इंग्रजी मिडीयम की मराठी मिडीयम/प्रत्येक मायबापाने पहावाच/by Ashish Magar sir

#englishmedium#मराठीशाळा#इंग्रजीशाळा#privateschool#zpshala#zpschool#kanganesir#magarsir#ashishmagarsir#marathi#vitthalkanganesir#mpsc#shala#shikshk#khajgishala‪@ATMGURU‬

Пікірлер: 1 000

  • @shrikantchaudhari98
    @shrikantchaudhari98

    खूपच स्पष्ट आणि खणखणीत डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ ज्याला मुलाची प्रगती कशात आहे हेच कळत नाही त्याच्या मानगुटीवर बसलेले इंग्लिश मिडीयम चे भूत उतरवनारा व्हिडिओ आहे हा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल याची काळजी सर्वांनी घ्यावी व इंग्लिश मिडीयम चा जो फुगा या खाजगी संस्थांनी निर्माण केला आहे तो फुटलाच पाहिजे 1 ते 8 सर्वच मुले पहिले कशे काय येऊ शकतात तर याचे उत्तर आहे पालक वर्ग सभ्रमात ठेवणे आणि पैसा वसूल करणे हा आहे.मी हा व्हिडिओ ५०० लोकांना शेअर केला आहे.

  • @manishamundhe13
    @manishamundhe13 Жыл бұрын

    माझ्या मते जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण हे सर्वांगीण शिक्षण असते ,आमच्याकडे आता पण स्पर्धा परीक्षेत,खेळात जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी टॉपर असतात .जिल्हा परिषद शाळेतील मुलांना व्यावहारिक ज्ञान जास्त असते.माझे मुलं पण जिल्हा परिषद शाळेत चं शिकतात .मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे व माझ्या वर्गातील मुलं इंग्लिश मध्ये कुठेचं कमी नाहीत, दुसरीतील मुलं सुद्धा इंग्लिश वाचतात आणि मला खूप अभिमान आहे की मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे 😊👌👌

  • @udhavbais4720
    @udhavbais4720

    पूर्वी खरेच खूप हुशार शिक्षक होते आता नाहीत म्हणून zp मध्ये कोणीही जात नाहीत आता मला सांगा किती शिक्षकांना मराठी अलंकार अणि व्याकरण माहीत आहे हे तपासून पहा चित्र स्पष्ट होईल

  • @ankushtayade2061
    @ankushtayade206114 күн бұрын

    मराठी शाळा वाचवा गरीबांची हेळसांड. होणार नाही

  • @JagnnathHembade
    @JagnnathHembade

    होय मराठी माध्यमातून शिक्षण योग्य आहे परंतु सध्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती बिकट होत चालली आहे कारण वर्ग चार शिक्षक दोन वर्ग सात शिक्षक पाच त्यामध्ये अजुन एका शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचा चार्ज एकाकडे निवडणूक आयोगाने बिएलओचे काम दिले त्यामुळे तो शिक्षक शाळेत वर्गात शिकवण्या ऐवजी तो इतर कामा मध्ये व्यस्त रहातो त्यामध्ये अजुन एका शिक्षकाकडे एक वर्ग व सर्व विषय त्यामुळे पु्र्ण एका वर्गाचे नुकसान होते

  • @hemantgunjal4655
    @hemantgunjal4655 Жыл бұрын

    धन्य ती मराठी शाळा ज्या पालकांना इंग्रजी शाळेची फी भरण्याच्या लायक बणवले

  • @shitalpatil9091
    @shitalpatil9091 Жыл бұрын

    सर मी स्वतः शिक्षिका आहे आणि माझे दोघी मुलं मराठी शाळेत शिकलेत मला कधीच याचा कमीपणा वाटलं नाही उलट त्यांचा अभ्यास खूप छान आहे तो आज cbsc च्या मुलांपेक्षा चांगला अभ्यास करतो आहे

  • @vinayakmeshram9928
    @vinayakmeshram9928

    शिकायला इंग्लिश मीडियम अन शिकवायला मराठी मिडीयम😂 नोकरी पायजे सरकारी, शिक्षण पायजे प्रायवेट शाळेत 😢

  • @umeshbhosale8204
    @umeshbhosale8204 Жыл бұрын

    मुले कुठल्या शाळेत आहेत हे महत्त्वाचं नाही. त्यांना त्या शाळेत प्रवेश घेऊन मुलाला इंग्रजी बोलता येते की नाही हे महत्त्वाचं आहे. इंग्रजी एक जागतिक भाषा आहे. त्यामुळे ती बोलता येणे खूप गरजेचे आहे. Technical, computer आणि medical field मधील अनेक इंग्रजी शब्दांना मराठीत पर्यायी शब्द नाहीत. काही शब्द मूळ इंग्रजी भाषेत आहेत परंतु ते मराठीतून शिकविण्यासाठी जसेच्या तसे ओढूनताणून मराठीत भाषांतर केले जातात. उदा. Telephone साठी दूरध्वनी आणि television साठी दूरदर्शन तसेच XEROX असे शब्द मराठी संभाषणात मराठीतून वापरले जात नाही. Computer science मधील बऱ्याच शब्दांना मराठीत शब्द नाहीत. Technical field मधील interview फक्त इंग्रजी मध्येच घेतले जातात आणि इंग्रजी जर येत नसेल त्यांना ती नोकरी मिळत नाही. त्यामुळे इंग्रजी बोलता येणे आवश्यक आहे. मुलगा कुठल्या medium मध्ये शिकतो हे महत्त्वाचं नाही. मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याच प्रमाण वाढण्यामागे असलेल्या बऱ्याच कारणांपैकी पूर्वीच्या ZP शाळेतील शिक्षणाचा दर्जा देखील होते हे विसरून चालणार नाही.

  • @baburaoyadav9856
    @baburaoyadav9856

    माझी 2 मुले जी परिषदेत शिकतात दोघेही मंथन परीक्षेत केंद्रात 1ले आले आहेत

  • @chaitralisanas2122
    @chaitralisanas212219 сағат бұрын

    Sir मराठी शाळेत जर का चांगले नसेल शिकवत तर मुलांना काय येणार साधे मुलांना स्वतःचे नाव पण लिहिता येत नाही काही शिक्षक नुसते मराठी शाळेत पगार घ्यायला येतात ही सत्य परिस्थिती आहे मुलांना शिकवत नाही त्यामुळे पालक इंग्लिश मिडीयम मध्ये मुले घालतात तुमचा व्हिडिओ खूप छान आहे पण मराठी शाळेत पाहिले शिक्षक जसे छान शिकवायचे आणि मुलांना शिस्त पण छान असायची पण आता तसे नाही चौथी पर्यंत मुलाला इंग्लिश येत नाही स्वतःचे नाव लिहिता येत नाही तो पुढच्या वर्गात नीट मराठी वाचता येत नाही त्याला पुढच्या वर्गात येणार काय त्यामुळे पालक इंग्लिश मिडीयम मध्ये घालतात

  • @user-tr3rw5td3m
    @user-tr3rw5td3m14 күн бұрын

    जगण्यासाठी चांगला मार्ग दाखवण्याचे काम केले त्याबद्दल आभारी आहे असेच मार्गदर्शन आम्हाला मिळावे ही इच्छा

  • @ssmobile2702
    @ssmobile2702

    मराठी शाळांना उभारी देणारा व्हिडिओ

  • @sunitahonwane4484
    @sunitahonwane4484 Жыл бұрын

    मराठी शाळेत अपयश अन् दुःखही ही आनंदाने स्विकारण्याची आणि त्यांच्याशी तडजोड किंवा सामना करण्याची , जीवन जगण्याची कला शिकवली जाते .....!खुप साध्या शब्दांत महत्वाचा अन् मोठा विषय मांडला सर आपण 🙏

  • @meerasatpute1220
    @meerasatpute1220 Жыл бұрын

    मी पण माझे मुले जिल्हा परिषद शाळेतच घातले आहे, फक्त शासनाने नियम, नियोजन व सक्तीने शिक्षण घ्यायला पाहिजे. काही शिक्षक खूप मेहनीतीने शिकवतात तर काही दुर्लक्ष करतात

  • @manviwankhade6970
    @manviwankhade6970 Жыл бұрын

    माझ्या मते दिल्लीमध्ये जर सरकारी शाळा प्रायव्हेट शाळांपेक्षा चांगले होऊ शकतात, तर प्रत्येक राज्यात होऊ शकतात. फक्त मनावर घेतले तर.

  • @arvindaghavzpteacher2249
    @arvindaghavzpteacher2249 Жыл бұрын

    ग्रेट सर ,आपल्या मताशी मी 100% सहमत आहे .मीसुद्धा अशाच प्रकारे पालकांशी इंग्रजी व मराठी माध्यम याविषयी विचारमंथन करत असतो. त्यांचे परिवर्तन करत असतो . माझी मुलेही मराठी माध्यम विशेष करून जिल्हा परिषद शाळेतच आहेत. शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेमध्ये मराठी माध्यमाची मुले चमकत आहेत. आपण कथन केलेल्या सर्व अनुभवाचा फायदा नक्कीच पालकांना होईल म्हणून मी सर्व ग्रुप वर व्हिडिओ शेअर करत आहे.

  • @pournimachauhan530
    @pournimachauhan530 Жыл бұрын

    जग स्पर्धेचे आहे त्यामुळे मुलांना स्पर्धेत टिकायचे असेल तर इंग्लिश भाषा चांगल्या दर्जाची बोलता वाचता लिहता येणे आवश्यक आहे। जे मराठी माध्यमातून शिकले त्यांनाही वाटत आपण इंग्लिश माध्यमातून शिकलो असतो तर स्पर्धेत टिकण्यासाठी अधिक संधी मिळाली असती आणि पाया अधिक माजबुत झाला असता।

  • @nishantjoshi9228
    @nishantjoshi9228 Жыл бұрын

    खुपच छान आहे माहिती आम्ही आमच्या नातवाला इंग्लिश मिडीयम मधून काढून मराठी मिडीयमला घातले तेंव्हा पासून मनामधे सारखे वाटायचे की आपल हा निर्णय चुकीचा आहे पण आज हा तुमचा वीडियो पहिल्या नंतर बरे वाटले जे प्रश्न मनात होते त्या सर्व prashanchi उत्तरे मिळली धन्यवाद धन्यवाद सर

  • @mangalsukare-vg1um
    @mangalsukare-vg1um28 күн бұрын

    Absolutely right👍👍

Келесі