamarathe5317 Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद रंगपंधरीचे अणि त्यांच्या सगळ्या टीम चे

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 Жыл бұрын

    सर्व natak प्रेमींना सुंदर माहीती मिळाली धन्यवाद

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 Жыл бұрын

    अतिशय प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व ऐकायला मिळाले धन्यवाद

  • @sandhyaakerkar1376
    @sandhyaakerkar1376 Жыл бұрын

    मधुराणीजी, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही एका प्रतिभाशाली नाट्य-चित्र दिग्दर्शकाची मुलाखत ऐकवलीत, आम्हाला पहाता आली. चंद्रकांतजींना ऐकताना, पहाताना खूप छान वाटले. किती छान बोलले. आणि तुमचेही अभिनंदन की तुम्ही समोरच्याला जराही अडथळा न आणता बोलतं ठेवता. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची मते आपल्याला ऐकता येतात. ही तुमची हातोटी मला खूप आवडली. चंद्रकांतजींची बरीच नाटके मी पाहिली आहेत--ध्यानीमनी, व्यक्ति आणि वल्ली, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला, वाऱ्यावरची वरात, हमीदाबाईची कोठी. माझे आवडते दिग्दर्शक आहेत. एकच खंत आहे की अति महत्वाची तीन नाटके वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत या नाटकांचे एकत्रीकरण करून त्यांनी जे प्रयोग केले होते, ते पहाता आले नाहीत. माझी किंवा आम्हा प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की त्यांनी हा उपक्रम पुन्हा करावा. आणि तो आम्हाला पहाता यावा आणि आमच्या डोळ्यांचे पारणे फिटावे. आमची ही इच्छा पूर्ण होईल अशी मी आशा करते. व तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देते. 💐💐🙏🙏🌹🌹

  • @RangPandhari

    @RangPandhari

    Жыл бұрын

    संध्या जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! रंगपंढरी अशाच पहात रहा. त्रिनाट्यधारा सध्या उपलब्ध नसली तरी 'वाडा चिरेबंदी' या नाटकाचे प्रयोग अजूनही होत असतात. जरूर पहा. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @danceforever5940
    @danceforever5940 Жыл бұрын

    Apratim

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 Жыл бұрын

    Thank you very much. Just like his trilogy all the three parts are worth watching. His command and knowledge is unbeatable. Directors interviews are amazing

  • @jayamohrir8603
    @jayamohrir8603 Жыл бұрын

    सुपच सुंदर मुलाखत ऐकतच रहावे वाटते

  • @hemaayachit435
    @hemaayachit435 Жыл бұрын

    Khup sundar. Great 🙏

  • @jsagar95
    @jsagar95 Жыл бұрын

    धन्यवाद !🙏🏻

  • @cadiwan
    @cadiwan2 ай бұрын

    पुन्हा एकदा तीन्ही भाग पाहिले :) आनंद !!

  • @rahulbawankule
    @rahulbawankule Жыл бұрын

    Finally, he came, he saw, and he conquered as usual. A long wait is worth it. Now other directors do nataks as a profession, but Chandrakant Kulkarni lives in it. That is why his nataks are different from others and very well received by the audiences and successfully run in theatres.

  • @neetashinde4265
    @neetashinde4265 Жыл бұрын

    अप्रतिम मुलाखत. किती अभ्यासू आणि नम्र. नाटक जगतात ते. Great 🙏

  • @seemachougule8296
    @seemachougule8296 Жыл бұрын

    चंद्रकांत कुलकर्णी सरांवर PHD करण्यासाठी ही मुलाखत mile stones आहे

  • @sangeetakeluskar5988
    @sangeetakeluskar5988 Жыл бұрын

    Atishay surekh mulakhat. Chandrakant kulkarni yancha natya pravas anubhavta ala. Thanks team rangpandhri

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 Жыл бұрын

    Waah

  • @user-ck5tj3qs1m
    @user-ck5tj3qs1m2 ай бұрын

    Excellent interview!

  • @rahulaphale
    @rahulaphale Жыл бұрын

    Very insightful and interesting interview

  • @oriandcalliartshop2491
    @oriandcalliartshop2491 Жыл бұрын

    Kammmmaal 🎉

  • @madhuripatil6680
    @madhuripatil6680 Жыл бұрын

    परिपूर्ण नाटक शाळा डोळयासमोर उभी केली सर ही पदवी किती योग्य आहे

  • @aparnapangare6547
    @aparnapangare6547 Жыл бұрын

    Hats 🎩 off to this man and his passion!!! Take a bow 🙇‍♀️ sir!!!

  • @abhyangam7840
    @abhyangam784011 ай бұрын

    प्रचंड व्यक्तिमत्त्व ..तुम्ही लिहा नाटकावर...नाटक लिहिणारा दिग्दर्शक

  • @rupalikarnik7574
    @rupalikarnik7574 Жыл бұрын

    A legendary director

  • @mitapansare3093
    @mitapansare3093 Жыл бұрын

    👌👌💐💐

  • @prakashshetty5189
    @prakashshetty5189 Жыл бұрын

    🙏💐💐💐🙏

  • @Shraddha935
    @Shraddha935 Жыл бұрын

    अतिशय सुंदर... खरं वेडेपण याला म्हणतात... 3 hours of master class this was.... Thank you Rangpandhari 👏

  • @chinmayeejoshi4592
    @chinmayeejoshi45928 ай бұрын

    Haha, enjoyed the little anecdote about namrata nursing home 😅

  • @rahulbawankule
    @rahulbawankule Жыл бұрын

    Please call Vijaya (bai) Mehta. A stalwart of theatre who shaped at least one generation in Marathi nataks.

  • @ravikiranpatne3492
    @ravikiranpatne3492 Жыл бұрын

    भाषा अत्यंत चपखल, ईतकी समृद्ध की पुणेकरांना पण न्युनगंड येऊ शकेल.

  • @arunajadeja9324
    @arunajadeja9324 Жыл бұрын

    आमची दिवाळी

  • @RangPandhari

    @RangPandhari

    Жыл бұрын

    :-) 🙏

  • @varshagaidhani3660

    @varshagaidhani3660

    Жыл бұрын

    Sunder mulakhat No words to describe.

Келесі