नवरा वेळ देत नाही.. प्रेमाने बोलत नाही...मला समजून घेत नाही....अश्यावेळी काय करावे??..

नवरा वेळ देत नाही.. प्रेमाने बोलत नाही...मला समजून घेत नाही....अश्यावेळी काय करावे
#नवराबायकोनाते
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni

Пікірлер: 200

  • @karunasolav
    @karunasolav26 күн бұрын

    काळजी करू नका मी एका सैनिकाची बायको आहे, मला जीवनात जास्त काळ नवऱ्यापासून दूरच रहावं लागलं मी असा विचार करते की आपल्या शरीरामध्ये आपण एकटेच असतो, एकटेच जन्मतो, एकटेच मरतो मग नवरा वेळ देत नाही म्हणून झुरत बसण्यापेक्षा एकटं आनंदी कसं राहता येईल याचा प्रयत्न करा 😇

  • @user-wj4ge9vw7u
    @user-wj4ge9vw7u29 күн бұрын

    मॅडम, पहिलं एक. सांगावस वाटत की आज तुमचा चेहेरा अलौकिक प्रसन्न, समाधानी,कृतार्थ असा वाटत आहे..... अर्थात ह्याच्यामागे तुम्ही सांगताय त्याप्रमाणे तुम्ही स्वतः च स्वतः कर्तृत्व घडवलेल आहे....आजचा विषय सद्यपरिस्थितीत सर्व स्त्रियांसाठी कीती बोलू कीती नको असाच आहे.. तुम्ही खूप छान समजावून सांगितले आहे.....सर्व स्त्रीयांनी असाच विचार करून आपले जीवन समृध्द करावे.... धन्यवाद 🙏😊

  • @pillupillu3476
    @pillupillu347629 күн бұрын

    आजचा विषय खूप चांगला होता मुलीच्या माहेरचे किंवा नातेवाईक कोणी हे सांगत नसतात की आपण नवऱ्याकडून जास्त अपेक्षा न करता आपल्या करिअरवर सुद्धा लक्ष दिले पाहिजे आणि इथेच चूक होते आपण सगळ्या अपेक्षा नवऱ्याकडून च करतो आणि करिअरवर दुर्लक्ष करतो आणि मग वादविवाद डिप्रेशन तुझं माझं असे करत आपण आयुष्यातला एक चांगला कालावधी वाया घालवत असतो

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    27 күн бұрын

    Ho,parents ni neet n sangitlyane life chi barich varshe vaya geli

  • @priyavadagajbheye1682
    @priyavadagajbheye168229 күн бұрын

    अगदी असेच माझ्या सोबत घडले‌ आहे मैडम काय सांगू ,आपण विषय छान घेतला 😊

  • @surekhaky
    @surekhaky29 күн бұрын

    मला ह्या इरकली काठाच्या कॉटन साड्या फार आवडतात.,नेसायला ही नी कुणी घातली ते पाहायलाही. तुमचा आजचा पेहराव खूप छान, त्यावर कोल्हापुरी साज....लाजवाब. कधी_कधी मन सांगतं... सुख्वस्तू स्त्रीने असेच खरे तर साड्या ,दागिने... ई.मध्ये आपले मन रमवावे.आपले स्वतःचे आयुष्य आनंदाने जगावे.

  • @ramolapradhan1056
    @ramolapradhan105629 күн бұрын

    तमाम स्त्री वर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय तुम्ही अगदी नेतका नि सुंदर पद्थीने मांडला.धन्यवाद.साधारण साठी च्या स्त्रियांचा लग्ना नंतर चा काही काळ खरच dipression मधे गेला.नवराच काय मूलं सुद्ध्हा वैताग वाटतो.शेवटी काळ सगळ ठीक करतो.सध्याच्या मुलीना हे कळणार नाही उमजणार नाही

  • @SwatiGore-ys3qw
    @SwatiGore-ys3qw29 күн бұрын

    हल्ली मुली हाच मुद्दा कोर्टात मांडून वेगळ होतात त्यांचा साठी ह्या विशयाची गरज होती.❤

  • @nilimasmart2116
    @nilimasmart211629 күн бұрын

    नवरा आपल सर्वस्व नाही ✅तो कुटुंबाचा एक भाग आहे ✅आपण ९८% मध्ये आहेत 😄😄👍🏻😍

  • @snehasamant6100

    @snehasamant6100

    29 күн бұрын

    एक्दम बरोबर, yeees

  • @alkatai4285
    @alkatai428528 күн бұрын

    तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघते.आज पहिल्यांदा मी कमेंट केली .आजचा बिषय हा सगळ्या महिलांना मुलींना खूपच प्रेरणादायी आहे.काही बायका हा व्हिडिओ पाहून नक्कीच डिप्रेशन मधून बाहेर पडतील.खूप छान वाटले ९८% .❤❤

  • @sonalkadam9308
    @sonalkadam93085 күн бұрын

    तुमचा सर्वात शेवटी मांडलेला मुद्दा .."नवरा सर्वस्व नसून..आपल्या आयुष्यातला एक भाग आहे.." या दृष्टिकोनातून विचार केला तर सगळं सोपं वाटायला लागतं..❤❤ Thank you madam 🙏

  • @artikendale3327
    @artikendale33273 күн бұрын

    तुम्हाला ऐकत असताना आई बोलत आहे असच वाटलं 😢😢😢😢😢😢 thank you so much..... कारण सध्या ह्या phese मधून मी जात आहे

  • @sandhyamore2402
    @sandhyamore240229 күн бұрын

    लग्नाला 24 वर्ष पूर्ण झाली , ती सगळी वर्ष तुमच्या बोलण्याने झरझर समोर येऊन गेली, अगदी मनातले सांगितले मॅडम तुम्ही

  • @shubhasambare2340
    @shubhasambare234029 күн бұрын

    मॅडम आज तुम्ही खूपच छान दिसता आहात.नवरा हा आपल्या संसाराचा एक भाग आहे हा विचार तंतोतत पटला.

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani896329 күн бұрын

    तीस वर्षां पुर्वी चे दिवस आठवले,😢😊आज मागे वळून बघता आनंद आहे, अगदी बरोबर विचार मांडले आहेत ताई.❤❤

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa607629 күн бұрын

    चांगले सांगितले ताई तुम्ही,विषयही छान घेतला.लग्न झाल्यावर नव्याचे नऊ दिवस संपल्यावर रुटीन लाईफ चालू होते.नवऱ्यालाही बायकी विषयात रस नसतो ,बायको आता नेहमीची आहे म्हणून दुर्लक्ष होते.त्याच्याही आयुष्यात नवे पर्व सुरू होते,अचानक येऊन पडलेल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या पेलताना तारेवरची कसरत होते.तो एक कुटुंबातील घटक आहे हे तुम्ही सांगितले ते खरे आहे.प्रत्येक व्यक्तीला स्पेस हवी.बायकांनी हळूहळू नवनवीन गोष्टी शिकणे ,छंद जोपासणे मैत्रिणी जोडणे करायला हवे.

  • @anjalipatil69420
    @anjalipatil6942029 күн бұрын

    अस वाटलं की मी 23 वर्ष मागे गेली की काय, सेम असाच अनुभव माझा देखील आहे मॅडम,मिस्टर आणि मी सोबत बसून ऐकत होतो आजचा व्हिडीओ, खूप हसलो व्हिडीओ ऐकून😂😂 पण मी खचले नाही, एकटीनं मुलं मोठी केली, मिस्टरांना पण साथ दिली, त्यांची phd पण पूर्ण झाली, आज कॉलेज चे प्रिन्सिपल आहेत ते, छोटंस घर, गाडी, दोन मुलं असा छान संसार आहे, आणि महत्वाचे म्हणजे मिस्टर मला आता वेळ द्यायला लागले आहेत, थोडी घरात पण मदत करतात❤❤😅खूप छान सल्ला दिला तुम्ही आज, असं जर प्रत्येकच मुलीला तिच्या घरच्यांनी सांगितले तर किती सुखाचे होतील ना संसार🙏🙏

  • @sujatapansare7648
    @sujatapansare764829 күн бұрын

    आज खूपच सुंदर दिसत होता,प्रत्येक स्त्री च्या मनातील विचार मांडलेत, ❤

  • @seemaaras5671
    @seemaaras567129 күн бұрын

    सेम माझ्याकडे आहे मी बोलकी आणि नवरा अबोल खूप वेळा मला कंटाळा येतो काय करावे कारण आता कोण कोणालाही बदलू शकत नाही😔

  • @SrushtiKambale-u2x

    @SrushtiKambale-u2x

    Күн бұрын

    Same

  • @anuradhadubal4185

    @anuradhadubal4185

    20 сағат бұрын

    Same

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge807629 күн бұрын

    लग्न म्हणजे परत जन्म असतो व तसे जीवन जगावे.

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye166914 күн бұрын

    छान विषय घेतला आहात डाॕक्टर मॕडम.हल्लीच्या काळाता शिक्षण ,नोकरी ,व्यवसायाच्या निमित्ताने मुलं ,पुरुषही आपलं घर ,आई ,वडिल ,भावंडांना सोडून दूर राहतात.लग्नानंतर खरंय मुलीचं आयुष्य बदलून जातं. आमच्या लग्नाला आता 36 वर्षे झाली. माझं वय आता 59 वर्षे. आमचं संसारी जीवन सगळं आठवलं .आताच्या काही सुना,तिच्या माहेरची मात्र तिच्या नवर्याला ,तिच्या सासरच्यांना सगळं त्यांच्या स्वतःच्या मनासारखं करायला ,वागायला लावतात.आणि नवरा आणि त्याचे आई ,वडिल सुनेचं,तिच्या माहेरच्यांचं नाईलाजाने का होईना ऐकत जातात /ऐकावं लागतंच. 😢

  • @archanadandekar6583
    @archanadandekar658329 күн бұрын

    जय श्रीराम, अनघा ताई तुमचा आजचा विषय ,प्रत्येकाच्या जुन्या आठवणींचा आहे!तुम्ही हिरव्या गार साडीत कोल्हापुरी साज घातलेल्या छान दिसताय!

  • @anjaliagate8557
    @anjaliagate855729 күн бұрын

    माझं लग्न झालं तेव्हा मी सासूसासरे दीर नणंद यांचेसोबत राहात होते . छान खेळीमेळीचे म्हणता नाही येणार पण आनंदात होते . त्यावेळी - ७५ - ७६ सालची गोष्ट - वर्तमानपत्रात एक तरी बातमी सुनेला रॉकेल टाकून जाळण्यात आल्याची बातमी असायचीच . आमचे घरात गॅस बरोबरच स्टोव्ह व चूलही असायची . एकदा ५ लि रॉकेलचा कॅन घरी आणला होता आणि माझी घाबरगुंडी उडाली होती . ते बघून माझ्या सासूबाई हसतच सुटल्या . माझ्या खांद्यावर हलकीशी थापट मारून वेडाबाई म्हणाल्या व थोडे थोपटल्या सारखे केले . मग मात्र मी आश्वस्त व निर्धास्त झाले . आजचा विषय सर्वच नवविवाहीतांसाठी relevant आहे .❤

  • @nehaathavale6439
    @nehaathavale643929 күн бұрын

    आज तुम्ही खूप छान दिसताय. 👌 आजच्या विषयाशी पूर्ण सहमत. 👍

  • @anujabal4797
    @anujabal479729 күн бұрын

    एक वेगळाच विषय उत्तम रीतीने सादर केलात त्याबद्दल खूप धन्यवाद व्यावहारिक विषय आहे

  • @shilpajaisinghani7201
    @shilpajaisinghani720129 күн бұрын

    Beautifully explained doctor. Much needed in the society as a happy woman will create happy home

  • @alkapatil6375
    @alkapatil637529 күн бұрын

    अनघा. ताईआज छान दिसत आहे तुम्ही 🙏😂 इ पण माझी साडी अशीच आहे ती आज शोधूनच काढते आणी उद्या पासून नेसेन 😄

  • @user-cx9er4mh1i
    @user-cx9er4mh1i29 күн бұрын

    देवाच्या कृपेने मला मात्र नवरा देवमाणूस मिळाला..मी प्रयत्न करते की माझ्यापासून त्यांना कोणताही त्रास न व्हावा 😊

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni318629 күн бұрын

    Mast bolalat madam. Tarun mulini aikan khup garajech aahe.

  • @mangalkonale2422
    @mangalkonale242228 күн бұрын

    आजचा विडिओ अतिशय सुंदर. तक्रार न म्हणता परिस्थिती असते. नवरा म्हणजे सर्वस्व नाही हा गोड गैरसमज कळाला. आज नितांत सुंदर दिसलात. ❤

  • @bharatilad6818
    @bharatilad681826 күн бұрын

    अगदी शंभर टक्के खर आहे. आपले जीवन हे तडजोडी चे आहे तरी सर्व संभाळून एन्जॉय करू करतो करायला हवे. ❤❤👍👌👌👌🙏

  • @pradnyarane748
    @pradnyarane74829 күн бұрын

    मॅडम खूप छान माहिती 🎉

  • @vedikarane9544
    @vedikarane954429 күн бұрын

    खूप सुंदर सांगितलं डॉक्टर👍🏻खरंच अशा विषयांवर बोलण्याची खूप गरज आहे आजच्या काळात. असेच अगदी साधे सरळ मामुली वाटणारे प्रश्न, पण प्रत्येकाच्या आयुष्यात खूप नकारात्मक बदल घडवत असतात. असे विषय घेऊन येत जा. खूप सुंदर समजावून सांगता तुम्ही 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke157929 күн бұрын

    Waa..Ajcha vishay Chan ahe..Agdi khare ahe..Apan Mast ahe te swikaroon Enjoy karave Heche khare ahe..99%navre asech astat..sodun Devon pudhe jayche va Mast jagayche..Nice thought...

  • @samhitashomelykitchen7589
    @samhitashomelykitchen758929 күн бұрын

    Doctor tai, insightful talk.

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar441123 күн бұрын

    खूप छान👏✊👍 विषय, तुम्ही खूप strong आहात, धन्यवाद😘💕 खूप शिकायला मिळते🎉❤

  • @seemadhiwar7825
    @seemadhiwar782528 күн бұрын

    Khup chan sagitale Thanks

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar208829 күн бұрын

    Khup Chan vishay mandalat ❤

  • @apekshadalvi2904
    @apekshadalvi290423 күн бұрын

    Khup marmik vedio...me dekhil hach vichar karun khup dukhi vhayache..pan tumacha vedio baghun navin drushtikon milala.thank you

  • @prajaktabhagwat8540
    @prajaktabhagwat854023 күн бұрын

    खूपच छान विषय मांडलात तुम्ही madam. मी अशा पद्धतीने कधी विचारच केला नाही. पण तुमचं बोलणं अगदी 100% पटलं

  • @harshabhosale7430
    @harshabhosale743029 күн бұрын

    Khup,chan,sangitale,thankyou

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar208829 күн бұрын

    Wow Mam khupch Chan disat ahat aj . Mazi same Ashi sadi ahe.

  • @kanchanharpale8101
    @kanchanharpale81019 күн бұрын

    नेकलेस खूप सुंदर... Looking beautiful...🙂

  • @mangalshind
    @mangalshind28 күн бұрын

    खरंच तुमचे विचार आवडतात म्हणून मी सगळे तुमचे व्हिडिओ बघते आम्ही पाच सहा जणी म्हणजे सात आठ दहा जणी मैत्रिणी आहोत ग्रुपचे खूप मोठा

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni861929 күн бұрын

    नेहमी प्रमाणे छान विषय

  • @jayshrikhairnar3966
    @jayshrikhairnar396629 күн бұрын

    Video ची सुरवात खुप मस्त, तुम्ही viewres ला खुप छान समजुन घेता .आजचा विषय खूप सुंदर ❤

  • @vijayasalve250
    @vijayasalve25029 күн бұрын

    Mam Namste khoooopch chan marg darshan kele

  • @saritajoshi1171
    @saritajoshi117129 күн бұрын

    नमस्कार डॉ सौ आणघा ताई आजचा व्हिडीओ खुपच सुंदर आहे नवरा आपला सर्वस्व नाही तो कुंटुबाचा एक भाग आहे अगदि बरोबरच आहे तुमच्या विचाराशी मी पुर्णपणे सहमत आहे धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी

  • @shital4388
    @shital438829 күн бұрын

    Madam tumche sarv vedio chan astatach Pn asjach vedio sarvach striyana motivanal asanar ahe he nakki Thank you🌹🌹🙏🙏

  • @samhitashomelykitchen7589
    @samhitashomelykitchen758929 күн бұрын

    Looking beautiful doctor tai ❤

  • @sarojsagwekar6667
    @sarojsagwekar666729 күн бұрын

    Nicely Explanation

  • @rekhashetty5567
    @rekhashetty556729 күн бұрын

    शंभर टक्के बरोबर आहे आम्ही तर लग्न झाल्यावर joint family मधे गेलो तो.प्रचंड त्रास होता नवऱ्याला मी विनवणी करत असे. फक्त रविवारी बाहेर न्या तेही नहीमुंबई सारख्या शहरात आम्हाला काय समजणार जाने येणे त्यात लगेच मूल झाले माहेरी बोंब सासरी पण तेच नवऱ्याबरोबर बाहेर जाणे म्हणजे शिक्षाच तो कधी बाहेर खाऊ देत नाहिकाय विकत घेऊन देत नाही मग n गेलेलेच बरे. आत्ता मी माझी friend Ani वहिनी बरोबर बाहेर जाते एन्जॉय करते मुलाचे करिअर ही मी च केले तो इंजिनीयर आहे आमची आजी म्हणायची नवऱ्याचा काही तसा उपयोग होत नाही पण एखादे मूल झाले तर त्यात आपले आयुष्य छान जाते 😂😂😂😂😂

  • @pavantayade4529

    @pavantayade4529

    29 күн бұрын

    Hi

  • @jayshreegandhi6656

    @jayshreegandhi6656

    20 күн бұрын

    नवर्याचा तसा काही उपयोग नाही खरेच नुसता त्रास ,व्यसनी बाहेरख्याली असतील तर आणखीणच

  • @ulhaskulkarni2912
    @ulhaskulkarni291228 күн бұрын

    खूप सुंदर विचार मांडला आहे

  • @manalimirajkar6975
    @manalimirajkar697526 күн бұрын

    उपयुक्त माहिती

  • @ushawadikar
    @ushawadikar29 күн бұрын

    Khup Sundar vichar mandle ma'am..😊

  • @swatikarekar3544
    @swatikarekar354429 күн бұрын

    आज तुम्ही खूप खूप खूप सुंदर दिसत आहात. 😊 व्हिडिओ पण सुंदर.

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar895029 күн бұрын

    Tumi ek asi KZread hai sagle subject bolte kup Chan vatte

  • @HareshwarRaut
    @HareshwarRaut28 күн бұрын

    Aajacha vishay farach chaan mam .mala ani mazya mrs la pan khup avadla ani patla suddha amhi doghahi aple vidio pahatoy.

  • @shashikalagunjal3715
    @shashikalagunjal371529 күн бұрын

    Vishay chan ahe majhya. Barobar. Hech. Jhal

  • @mugdhamahashabde5111
    @mugdhamahashabde511126 күн бұрын

    Wah madam chan vishay ghetla aaj ... 💯 Sahamat.. Khup sundar disatay 👌😊❤

  • @mahanandamukhade4985
    @mahanandamukhade49857 күн бұрын

    मी पण ९८% मधलीच आहे.😂 पण माझ्या धाकट्या जाऊबाई मात्र भाग्यवान आहेत.,.

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar587628 күн бұрын

    Mast caha kaku video tar dupari cha baghitla pan comment atta kartey,agdi barobar mahnala.👌👌👌👌

  • @laxmanjain8416
    @laxmanjain84167 күн бұрын

    Khub chaan V D O Agade 100/- kharey ahey Mee Sudhaa Tumacha Sarakha Aanubhva gheytala Mee Sudha Class One Officer ahey Aajacha Subjet Nise Hota Tumee Aaj khub Chaaan Deseat Aahaa ❤😊❤ Dr ❤

  • @Crochet_with_Neha
    @Crochet_with_Neha29 күн бұрын

    आज तुम्ही जे बोललात ते सगळे माझेच अनुभव सांगत आहात असे वाटत होते मी या सगळ्यातून गेली आहे माझी तरुण मुलगीही तुमचे व्हिडिओ माझ्या सोबत बसून बघते .ती ही मला म्हणायला लागली आई बरोबर आहे एका नवऱ्यासाठी आपण आपलं सगळं विश्व का बदलून टाकायचं तुमचे व्हिडिओ बघून मुली विचार करायला लागल्या आहेत किंवा मनाची तयारी करतील की नवरा हेच विश्व नसते.

  • @FunnySailingShip-sy7tq

    @FunnySailingShip-sy7tq

    23 күн бұрын

    अगं नवराच काही सगळं आपल्या सर्वस्व नसतो, नवरा एक कुटुंबाचा भाग असतो, आपल्याला आपला आनंद कसा शोधता येईल ते बघायचं ,आपलं करिअर शिक्षण नसेल तर टेलरिंग करायचं काही कामात मन रंमवायचा नवऱ्याकडून अपेक्षा करू नका, त्यांना पण संसाराची जबाबदारी आहे म्हणून ते कामावर जातात आपण उगाच गृहीत धरून चालतो की माझा नवरा काम काम करतो, पण काम केल्याशिवाय खायला कसं भेटणार आपण सुखात रहावं सावलीत राव म्हणूनच ते काम करतात ना.नवरा काही वाईट नसत़ो. आपण समजून घ्यायचं.

  • @manishamore458
    @manishamore45824 күн бұрын

    98% अगदी बरोबर खूप छान विषय

  • @user-fm3oj3md1e
    @user-fm3oj3md1e29 күн бұрын

    अगदी असेच आहे, pn mi aata enjoy karte tumche video baghun mam, today you look very nice mam❤❤

  • @mansiDeshpande-nf9sk
    @mansiDeshpande-nf9sk29 күн бұрын

    Khup chan vishay ahe

  • @swapnalighadigaonkar5373
    @swapnalighadigaonkar537329 күн бұрын

    Aaj sunder disat aahat madam .

  • @rajshrilohiya2406
    @rajshrilohiya240628 күн бұрын

    मॅडम आज खूप छान दिसत आहात विषय खूप चांगला

  • @user-dv7rt6gb4f
    @user-dv7rt6gb4f29 күн бұрын

    अगदी खरंय असते कोणा कोणाच्या आयुष्यात

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar476127 күн бұрын

    छान विषय मांडला आहे.

  • @mayabhosale2680
    @mayabhosale268029 күн бұрын

    बरोबर खुप छान व्हिडिओ मॅडम छान दिसत आहात

  • @shubhangijadhav1878
    @shubhangijadhav187828 күн бұрын

    Mam khup chaan destay ❤❤❤ vdo khup aavdla👌👌👌

  • @surekhathote4886
    @surekhathote488629 күн бұрын

    आजचा विषय आणि video मस्त ,छान ,एकदम छान

  • @sureshshinde104
    @sureshshinde10429 күн бұрын

    नमस्कार ताई 🙏🙏

  • @alkamundhekar4654
    @alkamundhekar465429 күн бұрын

    आजचा विषय खूप छान होता.😊

  • @anjalimungre7878
    @anjalimungre787829 күн бұрын

    Mala aapli sadi aani ghatlele sarvha dagine pan khup kuph aavdale aaj khach tai tuhmi chan disata aani tumache vicharhi khup chan aani aavadnare samajnare aahet .

  • @truptikulkarni2609
    @truptikulkarni260928 күн бұрын

    Can you talk about shingles vaccines (nagin) to be taken by age 50 and older. I recently had it and it’s extremely painful.

  • @meghadesai2416
    @meghadesai241629 күн бұрын

    नमस्ते,अनघाताई, आजच्या विषय छान.आहे.आज तुम्ही खूप तेजस्वी दिसत आहात.मेम , तुमचं प्रेम विवाह तरी पण तुम्ही ९८ ०/० मघे तर आम्ही तर बघण्यांचया कार्यक्रमांतून लग्न झालेल्या 😢 आमची काय अवस्था असेल? एकत्र कुटुंबात नवऱ्याच्या साथाची खुप गरज असते,मुलं झाल्यावर तर खूप गरज असते पण त्यांना अजिबात वेळ नसतो, मुलांच्या आजारपणां त्यांना पर्वा नसते . स्त्रीने एकटीने सगळं पेलाव लागते, म्हणून तर स्त्रीला क्षणांची पत्नी आणि अनंत काळांची माता म्हटलं जाते.मुलांच करण्यात स्त्रींच B A बा आणि M A मां होउन जाते.पुर्ण आयुष्य घालवल्या नंतर पण नवरा बायको एकदूसर्याना ओळखु शकत नाही.😅

  • @shrutisawant4825
    @shrutisawant482529 күн бұрын

    Khup Chan. ❤

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare657528 күн бұрын

    खूप छांन दिसता य आट्यानऊ टके हे आगदी खर आहे धनवाद आपला आंनद सोधला पायजे

  • @anushkadiwanji6225
    @anushkadiwanji622528 күн бұрын

    खुप छान विषय मांडला मॅडम

  • @vaishalidongre7025
    @vaishalidongre702529 күн бұрын

    खरेच सांगितलं ताई तुम्ही

  • @bluwin7546
    @bluwin754628 күн бұрын

    Mam aajcha visya khup chaan mam Sadi aani baujj mast mala tumche video khup aavdtat

  • @rajanij6898
    @rajanij689829 күн бұрын

    Khup chan video❤❤

  • @sarikaadsul5008
    @sarikaadsul500829 күн бұрын

    Khup.chan madam👌🏾👌🏾🙏

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni546129 күн бұрын

    तुमचे व्हिडिओ बघून समज आली

  • @user-br7fy9gj7o
    @user-br7fy9gj7o29 күн бұрын

    Barobar aahe. Chhanv vishay aahe.

  • @mayaharak4843
    @mayaharak484329 күн бұрын

    Barobar

  • @youtubelady177
    @youtubelady17726 күн бұрын

    खुप छान विषय 👍

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling310229 күн бұрын

    माझ्यावर माझ्या नवऱ्याने कधीच बंधने घातली नाहीत तुला जे करायचे तर असे तो नेहमीच सांगत असतो.एक फोन केला की भाजी किराणा घरात येतो पण मी एक,दिवसा आड तरी मार्केट मध्ये फेरी मारून येते.कधी आम्ही दोघे पण जातो.पूर्वी नोकरी करताना त्याची फिरती असायची त्यामुळे घरची सगळी जबाबदारी माझीच होती.अजूनही आहे.पूर्वी आम्ही खूप फिरायचो पण सध्या माझी बेड ridden आई माझ्या कडे असल्याने आम्ही अडकले आहोत.तरी एखाद्या संध्यकाळी आम्ही नरिमन पॉईंट ला फिरून येतो.एकमेकांना वेळ देतो .

  • @vasudhakhandeparkar8626
    @vasudhakhandeparkar862629 күн бұрын

    Ajacha vedio maje sathi hota ki Kai Asa vatala Mala khoopach schan vedio hota ajacha❤.mam mast diste tumi saree khupach mast ahe

  • @hemanginisalvador8981
    @hemanginisalvador898128 күн бұрын

    एकदम बरोबर आहे

  • @queenroopali
    @queenroopali29 күн бұрын

    Good topic ❤ looking good with lovely saree and necklace ❤

  • @jayshreegandhi6656
    @jayshreegandhi665620 күн бұрын

    आताची पिढी वेगळी आहे सूना सरळ सरळ कामटाळूपणा करतात,नवर्याला करायला सांगतात आणि नवरे पण करतात.

  • @user-cb6jj6sy5h
    @user-cb6jj6sy5h11 күн бұрын

    Ho maze pn ase h aho khi frak PDT nhi navrala

  • @prajaktakhatavkar4136
    @prajaktakhatavkar413628 күн бұрын

    Mala pn madam same asa zale aahe mazi pahili mulgi 6 year achi aahe Ani ata 7 month cha bal aahe maza navara pn kamaninita baher asto ektine handle hot nahi mlahi as dipression alyasarkh vatat aahe kahich suchat nahi shikshan asun kahi upyog nahi

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge807629 күн бұрын

    नवरा हा कुटुंबाचा एक घटक असतो तो फक्त बायकोचा नसतो त्याच्या वर बर्याच जबाबदार्या असतात.

  • @kajalchavan7039
    @kajalchavan703926 күн бұрын

    Mazya laganala 10 varsh zale yanna baher padalel avadat navhate ani atta baher padanyasathi fors karatat ani atta mala baher padayla confidence nasato yek prakarchi bhiti vatate karan mala aattaparyant ghar hech comfort zone hot pn atta mala baher khup an comfortable vatate

  • @anitaraval1660
    @anitaraval166029 күн бұрын

    मॅडम आज खूप सुंदर दिसत आहेत खूप छान व्हिडियो

  • @rekhayadav4494
    @rekhayadav44944 күн бұрын

    Madam namskar tumhi agadi mahilanchya manatil vishay gheta me tumche vidio baghte

Келесі