Karunastake by Ramdas Swami with Lyrics | करुणाष्टके | अनुदिन अनुतापें तापलों रामराया रामदास स्वामी
Музыка
Listen to Karunastake (करुणाष्टके) written by Shri. Ramdas Swami a great holy saint of Maharashtra. He has written many famous scriptures like Dasbodh, Mannache Shlok, Karunastake and many other scriptures which are read and followed by lakhs of his devotees.
For more videos 🔔 Subscribe/सुब्स्क्रिब to our youtube channel Sonic Octaves Shraddha
►bit.ly/2lpxNTN
If you like this video then please like and share it.
Song Credits
Lyrics - Traditional
Voice - Shri. Rajendra Vaishampayan
Producer - Sonic Octaves Private Limited
Recorded at Sonic Octaves Studio, Malad, Mumbai
Popular Videos
⦿ Sampoorna Dasbodh ( संपूर्ण दासबोध पारायण ) : bit.ly/2l7mgY9
⦿ Manache Shlok Full ( संपूर्ण मनाचे श्लोक ): • Full Manache Shlok wit...
Lyrics:
अनुदिन अनुतापें तापलों रामराया ।
परम दिनदयाळा नीरसी मोहमाया ।
अचपळ मन माझें नावरे आवरीतां ।
तुजविण शिण होतो धांव रे धांव आतां ॥१॥
भजनरहित रामा सर्वही जन्म गेला ।
स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ।
रघुपति मति माझी आपुलीशी करावी ।
सकळ त्यजुनि भावें कास तूझी धरावी ॥२॥
विषयजनितसूखें सौख्य होणार नाहीं ।
तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं ।
रविकुळटिळका रे हीत माझें करावें ।
दुरित दुरि हरावें स्वस्वरूपीं भरावें ॥३॥
तनु मनु धनु माझें राघवा रूप तूझें ।
तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें ।
प्रचळीत न करावी सर्वथा बुद्धि माझी ।
अचळ भजनलीळा लागली आस तूझी ॥४॥
चपळपण मनाचें मोडितां मोडवेना ।
सकळस्वजनमाया तोडितां तोडवेना ।
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरींचा ।
#Karunastake #RamdasSwami
म्हणवुनि करुणा हे बोलतों दीनवाचा ॥५॥
जळत हदय माझें जन्म कोटयानकोटी ।
मजवरि करुणेचा राघवा पूर लोटी ।
तळमळ निववी रे राम कारुण्यसिंधू ।
षडरिपुकुळ माझें तोडिं याचा विरोधू॥६॥
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी ।
सिणत सिणत पोटीं पाहिली वास तूझी ।
झडकरि झड घाली धांव पंचाननारे ।
तुजविण मज नेते जंबुकी वासना रे ॥७॥
सबळ जनक माझा राम लावण्यपेटी ।
म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी ।
दिवस गणित बोटीं प्राण ठेऊनि कंठीं ।
अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥८॥
जननिजनक-माया लेंकरूं काय जाणे ।
पय न लगत मूखें हाणतां वत्स नेणे ।
जळधरकण आशा लागली चातकासी ।
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥९॥
तुजविन मज तैसें जाहलें देवराया ।
विलग विषमकाळीं तूटली सर्व माया ।
सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं ।
वमक वमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥१०॥
स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे ।
रघुपतिविण आता चित्त कोठें न राहे ।
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि देती ।
विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥११॥
सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे ।
जिवलग मग कैंचे चालतें हेंचि साचें ।
विलग विषमकाळीं सांडिती सर्व माळी ।
रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळीं ॥१२॥
सुख सुख म्हणतां हें दु:ख ठाकूनि आलें ।
भजन सकळ गेलें चित्त दुश्र्चीत जालें ।
भ्रमित मन कळेना हीत तें आकळेना
परम कठिण देही देहबुद्धी वळेना ॥१३॥
उपरति मज रामीं जाहली पूर्ण कामीं ।
सकळभ्रमविरामीं राम विश्रामधामीं ।
घडि घडि मन आतां रामरूपीं भरावें ।
रविकुळटिळका रे आपुलेंसें करावें ॥१४॥
जळचर जळवासी नेणती त्या जळासी ।
निशिदिन तुजपाशीं चूकलों गूणरासी ।
भुमिधरनिगमांसी वर्णवेना जयांसी ।
सकळभुवनवासी भेटि हे रामदासीं ॥१५॥
॥ जयजय रघुवीर समर्थ ॥
Пікірлер: 71
करुणाष्टके ऐकताना आणि म्हणताना खरोखरच डोळ्यातून आश्रूंच्या धारा वाहू लागतात , कदांचित ते आश्रू आपल्या स्वतःच्या साठीच असावेत !
🙏🙏🙏
श्रीराम
जय सद्गुरू ऐक विनंती सर्वाना विनामूल्य डाऊन लोड करावे
❤
अतिसुंदर स्वर,आर्तता, समर्थानीच म्हणलयं असं वाटतय करुणा अष्टके
खूप श्रवणीय आणि भावपूर्ण करुणाष्टके, राजेंद्रजी,अष्टसात्विक भाव जागृत झाले.🙏🙏🙏
Jay Jay raghuvir samarth
आपल्या.अमोघ वाणीतून करूणआष्ठक ऐकून खूप आनंद झाला धन्यवाद
खूप श्रवणीय आणि भावपूर्ण करुणाषटके👌👌🙏🙏
खूपच करुण स्वरात आहेत.ऐकताना स्वतःचा विसर पडतो.सतत ऐकावेसे वाटते.
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🚩🚩🚩
@ankushhande278
4 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ
मनप्रसनृन झालेखुप छान
Samartha Ramdas swami maharaj ki jai..... Jai Jai Raghuveer Samartha.....🙏🙏🙏🙏
जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
JAYA,JAYA RAGHUNATH SAMARTH. JAYA ,JAYA SHRI ..SWAMI RAMDAS SAMARTH. JYA VEER HANUMANKI JAYA.
Jai Jai Raghuveer Samarthan Jai GuruDeva
अप्रतिम अनुभव ऐकताना येतो वापर वैशंपायन यांच्या स्वराची किमया आहे
Very very very very very very nice 👌👌👌👌👌👌👍 👏
खूप सुंदर, मन प्रसन्न होते
🙏🙏॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥🙏🙏 जय जय रघुवीर समथ॔ ॥
Shudh,spshat uccharon,mild music ,man shantavale
खूप सुदंर आणि गोड आवाज आहे
Dhanyavad
श्रवणीय स्वर...मन प्रसन्न झाले🙏🙏
जय श्रीराम 🙏🙏🚩🚩🙏🙏
@DeepaAgashe-oe8ix
4 ай бұрын
Khup karunamay ahe dolyat paniyetach
फार सुंदर व मनापासून आभार.अतिशय प्रसन्न वाटते
Very very nice..!!!!!!!!!!!!!!!!
जय जय रघुवीर समर्थ 🙏
श्रवणकरूनखुप आनंद वाटला
खूप छान
🙏Shree Ram Samantha🙏🙏 Jay Jay raguveer Samarth 🙏🙏Jay Sadguru 🙏🙏
🙏🙏
🙏JAY SADGURU🙏
खूप छान. आपल्या आवाजात सर्वच करुणाषटके ऐकायला मिळाली तर आता वाचन न होणारयाची चांगली सोय होईल. तरी या विनंती चा विचार करावा .
Thanks
नमस्कार
Jai jai Raghuvir Samartha 🌹🙏🏽
Apratim 🙏🙏🙏
अक्षरूका
सुंदर ध्वनी मुद्रण👌
💐🙏
@NG-vo3tx
4 жыл бұрын
🙏Jay Jay Raghuvir Samarth 🙏
Very calm feels
🙏🙏 jai jai raguvira samarta
He aekun sakali mann prasann houn jaate jay sadguru
@SonicOctavesShraddha
4 жыл бұрын
Thank You very much. Please subscribe share the video and spread the word around about this channel.
Namaskar
👍👍👍👌👌👌💯💯💯
नमस्कार वि. वि. आपल्या म्हणणे ऐकून ऐकून सहज तोड पाठ होइल मला संध्याकाळी पर्वाचा त्याची सलग युट्युब वर ऐकविल्यास आम्हाला डाउनलोड करुन घ्यायला बरे होइल बरे असो आपलाहितचिंतक
Please anyone tell me . what is Karunashtake ????
Please upload Sunderkand Ramcharitmanas
Thanks for creating wonderful divine श्लोक 👌👌👌👍
@udaymodak4313
3 жыл бұрын
ऐकून कान तृप्त झाले
@user-fc8xt2yi1r
2 жыл бұрын
ओःन
Can you please upload shivleelamrut adhyays??
@prakashkshirsagar5260
2 жыл бұрын
वडवानल स्तोत्रं
Krupaya hya videos nitya aikanyasathi download kashya karavyat tya sanga
@SonicOctavesShraddha
4 жыл бұрын
कृपया आम्हाला info@sonicoctaves.com या इमेल वर संपर्क साधावा. आमचा कर्मचारीवर्ग आपणास माहिती देईल.
.atyant shravniy
Rutteruy
जय जय रघुवीर समर्थ
@minapatil7984
3 жыл бұрын
Jay sadguru
🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
🙏