ॐ चैतन्य कानिफनाथ संजिवनी समाधी मंदिर मढी# कानिफनाथ गड मढी ता.पाथर्डी

ॐ चैतन्य कानिफनाथ संजिवनी समाधी मंदिर मढी
कानिफनाथ गड मढी ता.पाथर्डी
#मढी ता. पाथर्डी अहमदनगर
KanifnathMandirMadhi
कानिफनाथ संजिवनी समाधी मंदिराच्या परिसरात ध्यान मंदिर म्हणजे एक भुयार आहे व तो एक पूवाच्या स्थापत्यशात्राचा आदर्श नमूना आहे. त्या साधना मंदिरामध्ये शिवलिंग व नंदी आहे व तेथे असलेल्या खिडकीमधून गार हवा येते व गावाची पश्मिमेकडील पाहणी करता येते. विठ्ठल मंदिराच्या उत्तरेला श्री नवनाथाचे मंदिर व पारायण ठिकाण आहे. समाधी मंदिराच्या उत्तरेला श्री भवानीमातेचे मंदिर असून तेथे डाळींबीचे झाड आहे. त्याला भक्त जणांनी पूर्वी नाथभक्त होऊन गेलेल्या डाळीबाईच्या नावाने संबोधतात व त्या डाळींबीच्या झाडाला भक्त काही तरी संकल्प नवस करून नाडा (धागा) बांधतात व श्री कानिफनाथ आजही त्या नवसाला पावून भक्तजणांच्या व्यथांचे निर्दालन करतात. श्री समाधी मंदिरामध्ये श्री नाथांची संजीवन समाधी असून, श्री कानिफनाथांची मनमोहक अशी संगमरवरी दगडाची मुर्ती तसेच नाथांचे वाहन असलेला व कान्होजी आंग्रेनी दिलेला पितळी घोडा व दत्तत्रयाची मुर्ती आहे. तसेच गडावर नगारखाना, बारदारी, भव्य सभा मंडप, पाण्याची टाकी तसेच श्री समाधी मंदिरावरील असलेला प्रचंड कळस व त्यावरील भगवान शंकराचा त्रिशूल हे मुख्य आकर्षण आहे. याच त्रिशूलाला भक्तगण यात्रेमध्ये काठ्या लावून आनंद उपभोगतात. मढी गावामध्ये हनुमंतरायाचे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे श्री भैरवनाथ, श्री दत्त यांचे मंदिरदेखील भक्तांना पावणारी आहे. मढी गावाच्या पूर्वेकडून श्री पवनगिरी नदी वाहत आहे. तेथे नाथ भक्त आवर्जुन भेट देतात. नाथ मंदिराच्या दक्षिणेला एक मोठा पाझर तलाव आहे. त्या तलावाला अर्धी भिंत ही नैसर्गिक आहे. त्या भिंतीवर श्री आदिमाया तुळजापुरची भवानी माता यांचे मंदिर असून तेथे त्यांचे वास्तव्य आहे. या मंदिराच्या उत्तरेला श्री मच्छिंद्रनाथांचे छोटेसे मंदिर आहे.
तसेच मढी गावामध्ये दोन छोट्या व एक मोठी बारव आहे.
फाल्गुन वद्य पंचमीला (रंगपंचमील) मढीला कानिफनाथांची यात्रा भरते. या यात्रेला साधारणतः १० ते २० लाख भाविक महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, आदी प्रांतांमधून येतात. अठरा पगड जातीचे मढी हे पंढरपूर आहे. तेथे त्यांच्या भांडणाचा न्यायनिवाडा होतो. पाडव्याच्या आदल्या दिवशी फुलबागेतील बाजार प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीचे गाढवाचा बाजार भरतो. मढीची रेवडी तर प्रयेकाची आवडीची आहे. पाडव्याच्या पहाटे भक्तगण कावडीने पाणी आणून नाथांच्या समाधीला स्नान घालतात व धन्य होतात.
अहमदनगरहून पाथर्डी रोडवरील निवडूंगे हे गाव ४२ कि.मी. आहे. तेथून ३ कि.मी. अंतरावर मढी हे गाव आहे. पाथर्डीहून मढी हे गाव १२ कि.मी अंतरावर आहे. मढीपासून श्री मच्छिंद्रनाथ ६ कि.मी., वृद्धेश्वर १२ कि.मी. व श्री मोहटा देवी २० कि.मी. अंतरावर आहे. दररोज नगर आणि पाथर्डी बसस्थानकामधून मढीकरिता बसेस आहे. अमावस्या, पौर्णिमेच्या वेळेस जादा बसेसची सोय आहे. त्याप्रमाणे यात्रेच्या वेळी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बस स्थानकांमधून एस.टी. बसेसची सोय केली जाते.
नाथ भक्तांची व्यवस्था करण्याकरिता कानिफनाथ गडाच्या पायथ्याशी रुमची व्यवस्था ट्रस्टने केलेली आहे. त्याचप्रमाणे भाविकांची व्यवस्था, सेवा करण्यासाठी कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढीत आहे.
श्री क्षेत्र मढी येथे श्री चैतन्य कानिफनाथ संजिवनी समाधी मंदिर अहमदनगर.
प्रमुख नाथांची संख्या ही नऊ असून ते नऊ नारायणाचे अवतार आहेत असे मानले जाते. जेव्हा ब्रम्हदेव यांनी सृष्टी ब्रम्हांडाची निर्मिती केली त्यावेळेस भगवान श्रीहरी विष्णू यांनी त्यांचे अंश स्वरूपात ब्रम्हांडमध्ये अवतार स्थापन केले. यांना नवनारायण असेही म्हणतात. त्यामुळे सृष्टीला अलोकिक स्वरूप प्राप्त होते.
तर मित्रांनो विडिओ पहा. आनंद घ्या. विडिओला लाईक करा. चॅनलला सबक्राईब जरूर करा. धन्यवाद
जय माता की 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा व आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ साठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
Hope you will like the video. Do share and subscribe the channel
My channel👇
RANJANA'S campaign vlogs
‪@ranjanas07vlogs‬

Пікірлер: 6

  • @dattuugale7455
    @dattuugale74558 ай бұрын

    Nice video.🥰💝👌👍🥳👏🚴‍♀️🚴‍♀️

  • @rajendrakumarnaikwadi7268
    @rajendrakumarnaikwadi72688 ай бұрын

    🙏🙏

  • @jayeshnaikwadi1574
    @jayeshnaikwadi15746 ай бұрын

    👌👌🙏🙏

  • @lalitajadhavkashid7651
    @lalitajadhavkashid76518 ай бұрын

    🙏🙏🙏🌹

  • @rajendrakumarnaikwadi7268
    @rajendrakumarnaikwadi72688 ай бұрын

    Nice 👍

  • @prakashgiri8140
    @prakashgiri81408 ай бұрын

    Prakash giri jintur

Келесі