मनःशांतीसाठी करुणात्रिपदी
आपल्या शीतल प्रभावाने सकलजनांचे कल्याण करणारी कृष्णामाता आणि तिच्या भगिनींचा प्रकोप झाल्याने महाराष्ट्रावर महापुराचे भीषण संकट आले आहे. महापूर ओसरला असला तरी सर्वांगीण पुनर्वसन ही एक दीर्घकालीन प्रक्रिया असणार आहे. या संकटात सापडलेल्या बंधू भगिनींचे पुनर्वसन व्हावे, त्यांच्या वेदनांचा भर हलका व्हावा यासाठी सर्व महाराष्ट्र त्यांच्या मदतीस धावून आला आहे. भौतिक मदतीबरोबरच त्यांना आत्मिक बळ लाभावे, मनःशांती लाभावी, त्यांच्या जीवनाची विस्कटलेली घडी सावरावी यासाठीं यासाठी आपण श्रीदत्तप्रभूंशिवाय आणखी कोणाची आळवणी करणार? यासाठी प्रभावी उपायही प. प. वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामीमहाराजांनी ‘करुणात्रिपदी’च्या स्वरुपात उपलब्ध करून दिला आहे. संकटात सापडलेल्या आपल्या बंधूभगिनींच्या कल्याणासाठी, त्यांना मनःशांती लाभावी यासाठी सर्व सद्भक्तानी करुणात्रिपदीचा पाठ शक्य तितक्या अधिक संख्येने करावा असे आवाहन श्रीवासुदेव निवासतर्फे करण्यात येत आहे.
।।श्रीकरुणात्रिपदी।।
शांत हो श्रीगुरुदत्ता। मम चित्ता शमवी आतां।।ध्रु०।।
तूं केवळ माता जनिता। सर्वथा तूं हितकर्ता।।
तूं आप्तस्वजन भ्राता। सर्वथा तूचि त्राता।।
(चाल) भयकर्ता तूं भयहर्ता। दंडधर्ता तूं परिपाता। तुजवाचुनि न दुजी वार्ता।
तूं आर्ता आश्रय दत्ता।। शांत हो श्रीगुरुदत्ता. ।।१।।
अपराधास्तव गुरुनाथा। जरि दंडा धरिसी यथार्था।।
तरि आम्ही गाउनि गाथा। तव चरणीं नमवूं माथा।।
(चाल) तूं तथापि दंडिसी देवा। कोणाचा मग करूं धावा? सोडविता दुसरा तेव्हां।
कोण दत्ता आम्हां त्राता? शांत हो श्रीगुरुदत्ता. ।।२।।
तूं नटसा होउनि कोपी। दंडितांहि आम्ही पापी।
पुनरपिही चुकत तथापि। आम्हांवरि नच संतापी।।
(चाल) गच्छतः स्खलनं क्वापि। असें मानुनि नच हो कोपी। निजकृपालेशा ओपी।
आम्हांवरि तूं भगवंता।। शांत हो श्रीगुरुदत्ता. ।।३।।
तव पदरीं असता ताता। आडमार्गीं पाऊल पडतां।
सांभाळुनि मार्गावरता। आणिता न दूजा त्राता।
(चाल) निजबिरुदा आणुनि चित्ता। तूं पतीतपावन दत्ता। वळे आतां आम्हांवरता।
करुणाघन तूं गुरुनाथा।। शांत हो श्रीगुरुदत्ता. ।।४।।
सहकुटुंब सहपरिवार। दास आम्ही हें घरदार।
तव पदी अर्पुं असार। संसाराहित हा भार।
(चाल) परिहरिसी करुणासिंधो। तूं दीनानाथ सुबंधो। आम्हां अघलेश न बाधो।
वासुदेव प्रार्थित दत्ता।। शांत हो श्रीगुरुदत्ता। मम चित्ता शमवी आतां।।५।।
श्रीगुरुदत्ता जय भगवंता। तें मन निष्ठुर न करी आता।।ध्रु०।।
चोरें द्विजासी मारीतां मन जें। कळवळलें तें कळवळो आतां।। श्रीगुरुदत्ता।।१।।
पोटशूळानें द्विज तडफडतां। कळवळलें तें कळवळो आतां।। श्रीगुरुदत्ता।।२।।
द्विजसुत मरता वळलें तें मन। हो कीं उदासीन न वळे आतां।। श्रीगुरुदत्ता।।३।।
सतिपति मरता काकुळती येतां। वळलें तें मन न वळे कीं आतां।। श्रीगुरुदत्ता।।४।।
श्रीगुरुदत्ता त्यजि निष्ठुरता। कोमल चित्ता वळवी आतां।। श्रीगुरुदत्ता।।५।।
जय करुणाघन निजजनजीवन। अनसूयानंदन पाहि जनार्दन।।ध्रु०।।
निजअपराधें उफराटी दृष्टी। होउनि पोटीं भय धरूं पावन।।१।।जय०।।
तूं करुणाकर कधीं आम्हांवर। रुसशी न किंकर-वरदकृपाघन।।२।।जय०।।
वारी अपराध तूं मायबाप। तव मनीं कोपलेश न वामन।।३।।जय०।।
बालकापराधा गणे जरी माता। तरी कोण त्राता देईल जीवन।।४।।जय०।।
प्रार्थी वासुदेव पदिं ठेवी भाव। पदीं देवो ठाव देव अत्रिनंदन।।५।।जय०।।
Пікірлер: 58
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹चांगले वाटले . श्री टेंब्ये स्वामी महाराज यांनी लिहलेला प्रत्येक शब्द दत्त आहे , सार्थ आहे आणी कल्याणकारी आहे. 🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🎉🎉
Jay Shri Gurudev Datta 🙏
श्री गुरुदेव दत्त ❤❤
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌿🌿🙏🙏🙏🌿🌿
Khup chan 👌👌🙏🙏
गुरू माऊली मला करुणात्रिपदी खूप आवडते जास्तीत जास्त आम्हां सर्वांना अध्यात्मात वाटचाल करण्यासाठी मार्ग दर्शन करावे 🙏 ही नम्र विनंती. धन्यवाद
Atishay sundar ❤
श्री गुरुदेव दत्त 🙏
Shree gurudev datta 🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻JAY GURUDEV
Jay Gurudev datt 🙏🙏
जय गुरू देव
👏श्री गुरुदेवदत्त👏
🙏🙏🙏 Pranam Guruji 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
श्री गुरु शरणं 🙏
Shree gurudev datt
जय गुरुदेव!!!!!!
CharanSparsh 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
Jay gurudev datta
Shri Gurudev datta
Shri Gurudev Datta🙏🙏
श्रीगुरू:sharanam!👌💐👌
|| श्री गुरुदेव दत्त ||
गुरुदेव दत्त.
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏
|| श्री गुरुदेव दत्त ||🙏🙏🙏
जयश्री गुरु देवदत्त
Shri Gurudev Datta
श्री गुरूदेव दत्त जय गुरूदेव दत्त
Omm drammm....
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर ा
Shree gurdevdatta
Shri gurudev datt 🙏🙏🙏🙏🍓🍓🍓🍎🍎👍🏼👍🏼👍🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Shri gurudev dutt
🙏
👌🏻🙏🌹🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@nitinpatil2114
4 жыл бұрын
Hari Om
@prakashgiramkar5319
4 жыл бұрын
Omm drammm
@rudrabhagvantnimkarde8778
4 жыл бұрын
ओम् द्रां .
Jai shree Gurudev Datt
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
🙇🏼♀️🌷☘️🎊🪔❤️🚩 अर्चना दत्तात्रेय बारडकर
🙏🙏🙏🙏🙏😃👌🙏🙏
Karuna Tripadicha Arth milel ka pl
Jay guru devdutt Shree Swami Samarth Hindi or Gujarati available this stort ?
।। जय जय रामकृष्ण हरी ।। 🙏राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे | सहस्र नाम ततुल्यं राम नाम वरानने ||
Please, हिन्दीमें महिति देनेकि कृपा क़रो. गुरुदेवदत्त 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
Shri Gurudev Datta
🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त