C A शुभम भुमकर यांचा गौरव

**सहस्त्रार्जून शैक्षणिक संकुलात सत्कार समारंभ संपन्न. **
सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष कै. बाबुरावसा भुमकर व संकुलाचे विद्यमान अध्यक्ष श्री राजूसा भूमकर यांचे सुपुत्र श्री शुभम राजूसा भुमकर यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए)या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश संपादन केल्याबद्दल संकुलाच्या संस्थेचे अध्यक्ष श्री. गणपतसा मिरजकर यांच्या हस्ते कौतुक व सत्कार करण्यात आले. तसेच ठाणे जिल्ह्याचे सो.स. क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष श्री यशवंत रावतोळे व त्यांचे सहकारी श्री. कमलाकर क्षत्रिय यांनी संकुलास सदिच्छा भेट दिल्याबद्दल संकुलाचे अध्यक्ष श्री. राजुसा भुमकर यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर श्री विजयसा कबाडे श्री कोसंदर, संस्थेचे अध्यक्ष श्री गणपतसा मिरजकर, शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष श्री राजूसा बाबुरावसा भुमकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री भगवंत उमदीकर सहस्रार्जुन इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक डॉ. विष्णू रंगरेज प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ मंजुषा काशीद आदि उपस्थित होते. . श्री गणपतसा मिरजकर यांनी आपल्या मनोगतात , भुमकर कुटुंबाचे खुप कौतुक केले. श्री. यशवंत रावतोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलांनी जिद्द व चिकाटीणे अभ्यास करा व अशाच पध्दतीने तुम्ही ही सीए व्हा आपल्या शाळेचे नाव लौकिक करा असे मत व्यक्त करून शाळेची भव्य इमारत, क्रिडांगण व शाळेची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले..श्री शुभमसा भुमकर यांनी सत्काराला उत्तर देताना विद्यार्थ्यांनी कोणतीही पदवी मिळवणे ही सोपी नसून त्या पाठीमागे आपल्या पालकांचे व आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींचे भरपूर परिश्रम असतात व त्याबरोबर आपल्यालाही भरपूर परिश्रम करण्याची गरज असते अशा पद्धतीने भरपूर परिश्रम करून विद्यार्थीही उत्तुंग यश संपादन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राथमिक विद्यामंदिर चे सहशिक्षक श्री अनिल गायकवाड यांनी केले.

Пікірлер: 4

  • @user-yi9dl4rq4k
    @user-yi9dl4rq4k23 күн бұрын

    Proud of you shubham

  • @artistpoo
    @artistpoo23 күн бұрын

    Congratulations Dada 🎉🎉

  • @sangeetapawar8198
    @sangeetapawar819823 күн бұрын

    अभिनंदन

  • @vidhyachoudhari7573
    @vidhyachoudhari757323 күн бұрын

    Great achievement Shubham

Келесі