Kolaba Fort : Chh. Shivaji Maharaj Forts and History

अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गद्वयी उभी आहे. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग ह्या प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भूइकोट बनतो. हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे, त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर असून पूर्व पश्चिम रुंदी १०९ मीटर आहे.
अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती.
ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता. ४ जुलै १७२९ रोजी कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले. १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. १७८७ मध्ये लागलेल्या दुसर्‍या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिजांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर ६००० सैनिक व ६ युध्दनौका घेऊन हल्ला केला, पण त्यांचा त्यात सपशेल पराभव झाला.
#Alibaug#ColabaFort

Пікірлер: 74

  • @santoshchavan7857
    @santoshchavan7857 Жыл бұрын

    लयभारी, परिपूर्ण माहिती मिळाली तर अतिशय उत्तम।

  • @somnathpatil8428
    @somnathpatil84283 жыл бұрын

    जय महाराष्ट्र

  • @samirsansare3464
    @samirsansare34643 жыл бұрын

    छान माहीती सांगीतलीत.video shutting मध्ये सुधारणा अपेक्षोत.एक चांगला प्रयत्न.

  • @rameshkamble3662
    @rameshkamble36623 жыл бұрын

    छोट्या छोट्या गोष्टी छान पद्धतीने सांगता. किल्ल्यावरील सवॅ गोष्ट नक्षीकाम सोबतच किल्ल्याची माहिती सांगत राहता त्यामुळे पहाताना खुप छान वाटतं.

  • @dhanshribokephode6412
    @dhanshribokephode64123 жыл бұрын

    Great Sir

  • @justgo7439
    @justgo74393 жыл бұрын

    Khup chan ...

  • @shamlimbore9406
    @shamlimbore94063 жыл бұрын

    Khoop, chhan,,,

  • @user-gp7wm3rv2j

    @user-gp7wm3rv2j

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @prajaktamrudul245
    @prajaktamrudul2453 жыл бұрын

    बरेच वर्षांपूर्वी पहिला होता.. आणि चालत गेल्याचं आठवतं..छान वाटलं पुन्हा एकदा पाहून👌👌

  • @amitphadke6603
    @amitphadke66033 жыл бұрын

    Very.nice. 🙏🙏🙏

  • @user-gp7wm3rv2j

    @user-gp7wm3rv2j

    3 жыл бұрын

    Thanks a lot

  • @deepakvichare3373
    @deepakvichare33733 жыл бұрын

    नमस्कार, नेहमी प्रमाणेच व्हिडिओ खूप छान आहे. तुम्हीही गोष्टी सांगितल्या की , तुळशी वृंदावन वरचे कोरीव काम, मशाल विजू नये म्हणून बनवलेली जागा, अजुन म्हणजे इंग्रजांनी किल्ल्याची तोडफोड केली नसती तर ८०टक्के आपल्याला किल्ले बघायला मिळाले असते.बरोबर आहे.नेहमी प्रमाणे तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी मेहेनत आणि जास्तीत जास्त कशी माहिती देता येईल याची धडपड आमच्या पऱ्यंट पोहचली. तुमचे खूप खूप आभारी आहोत.

  • @sawantvilas5277
    @sawantvilas52773 жыл бұрын

    किल्ल्यावरील एकेक कोपरानकोपरा आपण दाखवता त्या मुळे संपूर्ण किल्ला आम्ही आपल्या माध्यमातून पाहात असल्याचा आनंद होतो. भविष्यात पण आपण आम्हाला शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची माहिती देत रहालच. आपल्याला एक विनंती आहे कि हे सर्व गड किल्ल्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. तरी आपण आपल्या जिवाला सांभाळूनच हे आपले कामे करा. Take care.

  • @user-gp7wm3rv2j

    @user-gp7wm3rv2j

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, हो नक्की पुर्ण काळजी घेवून च करत असतो आणि करत राहीन.

  • @subhasdeshmukh4861
    @subhasdeshmukh48613 жыл бұрын

    Mast sir

  • @user-gp7wm3rv2j

    @user-gp7wm3rv2j

    3 жыл бұрын

    Dhanyavad, Tumhi barech video pahun comment dilya, tyabddal khup khup Aabhar.

  • @vijaybhoir5471
    @vijaybhoir54713 жыл бұрын

    सर्व तुम्ही किल्लाची मस्त माहिती दिली ..धन्यवाद

  • @vijaygurav965
    @vijaygurav9653 жыл бұрын

    खूपच सुंदर

  • @magiciananiket01
    @magiciananiket013 жыл бұрын

    जय शिवराय

  • @shrikrishnadeshmukh6956
    @shrikrishnadeshmukh69563 жыл бұрын

    खुप सुंदर

  • @dipakpatharwat2923
    @dipakpatharwat29233 жыл бұрын

    फार चांगला माहितीपूर्ण व्हिडिओ.🙏

  • @kapeshpatole9287
    @kapeshpatole92873 жыл бұрын

    खूपच छान आणि सविस्तर माहिती दिली आहे दादा .👍👌

  • @udayjoshi6665
    @udayjoshi66653 жыл бұрын

    माझि शासनाला हात जोडून विनंती आहे की शिवरायांच्या दरेक गडांची जवाबदारी घेतली पाहिजे 🚩🙏

  • @santoshneel9187
    @santoshneel91873 жыл бұрын

    . Super

  • @revanaththorat9258
    @revanaththorat92583 жыл бұрын

    खुप छान माहिती दिली साहेब.... जय महाराष्ट्र... जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभुराजे....

  • @lalitpingale9461
    @lalitpingale94613 жыл бұрын

    Khupach Chhan mahiti sangitali aapan, aaplya camerachya madhyamatun gharbaslya aamhi gad kille pahu Shakto dhanyawad.

  • @user-gp7wm3rv2j

    @user-gp7wm3rv2j

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @bhavinbhosale9603
    @bhavinbhosale96034 жыл бұрын

    जय शिवराय🙏🚩

  • @devdasnagvekar9264
    @devdasnagvekar92643 жыл бұрын

    खुप छान माहिती मिळाली 🚩🚩🚩

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav60393 жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय भावा खूप छान माहिती दिलीत

  • @WILDWOODTOURSOFINDIA
    @WILDWOODTOURSOFINDIA3 жыл бұрын

    खूप सुंदर किल्ला....must see

  • @vishnugchavan1689
    @vishnugchavan16893 жыл бұрын

    किल्ले कुलाबा म्हनजे एक अद्भुत रचना माहीतीही छान दिलात.

  • @s0nu468
    @s0nu4683 жыл бұрын

    Alibagakr 😎

  • @varshachauhan8438
    @varshachauhan84383 жыл бұрын

    Khupch sunder mahiti ....thank you so much .

  • @rupeshkundale6860
    @rupeshkundale68603 жыл бұрын

    Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay Chhatrapati Sambhaji maharaj ki jay har har Mahadev

  • @sangeetahindalekar7959
    @sangeetahindalekar79592 жыл бұрын

    खुपच छान माहितीपूर्ण सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद, पण हे किल्ले अजुन शाबुत,मजबुत राहण्यासाठी काहीतरी करायला हवे,नाहीतर आहे त्यातच अजुन काही पडझड झाली तर किल्ले कसे होते हे फक्त कागदावरच चित्रें काढुन दाखवावे लागेल अशी खंत वाटते आहे, कान्होजी आंग्रेना प्रथम मानाचा मुजरा ,कारण शिवाजी महाराजांच्या ,शंभु महाराजां नंतर ही ही वास्तु टिकवली 🙏पण अतिशय पडझड झाली आहे, तिला डागडुजी करणे,नुतनी करण करणे गरजेचे आहे, त्यामुळे पुढील किती तरी येण्यारा पिढीस महाराजांचा जागता,आणि जाणता इतिहास जपता येईल अजुनही पडझडीची डागडुजी करुन जीर्णोद्धाराचे कामाची गरज आहे अस मला वाटते, हे किलले जर मागील ३५०ते ४०० वर्ष दिमाखाने उभी आहेत,आता तर पुढील काही वर्षें ४००ते ५०० वर्ष पर्यंत अजून सक्षम राहतील आणि राहणारच अशी मनाशी खुणगाठ बांथणे गरजेचे आहे, हाच खरा इतिहास टिकवुन तर पुढे नेणे हेच महाराजांचे स्वप्न पूर्ण केले गेले तर महाराजांना मानाचा मुजरा खऱ्या अर्थाने पोहोचेल.जय भवानी,जय शिवराय , जय शंभुराजे🙏🙏🙏🙏🙏

  • @user-gp7wm3rv2j

    @user-gp7wm3rv2j

    2 жыл бұрын

    धन्यवाद

  • @shashikantshinde2068
    @shashikantshinde20683 жыл бұрын

    Khup chan mahiti👌

  • @pravinbaikar5468
    @pravinbaikar54683 жыл бұрын

    Bhava ghodyancha paga st stand chya bajula pagachi galli, bivalkar wadashiv mandira javal hoty.

  • @sandeeprandomvideos1677
    @sandeeprandomvideos16774 жыл бұрын

    Nehamipramane khup Chan mahiti Kishor Dada 🚩 jay shivray 🚩🙏 tumche video baghun ajun ucchah vadhato asech video banvat raha ani itihas sangat ja

  • @user-gp7wm3rv2j

    @user-gp7wm3rv2j

    4 жыл бұрын

    Thanks a lot Sandip..

  • @diliplandkar1302
    @diliplandkar13023 жыл бұрын

    छान माहिती आहे भाऊ 👍🚩💐💐💐💐💐

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan5083 жыл бұрын

    खुप छान माहिती होती. धन्यवाद 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @user-sn3yu8tf9n
    @user-sn3yu8tf9n4 ай бұрын

    Thanks

  • @sandipmali1835
    @sandipmali18354 жыл бұрын

    Khup mast mahiti millali saheb 🙏🙏🙏

  • @user-gp7wm3rv2j

    @user-gp7wm3rv2j

    4 жыл бұрын

    अलिबाग हा शब्द विसरू नका

  • @kailasdesai3351
    @kailasdesai33514 жыл бұрын

    Major Respect❤ ❤

  • @user-gp7wm3rv2j

    @user-gp7wm3rv2j

    4 жыл бұрын

    धन्यवाद

  • @pallavikhot6516
    @pallavikhot65164 жыл бұрын

    Nice information

  • @vineshpawashe8097
    @vineshpawashe80973 жыл бұрын

    Sir Karla Leni cha video banava

  • @user-gp7wm3rv2j

    @user-gp7wm3rv2j

    3 жыл бұрын

    नक्की

  • @rsuku8836
    @rsuku88363 жыл бұрын

    Kolaba fort isso beauty.why the govt don't care.careless by govt.

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi9034 жыл бұрын

    दादा जबरदस्त दुर्ग आणि माहिती ही मस्त असेच विडिओ आम्हा प्रेक्षकांना पाहण्याकरिता घेऊन येत जावा 👍🏼👌🏼

  • @user-gp7wm3rv2j

    @user-gp7wm3rv2j

    4 жыл бұрын

    धन्यवाद अमेय

  • @sagartambe6694
    @sagartambe66943 жыл бұрын

    तुमचा इतिहासचा अभ्यास दांडगा आहे, खुप छान आणि उत्तम माहिती दिली तुम्हि

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar9473 жыл бұрын

    सुंदर किल्ला पहावा अस वाटत

  • @user-gp7wm3rv2j

    @user-gp7wm3rv2j

    3 жыл бұрын

    नक्की जाऊन या एकदा तरी

  • @pravinbaikar5468
    @pravinbaikar54683 жыл бұрын

    Bhava ya vihiri nahit tar gupt darvaje aahet ase 7aahet yatla 1 jilha karagruh, 1 shiv mandir yethe milato

  • @santc2678
    @santc26783 жыл бұрын

    Apan kay gamavla yachi kalpana karu shakto hae june wastu pahun.Tya sarwa shilpakarana ani mukhya toh Chatarapati na anek 🙏

  • @patolesaheb8381
    @patolesaheb83813 жыл бұрын

    aamchi trip alibag la khup veles geli pn kadhi kolabala nahi geli

  • @user-gp7wm3rv2j

    @user-gp7wm3rv2j

    3 жыл бұрын

    एकदा नक्की जावून या

  • @shrimangeshchavan508

    @shrimangeshchavan508

    3 жыл бұрын

    ओहोटीला किल्ल्यात चालत जाता येते. जरुर एकदा जाऊन पहा.

  • @swatipadole2540

    @swatipadole2540

    3 жыл бұрын

    Khupch Chan ahe gad

  • @user-tm6fe9cc2x
    @user-tm6fe9cc2x3 жыл бұрын

    👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽

  • @saylilingayat3607
    @saylilingayat36073 жыл бұрын

    tumhi back kamera ne dakhava please tumhi madhe alymule vayvastit disat nahe

  • @bharatnavale414
    @bharatnavale4143 жыл бұрын

    तुमचा आवाज लहान आहे ऐकू येत नाही

  • @aashabankar9118
    @aashabankar91183 жыл бұрын

    Kharech khup motha killa aahe. British lokaani khup nuksaan kele aahe. Aaple june engineering aani architecture Punha renovate karata aale tar kiti chaan hoil.

  • @user-gp7wm3rv2j

    @user-gp7wm3rv2j

    3 жыл бұрын

    काही अंशी आजही व्यवस्थित करण शक्य आहे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, सगळ्यात जास्त नुकसान ब्रिटिशांनी केलं आहे.

  • @udayjoshi6665
    @udayjoshi66653 жыл бұрын

    गड आणि तोफा रिपेअर का ❓ नाही करत

  • @user-gp7wm3rv2j

    @user-gp7wm3rv2j

    3 жыл бұрын

    पुरातत्व खात्याचा कंट्रोल असतो ह्या गोष्टींवर, बऱ्याच गोष्टीची परवानगी घ्यावी लागते.

  • @bhosaleprathamesh4557
    @bhosaleprathamesh45573 жыл бұрын

    Video Bhaari ahe 7:04 त्या विहीर नाहीत त्या भुयारी मार्ग आहेत अलिबाउग शहरात जातात

  • @vmmmbm9203
    @vmmmbm92033 жыл бұрын

    Bharat chi history la bhang kele british ni.

  • @user-gp7wm3rv2j

    @user-gp7wm3rv2j

    3 жыл бұрын

    खरं आहे

Келесі