होळीचे वर्णन | Holi che varnan

Ойын-сауық

जय जय रघुवीर समर्थ 🙏
श्रीसमर्थ रामदास स्वामी यांनी केलेले साडे तीनशे वर्षा पूर्वीचे...
अवघेचि बोंबलती।होळी भोंवते भोविती||१||
माया होळी प्रज्वळळी।सृष्टी वेढारें लाविली||२||
ज्या कारणे गुंडाळती।तेचि वाचें उच्चारती||३||
होळीमध्यें खाजें आहे।तें तूं विचारुनि पाहे||४||
खाजें खातां सुख होय।परी कठीण हाता नये||५||
खोल दृष्टीनें पाहिलें।खाजें त्याच्या हातां आलें||६||
एक झडा घालूं जाती।लंडी चकचकून पळती||७||
एक देहाचे पांगिले।ते आंगी हुर्पळले||८||
उडी अवघ्यांचीच पडे।परीं ते हातांसी न चढे||९||
एकें थोर धिंवसा केला।खाजें घेऊन पळाला||१०||
एक आपणचि खाती।एक सकळांसि वाटती||११||
एक घेऊन पळाले।परी कवंठी वरपडे जाले||१२||
रामीरामदासीं होळी।केली संसाराची धुळी||१३||
।।होळी व धुलिवंदनाच्या शुभेच्छा।।
◆सद्गुरू श्रीसमर्थ रामदासस्वामी◆
👉
खाजे म्हणजे खोबरे
लंडी म्हणजे लबाड
चुकवोनी हा शब्द आहे.
वरपडे म्हणजे लाजिरवाणे
‪@shrisamarthdarshan‬#holi #festival #holispecial #krishna #bhaktisong #rammandir #god #radha #radheradhe #dwarka #vrindavan #brij #barasana

Пікірлер: 2

  • @vikramvirale1858
    @vikramvirale18582 ай бұрын

    जय रघुवीर

  • @user-ng8te1fo4n
    @user-ng8te1fo4n2 ай бұрын

    || जय जय रघुवीर समर्थ || ❤🙏

Келесі