No video

|Kaal Dehasi Aala| काळ देहासी आला | प्रथमेश लघाटे| Prathamesh Laghate |

|Kaal Dehasi Aala| काळ देहासी आला | प्रथमेश लघाटे| #prathamesh Laghate | #kaldehasiala #mugdhavaishampayan #prathameshlaghate
कशी गंमत असते बघा... जीव जन्माला आल्यावर फक्तं जी एकच गोष्टं अटळ, तिच आपण किती ’नाकारलेली’ असते. आपलं आपल्यालाच किती शिकवलेलं असतं... घडणं महत्वाचं.... ’न घडणं’ नाही....
हे म्हणजे कसं तर नुस्ता श्वास घेत रहा... आणि टाकत रहा... मध्ये उसंत नको क्षणाचीही... काहीतरी होत राहिलं पाहिजे... त्याशिवाय जगल्यासारखं वाटत नाही. काहीतरी सारखं घडत राहिलं पाहिजे.... मनासारखं, किंचित मनाविरूद्ध, बरचसं सुखाचं, पेलता येईल इतपत दु:खाचं... पण घडणं.... होत रहाणं महत्वाचं.... हे इतकं इतकं रुजतं आत आत खोलवर की, ’त्याने’ खांद्यावर हात ठेवला की आयुष्यातलं सगळं ’घडायचं’ काय ते थांबणार... ह्या कल्पनेने आपला थरकाप उडतो...
मृत्यू हे सुद्धा एक घडणंच आहे, बिघडणं नाही हे का विस्मरतो आपण? आपल्या जन्माच्या क्षणापासून बरोबर तो चालतोच आहे... आपण जाऊ तिथे, जाऊ त्या वेळी त्याची आपल्याबरोबर फरपट चालूच असते... असं प्रेम त्याचं आपल्यावर! फक्तं एकदाच.. एकदाच तो, ’अरे चल यार’ म्हणून खांद्यावर हात ठेवून ओढून नेतो.... हक्काने, ते एक कधी नेईल तेव्हढं एक माहीत नाही आपल्याला. आपल्या दृष्टीने हे घडणं नाही ’बिघडणं आहे... आपलं आपलं जे म्हटलं त्या सगळ्यापासून ’विघडणं’ आहे...
त्याचं खरं खरं कारण असं की जे काही आपण ’घडणं’ म्हणतोय ना, ते आपण स्वत: ’घडवत’ असल्याचा गंभीर गैरसमज!...
"मग? आपण गेल्यावर कोण घडवणार हे सगळं? कसं चालणार आपल्यावाचून त्यांचं?" हा जो ’स्वत:’ सगळं घडवत असल्याचा ’स्व’भाव किती म्हणजे किती नडतो... तर सगळ्याच जन्माला आलेल्याचं अगदी नैसर्गिक क्रमाने जे शेवटचं ’घडणं’... ते आपल्या हातात नाही, त्यावर ह्या ’स्व’चा काहीही हक्क नाही... ही कल्पनाच सहन होत नाही माणसाला. हे घडवणारा ’अहं’ नाही ’सोहं’ आहे... हे एकदा नक्की पटलं की ’त्या’नं खांद्यावर टाकलेला हात परका वाटत नाही, त्याचा दचका उरत नाही... ते ही एक ’घडणं’ म्हणून स्वीकारतो...
कसं? ते नामदेवांनी इतकं अचूक टिपलय!
अरे, ही ’त्या’ची संगत सर्वत्र आहे, सतत आहे... हे कळल्यावर नाचतात ते, आनंदाने... गातात...
आहा, हा दुसरा तिसरा कुणी नसून प्रत्यक्ष भगवंत आहे.. माझा सखा-सांगाती होऊन सदा-सर्वदा माझ्या बरोबर वावरतोय. हा पथ त्याच्या बरोबरीने चालणे आहे... नव्हे तर त्यानेच हाती धरून चालवलेला हा पथ आहे मग दु:ख कशाचे गड्यांनो?
काळ देहासी आला खाऊ
आम्ही आनंदे नाचू गाऊ
कोणे वेळे काय गाणे
हे तो भगवंता मी नेणे
नामदेवांचे दृष्टान्त बघा तरी... किती अचूक
टाळ मृदुंग दक्षिणेकडे
माझे गाणे पश्चिमेकडे
पहिल्यांदा ऐकला तेव्हा चक्रावले... टाळ-मृदुंग दक्षिणेकडे आणि गाणं पश्चिमेकडे कसं?
गाण्यात टाळ-मृदुंग काळ किंवा साध्या भाषेत गाण्याची लय ठरवतात... आणि पाळतात. गाणं एकाच ठेक्यात, लयीत पुढे सरकत रहातं.... गाणार्‍याने कितीही प्रयत्नं केला तरी तालाची सम त्याला घ्यावीच लागते, ती लय संभाळूनच गावं लागतं... ती चौकट सोडता येत नाही.
काळाची दिशा एकच - दक्षिण... सर्व-परिचित, सर्वमान्य... मृत्यूच्या वाटचालीची दिशा - दक्षिण! हीच दिशा मुक्तीचीही. हा एकदिशा मार्ग आहे. काही कर्मं तो प्रवास लवकर घडवतात तर काही कर्मांमुळे आपण आहोत त्याच जागी तटून रहातो..... पण मागे जात नाही.
असो. पण, मग गाणं पश्चिमेकडे तोंड करून काय म्हणून?.... त्याचं उत्तर पुढल्या चरणांमधे मिळतं.
नामा म्हणे, बा, केशवा
जन्मोजन्मी घ्यावी सेवा
... जोपर्यंत मुक्ती नाही तोपर्यंत जीवाचा प्रवास जन्म-मृत्यूच्या चक्रात.... पूर्व - पश्चिम - पूर्व-पश्चिम होत रहाणार... पण दिशा दक्षिणेचीच, मुक्तीची.
नामदेवांना विश्वास असावा की, माझं गाणं पश्चिमेकडे आहे कारण आज अस्ताला जाणारा सूर्यं उद्या परत पूर्वेला उगवणार आहे... पुनर्जन्म आहेच ह्या जीवाला... एकच का? अनेक आहेत...
फक्तं एकच करा माझ्या जीवा-भावाच्या, ह्या जन्मी तुमच्या सेवेचं जसं करून घेतलत तसच पुढल्या जन्मीही, अन त्या पुढल्या जन्मी अन त्याच्याही पुढल्या जन्मी.... जन्मोजन्मी करून घ्या...
कसा समर्पण भाव आहे पहा... जे घडलं... ती भगवंताचीच सेवा होती.. ती सुद्धा ’मी’ केली नाही, तर त्यानं करून घेतली...
हाच अर्थं असेल असं म्हणत नाही, मी... पण हा अर्थं असेल असं वाटलं तेव्हा अन त्या क्षणापासून हा अभंग ’अ-भंग’ होऊन गेला... अव्याहत! चिरंजीव!...
धागेनधाs गदिन तागेनधाs गदिन
**********************************************
एखादं गाणं आपल्याला कुरतडतं म्हणजे काय... ते ह्या गाण्याने दाखवलं मला. नामदेवांचा अभंग आहे, श्रीनिवास खळ्यांनी अप्रतिम चाल दिलीये आणि सुरेश वाडकरांनी सुरेख गायलाय. ऐकताना सोप्पी वाटणारी चाल तालात इतकी कठीण आहे की, मी मी म्हणणार्‍या गायकांच्या नाकात दम आणते.
CREDITS
Song : Kaal Dehasi Aala
Singer : Suresh Wadkar
Lyrics : Traditional
Music : Shrinivas Khale

Пікірлер: 44

  • @jrp1949
    @jrp19494 күн бұрын

    अप्रतिम गायलास प्रथमेश. ऐकतांना स्वतःला हरवून बसलो,संगीत रूपी गंगेत पूर्णपणे भिजून तृप्त झालो.

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale27392 жыл бұрын

    प्रथमेश तुझा आवाज तर छानच आहे ऐकताना माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागतात इतका मी तल्लिन होतो मी तुझी little champs पासून गाणी ऐकतो keep it up

  • @tejprabhavaidya7783
    @tejprabhavaidya77832 жыл бұрын

    प्रथमेश हे गाण तुझ्या आवाजात कीतीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही फारच छान.

  • @surekhakhandekar8694

    @surekhakhandekar8694

    Жыл бұрын

    खरय, हे गाणं च तस आहे आणि हा अप्रतिम आवाज! विशेष म्हणजे आपल्याला बरं नाहीये, घरातील सर्वजण औषधोपचार चे सल्ले देऊ लागतात आणि तेव्हा ह्याचा हा अभंग ऐकावा, सुकुन मिल जाता है। मन शांत होतं शुभाशिर्वाद प्रथमेश

  • @shreyasboralkar2693
    @shreyasboralkar2693Ай бұрын

    अप्रतिम प्रस्तुतीक रण

  • @rajendragawde9186
    @rajendragawde91862 жыл бұрын

    तो एपिसोड तेव्हा टीव्ही वर पाहिला होता..खरंच अप्रतिम गायला होता तेव्हा छोटा प्रथमेश..पंडितजींनी खूप कौतुक केले होते..हे गाणं खूप दिग्गज गायकांनी गायले आहे..पण प्रथमेश केवळ अप्रतिम..हे गाणं जसे काय प्रथमेश साठीच बनले आहे येवढ्या सुंदरतेने तेव्हा सादरीकरण झाले होते..खूप छान.

  • @ushakulkarni313
    @ushakulkarni3132 жыл бұрын

    प्रथमेश आणि मुग्धा तुमचे दोघांचे गायन ऐकून मंत्रमुग्ध झाले तुम्हाला दोघांना खूप खूप मनापासून शुभाशीर्वाद असेच खूप छान गात रहा वा वा वा ऐकतच रहावे असे वाटते

  • @sujatajoshi902
    @sujatajoshi9022 жыл бұрын

    कितीही वेळा ऐकावे अशी रचना....प्रथमेश..फार सुंदर

  • @balakuntalamsridhar5789
    @balakuntalamsridhar578914 күн бұрын

    I am so impressed by the growth and development of this beautiful couple, both as musicians and as individuals. Would love to know if they would be touring the US anytime soon. Would love to organize a concert.

  • @user-ve7kl7bg8p
    @user-ve7kl7bg8p6 ай бұрын

    Beautiful' voice Prathamesh lagate

  • @ratnakarjoshi3576
    @ratnakarjoshi35762 жыл бұрын

    Excellent. APRATIM

  • @vishwasasawadekar8216
    @vishwasasawadekar82162 жыл бұрын

    प्रथमेश, "शब्दातीत"- या एकाच शब्दात तुझ्या या गाण्याबद्दल सांगता येईल. अशीच चांगली चांगली गाणी गात रहा. पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा.

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Жыл бұрын

    प्रथमेशचं गाणं ऐकणं म्हणजे पर्वणी, God bless you

  • @ashokkhule8048
    @ashokkhule80482 жыл бұрын

    Atti Sundar I Salute to you,Brother

  • @prabhakarpparab5357
    @prabhakarpparab53572 ай бұрын

    आलाप लय भारी एक नंबर ऐकताना कान मंत्र मुग्ध होतात.

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar99822 жыл бұрын

    वाह ! सुंदर ...

  • @shyamthore3098
    @shyamthore30984 ай бұрын

    👌👌👌🥳🥳🥳 अप्रतिम खूप छान 💐💐💐

  • @avsune8483
    @avsune8483 Жыл бұрын

    प्रथमेश खूप छान गायलास 👌🌹

  • @ravindrateli5443
    @ravindrateli54432 жыл бұрын

    सुंदर ,व्वा

  • @nandupagere5764
    @nandupagere5764 Жыл бұрын

    Farach sundar gayan ahe prathmesh

  • @nanasahebjagtap9573
    @nanasahebjagtap9573 Жыл бұрын

    जय हरी माऊली वा वा क्या बात है खुप मस्त वाटले

  • @amrutabedekar4231
    @amrutabedekar42312 жыл бұрын

    आवाज छान प्रथमेश मंत्र मुग्ध होऊन जातं

  • @maheshbhuwad9372
    @maheshbhuwad9372 Жыл бұрын

    काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ कोणे वेळे काय गाणे हे तो भगवंता मी नेणे नामदेवांचे दृष्टान्त बघा तरी... किती अचूक टाळ मृदुंग दक्षिणेकडे माझे गाणे पश्चिमेकडे

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Жыл бұрын

    प्रथमेश तुला खूप खूप आशिर्वाद

  • @suniljoshi993
    @suniljoshi993 Жыл бұрын

    खूप सुंदर. प्रथमेश 👌👌

  • @sagarwalke7173
    @sagarwalke71732 жыл бұрын

    क्या बात है 👏👏👏.

  • @vishakhasmart1347

    @vishakhasmart1347

    2 жыл бұрын

    खूप छान,सुंदर,मस्त मी बरेच वेळेला ऐकलय तुझ्या आवाजात.अनेक शुभेच्छा

  • @vijayvichare6687
    @vijayvichare6687 Жыл бұрын

    फ़ारच छान प्रथमेश

  • @vineshmaniyar8999
    @vineshmaniyar89996 ай бұрын

    Enjoyed

  • @user-oh7xu4ms3l
    @user-oh7xu4ms3l9 ай бұрын

    Superb

  • @user-zz5on6ll1g
    @user-zz5on6ll1g11 ай бұрын

    Fantastic performance from.Prathamesh and also harmony and tabla also God bless them ❤❤

  • @jayantdesai8114
    @jayantdesai811410 ай бұрын

    Very nice

  • @nilimakulkarni984
    @nilimakulkarni984 Жыл бұрын

    Khupch chan

  • @AkssharBrahma
    @AkssharBrahma2 жыл бұрын

    क्या बात....👌👌👌👌👌👌👌👌

  • @gurunathmohit35
    @gurunathmohit352 жыл бұрын

    👌👌

  • @kundalikshirsekar4529
    @kundalikshirsekar4529 Жыл бұрын

    अप्रतिम❤

  • @manojghule6799
    @manojghule67992 жыл бұрын

    वाह प्रथमेश ,खूप छान, अशीच तयारी करत राहा, स्वर तुझा अजून सुंदर होत जाणार..

  • @scarletarcher9373
    @scarletarcher93732 жыл бұрын

    Best

  • @vitthaldeshpande9028
    @vitthaldeshpande9028 Жыл бұрын

    Camera please show Harmonium.and Tabla.player and Synthesiser players Bahut maja aaraha.hai

  • @mahadeodabholkar6982
    @mahadeodabholkar6982 Жыл бұрын

    प्रथमेश तु गाऊ लागलास का मी शब्दातील होतो. खूप मोठा हो

  • @user-xd6vl5cf6z
    @user-xd6vl5cf6zАй бұрын

    स्तुती करताना शब्द अपुरे पडतात

  • @prabhakarkulkarni4651
    @prabhakarkulkarni4651 Жыл бұрын

    aaprarm सुंदर शब्द नाहीत तुझे कौतुक करण्याला.

  • @vaishalipotdar8738

    @vaishalipotdar8738

    8 ай бұрын

    खुप छान 👌👌👌👌

Келесі