Majha Katta With Maithili Thakur Full Episode: सोशल मीडिया गाजवणाऱ्या मैथिली ठाकूरसोबत 'माझा कट्टा'

#MajhaKatta #MaithiliThakur #abpmajha #abpमाझा #marathinews #diwali202
दीपोत्सवाच्या निमित्ताने एबीपी माझावरही विविधरंगी, विविधढंगी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दिवाळी पहाटसारखे सुरेल सांगितिक कार्यक्रम असतीलच पण त्याचबरोबर माझाच्या कट्ट्यावरही खास पाहुणे आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येतोय. माझा कट्टा रंगणार आहे सोशल मीडियावर प्रचंड गाजणाऱ्या गायिका मैथिली ठाकूर हिच्यासोबत.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 681

  • @ShubhamBROADCASTING
    @ShubhamBROADCASTING Жыл бұрын

    संपूर्ण कट्टा टीमचे अभिनंदन. मैथिली सारेगमप मध्ये सहभागी झाली होती, प्रतिभा असूनही दुर्लक्षीत राहीली. फेसबुक व इतर माध्यमातून प्रसिद्ध झाली.... पण मुळ संस्कृती व संस्कार तीनं कधी सोडले नाहीत. तीनं माझे माहेर पंढरी हे पहिले मराठी गीत गायले होते खूप छान वाटले. आता तर मराठी समजायला लागले आहे. Keep it up. आपले भविष्य उज्ज्वल आहे.

  • @Me_me.2.0
    @Me_me.2.0 Жыл бұрын

    ती मराठी भाषिक नसूनही, तिचं एवढं सुंदर मराठी उच्चारण ऐकून आनंद वाटला 🤗. तरुणाई ला आपल्या संस्कृती शी जोडणाऱ्या या सुंदर गायिकेचा मला नेहमीच अभिमान वाटतो 🥰. जय महाराष्ट्र ❤️ जय बिहार

  • @prakashyadav8086
    @prakashyadav8086 Жыл бұрын

    लहान वयात ख्यातनाम गायक , वादक यांच्या रांगेत आपल्या भावंडाना बसवणाऱ्या आपल्या जन्मदात्या लाख लाख सलाम.

  • @lalitapawar2715
    @lalitapawar2715 Жыл бұрын

    ‌मैथिली आणि तिच्या परिवाराचे हार्दिक अभिनंदन.दिवाळीची छान मेजवानी दिली.असेच यश किर्ती उदंड लाभो.

  • @baba_raoo
    @baba_raoo Жыл бұрын

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांना पुन्हा एकदा उजळनी बसली. खुप छान मैथीली ठाकुर 💐💐

  • @bapukudale5265
    @bapukudale5265 Жыл бұрын

    मैथिली मराठी मुलगी नसून सुध्दा मराठी गाणी गाते . ह्या मुलीचा महाराष्ट्रातील तरुणाईने बोध घ्यावा ही कळकळीची विनंती 🙏🙏🙏 धन्यवाद जय महाराष्ट्र 👍👍👍

  • @putin6893
    @putin6893 Жыл бұрын

    धन्य आहेत ते आई वडील अशा मुलीला जन्म दिला मैथिली तू महान आहेस .तुझी गातेस तेव्हा मन प्रसन्न होतो अंतर्मन तृप्त होतो .💖🙏

  • @sadayarkoil
    @sadayarkoil Жыл бұрын

    I am Tamil. She has sung Tamil Songs called "Kannaana Kanne and Munbe Vaa" Maithili God Bless You

  • @ushadoorkar5743
    @ushadoorkar5743 Жыл бұрын

    माझी अतिशय आवडती गायिका.

  • @sitarambhunde253
    @sitarambhunde253 Жыл бұрын

    मी सिताराम मुंडे अंध आहे ही आपली नेहमीच माझा कट्टा ऐकत असतो आणि आज तुम्ही मैथिली मॅडमची मुलाखत ऐकवली खूप कमी वेळात आत्मसात केलेले आणि उच्च त्यामुळे खूप बरं वाटलं तुम्ही सर्वच टीम एबीपी माझा खूप छान मुलाखत घेत असता आणि नेहमी मी ऐकतो आपल्या एबीपी माझा कट्टा कट्टा त्याबद्दल धन्यवाद

  • @justmyviews8626
    @justmyviews8626 Жыл бұрын

    साक्षात सरस्वती देवी अवंतरली आज माझा कट्ट्यावर....🙏

  • @dayanandpatil6564
    @dayanandpatil6564 Жыл бұрын

    सर्व प्रथम माझा कट्टा चे खूप खूप आभार.

  • @byateen1
    @byateen1 Жыл бұрын

    वाह...आताच्या तरुणाईत अशी मुलं सुद्धा असतात हे बघून खुप बरं वाटतं.

  • @Jyoti-ck3iy
    @Jyoti-ck3iy Жыл бұрын

    आमच्या काही मराठी गायकांना पैशासाठी इतर भाषा प्रिय वाटते ..आणि इथे बघा ही मुलगी मैथिली खरंच तिचे कितीही कौतुक केले तरी कमी आहे...

  • @avinashkale3162
    @avinashkale3162 Жыл бұрын

    अभिनंदन मैत्री अशीच वाटचाल पुढे असू दे आणि तुझ्या आयुष्याचे करियर तू स्वतः आणि तुझ्या आई-वडिलांनी घडवलेले खूप अभिमानास्पद आहे अशा लोकांची आज-काल देशाला गरज आहे आणि विशेष म्हणजे त्या आई-वडिलांचे आभार मानायला पाहिजे कारण तसे घडवण्यासाठी मुलं आजकालची तुमच्या विचाराने चालणारे नाहीयेत आणि त्या वाटेवर तुम्ही चालला त्याचे खूप अभिमान आहे आणि एबीपी माझा अशा व्यक्तीला बोलवून आणि कार्यक्रम आपल्या कट्ट्यावरती केल्याबद्दल अनेकांच्या मनामध्ये ऊर्जा भरणारी आहे आणि अशीच असावी एबीपी माझा खूप आभार

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 Жыл бұрын

    मनी नाही भाव ऐकताना अंगावर काटा आला...क्या बात है...खूप शिकण्यासारखं आहे...काय भाव आहे गाण्यात!!!

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 Жыл бұрын

    खूप गोड गायिका 👍

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Жыл бұрын

    राजकारण्यांच्या मुलाखती घेऊन वेळ वाया घालवण्यापेक्षा अशा गुणी कलावंतांची मुलाखत घ्या

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 Жыл бұрын

    मैथिली चे भजन गाणे मी नेहमी ऐकत असते जरी हिंदीत असले तरी. खूप आवाज गोड मनापासून गाते. खूप खूप आवडते मला ती. मी तिचे भजन लिहून सुद्धा घेते. खूप गोड आहे मैथिली तू. भगवंत तुला सतत आवाज देत राहो आणि नेहमी तू गात रहावस अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करते. धन्यवाद बेटा मैथिली.

  • @Arundaungesambhajinagar
    @Arundaungesambhajinagar Жыл бұрын

    आजच्या काळात ह्या हरहुन्नरी गायिकेला पंडिता भिमासेनबाई जोशी म्हटले तर वावगे ठरणार नाही,काय सूर लावतेस,व्वा👌👌👌

Келесі