No video

फळ माशी (लाल माशी)नायनाट ३० रुपयात

फळमाशी आकाराने ७ मिमी लांब असून, घरमाशीएवढी असते. फळमाशीचे पंख पसरलेले असतात आणि तिला पंखांची एकच पारदर्शक जोडी असते.
जीवनक्रम : चार अवस्था - अंडी, अळी, कोष आणि माशी.
अंडी ः फळमाशीची मादी टोकदार अंडनलिकेच्या साह्याने फळांच्या सालीवर छिद्रे पाडून त्याखाली अंडी घालते. एका छिद्रात १ ते १५ अंडी असू शकतात. एक मादी एका महिन्याच्या कालावधीत सुमारे १५० ते २०० अंडी घालते. अंडी १ मिमी लांबीची आणि पांढऱ्या रंगाची असतात. ही अंडी हवामानापरत्वे एक आठवड्यात उबतात.
अळी ः अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पिवळसर रंगाच्या व मागील बाजूस निमुळत्या असतात. त्यांना पाय नसतात. अळ्यांची वाढ एक ते तीन आठवड्यांत पूर्ण होते. अळीचा कालावधी उन्हाळ्यात व पावसाळ्यात ६ दिवस असतो. परंतु, तापमान कमी असल्यास तो २९ दिवसांपर्यंत वाढू शकतो. पूर्ण वाढलेल्या अळ्या फळाला छिद्रे पाडून बाहेर पडतात. जमिनीवर खाली पडून जमिनीत ८ ते १६ सेंमी खोलीवर कोषावस्थेत जातात.
कोष ः कोष रेशमी कवचाचे आणि दोन्ही बाजूस निमुळते असतात. त्यांचा रंग पिवळसर तांबूस असतो. कोषावस्थेचा कालावधी उन्हाळ्यात ६ दिवस, तर तापमान कमी होत गेल्यास ४४ दिवसांपर्यंत वाढतो. जमिनीत कोषावस्था पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे एका आठवड्यानंतर त्यातून माश्या बाहेर पडतात आणि पुढे अंडी घालण्यास सुरू करतात. अशा प्रकारे जीवनक्रमाचा कालावधी छोटा असल्यामुळे हवामानानुसार आणि फळांच्या उपलब्धतेनुसार फळमाशीच्या वर्षभरात अनेक पिढ्या तयार होतात. ही कीड जवळपास वर्षभर आढळून येते. मात्र, मोठ्या प्रमाणावर मे ते जुलै या कालावधीत आढळते. वर्षभर फळांची उपलब्धता असल्याने फळमाशींचा प्रादुर्भाव सुरू राहतो.
नुकसानीचा प्रकार : या अळ्या फळातील गर खातात. कीडग्रस्त फळे सडून पडतात. मादीने अंडी घालण्यासाठी फळांच्या सालीवर पाडलेल्या छिद्रातून फळांत सूक्ष्म रोगकारक घटकांचा शिरकाव होतो, त्यामुळे संपूर्ण फळ सडून जाते. बऱ्याच वेळा फळमाशीने प्रादुर्भाव झालेली फळे बाहेरून चांगली दिसतात. पण, आतून सडलेली असतात. फळे परिपक्व होण्याच्या काळात फळमाशीचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे स्थानिक अथवा निर्यातीसाठी विक्री करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. जपान, युरोपियन देशांमध्ये आंबा निर्यात करण्यापूर्वी या किडींच्या नियंत्रणासाठी उष्ण वाफेची प्रक्रिया करावी लागते.
नियंत्रणाचे उपाय :
१. बागेत झाडाखाली जमीन हिवाळ्यात नांगरावी, कुदळणी करावी किंवा चाळून घ्यावी. यामुळे सुप्तावस्थेतील कोष उघडे पडून नष्ट होतील किंवा पक्षी वेचून खातील.
२. बागेत झाडांखाली पडलेली फळे आणि फळमाशी कीडग्रस्त फळे गोळा करून खोल पुरून नष्ट करावीत. प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
३. फळमाशीचा प्रादुर्भाव फळे पक्व झालेल्या फळांवर मोठ्या प्रमाणावर होतो. फळे पूर्ण पक्व होण्यापूर्वी थोडी अगोदर काढावीत.
४. फळमाशीच्या नरास आकर्षित करणाऱ्या मिथील युजेनॉल व क्यूलुअर सापळ्याचा बागेत वापर करावा.
फळमाशीसाठी सापळा ः
फळमाशीचे नर आणि मादी कोषातून बाहेर पडल्यानंतर मादीला जननक्षम होण्यासाठी किमान एक ते दोन आठवडे लागतात. फळमाशीचे नर मात्र लवकर जननक्षम होतात. त्यांना जगण्यासाठी ठरावीक प्रकारचे खाद्य लागते. हे खाद्य ठरावीक वनस्पतींच्या फुले, फळे, पाने किंवा काही बियांमध्ये आढळून येते. अशा खाद्याच्या गंधाकडे फळमाशीचे नर आकर्षित होतात. तुळशीच्या पानामध्ये, फुलांमध्ये आणि बियांमध्ये नराला आकर्षित करणारी रासायनिक द्रव्ये असल्याचे आढळून आले आहे.
फळमाशीच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेण्यासाठी मिथील युजेनॉल किंवा क्यूल्युअरसारख्या रासायनिक द्रव्याचा वापर करण्याचे शास्त्र त्यातून विकसित केले आहे. या द्रव्याचा उपयोग करून सापळे तयार केले जातात.
फळमाशांना आकर्षित करण्यासाठी मिथील युजेनॉल किंवा क्यूल्युअर हे रासायनिक द्रव्य वापरावे.
#कामगंध सापळा
माशी,फळमाशी,लाल माशी,krushi manthan youtube channel,indian jugaad,फळ माशी ट्रॅप,फळमाशी नियंत्रण,किड नियंत्रण,100% फळमाशी नियंत्रण,फल मक्खी,मक्षिकारी एक कामगंध पाश,फेरोमन ट्रॅप,फळमाशी सापळा Fruitfly trap,Cotton pink bookworm,कामगंध सापळा, #How to install feromone trap ,how to plantation at home,rog niyantran,telya rog niyantran,peru pikawaril rog,peru rog niyantran,देशी जुगाड सापळा,Bhimashankar Thorat,जुगाडू फळ माशी ट्रॅप,फळमाशीचा त्रास आता संपवा,STN,मोसंबी लागवड, मोसंबी सोनेरी माशी, मोसंबी किड नियंत्रण, मोसंबी फळमाशी, मोसंबी लागवड माहिती

Пікірлер: 27

  • @user-su1lu9mp4f
    @user-su1lu9mp4f8 ай бұрын

    Thanks sir

  • @mangeshchandanshive6800
    @mangeshchandanshive6800 Жыл бұрын

    Khup Chan mahiti

  • @adhuniksheticagodva

    @adhuniksheticagodva

    Жыл бұрын

    Thanks

  • @indbolte5866
    @indbolte58663 жыл бұрын

    अतिशय सुरेख सर आभारी आहे

  • @adhuniksheticagodva

    @adhuniksheticagodva

    3 жыл бұрын

    धन्यवाद राजपूत सर....

  • @santoshibiradar2320
    @santoshibiradar2320 Жыл бұрын

    Sir wanga fal pokharnari aali sathi konte trap lagate

  • @villagevlog8211
    @villagevlog82113 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली

  • @adhuniksheticagodva

    @adhuniksheticagodva

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @pramodbhagat431
    @pramodbhagat4312 жыл бұрын

    कुठे भेटेल ५०रुपये मधे आमच्याकडे ,१००रु आहे कन्नडमध्ये औरंगाबाद ला

  • @sudhirmane4505
    @sudhirmane45052 жыл бұрын

    plot la 27 divas zale ahet aata lavle tri chalel ka

  • @luckybhoir1980
    @luckybhoir1980 Жыл бұрын

    Sir nav kay ahe vadi cha

  • @user-vw7pv9cd6p
    @user-vw7pv9cd6p4 ай бұрын

    कुठे मिळेल

  • @annasahebwani3632
    @annasahebwani3632 Жыл бұрын

    वडीचे नाव काय आहे?

  • @sandipchaudhari6627
    @sandipchaudhari6627 Жыл бұрын

    सर आम्ही दोडका लागवड केलेली आहे आमचे दोडके फळ माशीमुले खुप खराब झालेले आहेत तुम्ही सांगितलेला उपाय करून बघितला तरी सुद्धा फळ माशचे प्रमान कमी होत नाही त्याच्यावर अजून काही उपाय करता येईल का प्लिज सर

  • @realinfield621

    @realinfield621

    6 ай бұрын

    औषध फवारणी करावी 5 ते 6 दिवसाच्या अंतराने

  • @user-zl2mb7qr9g
    @user-zl2mb7qr9g3 жыл бұрын

    मोसंबीमधील सोनेरी माशी साठी चालेल का

  • @adhuniksheticagodva

    @adhuniksheticagodva

    3 жыл бұрын

    प्रयोग करुन पहावा लागेल....

  • @kailasnirmal777

    @kailasnirmal777

    3 жыл бұрын

    हो चालतय मी वापरतोय

  • @suryakantkadam2374

    @suryakantkadam2374

    3 жыл бұрын

    खुपच चांगली आयडीया आहे

  • @adhuniksheticagodva

    @adhuniksheticagodva

    3 жыл бұрын

    धन्यवाद दादा.

  • @indianfarmer6307

    @indianfarmer6307

    2 жыл бұрын

    @@kailasnirmal777 bhau tumhi kothun ghetle saple

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar20693 жыл бұрын

    शेवगा बागेत चालेल का ?

  • @adhuniksheticagodva

    @adhuniksheticagodva

    3 жыл бұрын

    हो चालेल.

  • @avinashmore6627
    @avinashmore66273 жыл бұрын

    वडी कुठे मिळेल

  • @adhuniksheticagodva

    @adhuniksheticagodva

    3 жыл бұрын

    शेती औषध विक्रेत्याकडे मिळते.

Келесі