No video

पातंजल योगसूत्र समाधी पाद १.४

पातञ्जलयोगसूत्राणि
॥ महर्षि पतञ्जलि प्रणीतं योगदर्शनम् ॥
॥ प्रथमोऽध्यायः ॥ ॥ समाधि-पादः ॥
वृत्तिसारूप्यमितरत्र ॥ १.४॥
वृत्ति + सारूप्यम् + इतरत्र
वृत्ति + एकरूप + इतर वेळी
इतर वेळी वृत्तींशी एकरूप
🌹 जेव्हा आत्मा स्वरूपात स्थिर नसतो तेव्हा म्हणजेच इतर वेळी तो वृत्तींची एकरूप झालेला असतो व त्या वृत्तीनुसार आपण कृती करतो
🌹 जे उदाहरण आपण आधीच्या सूत्रामध्ये बघितलं ते पाण्यामध्ये जो ही रंग मिसळला पाणी त्या रंगाचं होतं पिवळा निळा हिरवं म्हणजेच ते रंग म्हणजे वृत्ती आहेत आणि पाणी हे त्याच रंगाचे भासतं जो रंग मिक्स केलेला आहे म्हणजेच जेव्हा चेतना मुक्त नसते तेव्हा ती वृत्ती सोबत एकरूप झालेली असते
🌹 व्यास भाष्यनुसार निरोधकाळा वाचून इतर वेळी वृत्तींच्या तादात्म्य रूपाने पुरुष राहतो चित्ताच्या वृत्ती जेव्हा उफाळतात तेव्हा पुरुष तेथे असल्यामुळे त्याचे ज्ञान बुद्धीला होते. सर्वत्र एकच चैतन्य आहे व तेच म्हणजे बुद्धी आहे असे म्हटले आहे, पंचशीखाचार्य यांचे एक प्रमाण इथे दिलेले आहे उदाहरण म्हणून जसे लोहचिंबकाकडे लोखंड आकर्षित होते व एकरूप होऊन जाते आणि आपले वेगळेपण विसरते त्याप्रमाणे बुद्धीमध्ये असलेल्या वृत्तीशीं पुरुष एकरूप होऊन जातो. 🌹🙏

Пікірлер

    Келесі