Babuji ani Mee : Shridhar Phadke (Concept - Datta Joshi)

सुधीर फडके (उपाख्य बाबुजी) हे मराठी भावसंगीतातील एक सर्वाेच्च शिखर.
त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनी त्यांची परंपरा पुढे चालवीत श्रवणीय रचनांची बरसात संगीत रसिकांवर केली.
या दाेघांच्याही गाण्यांचा स्वरानुभव एकाच मैफलीत घेता यावा, गाण्यांच्या अनुषंगाने गप्पागाेष्टी रंगाव्यात अशा हेतूने मी (दत्ता जाेशी) श्रीधरजींना विनंती केली. `बाबुजी आणि मी` या कार्यक्रमाची संकल्पना मांडली. पाठपुरावा केला. बरेच आढेवेढे घेत त्यांनी `बाबुजी आणि मी` या टायटलला मान्यता दिली आणि औरंगाबादेत संत एकनाथ रंगमंदिरात रविवार, दि. 3 मे 2009 ही मैफल रंगली.
या मैफलीचे अत्यंत श्रवणीय सूत्रसंचालन ही वेगळी खासियत आहे. ठाण्यातील ज्येष्ठ संस्कृत प्राध्यापिका, विदुषि साै. धनश्री लेले यांनी हा संवाद माेठ्या ताकदीने पेलला आहे. लालित्यपूर्ण भाषेत, सहज ओघवत्या भाषेत त्यांनी श्रीधरजींशी संवाद साधला, किश्श्यांची पखरण केली, श्रीधरजींना बाेलतेही केले आणि गाण्याचे पदरही उलगडले.
एक नितांतसुंदर मैफिल जन्माला घालण्यास मी कारण ठरलाे, याचा मला आनंद आहे.

Пікірлер: 193

  • @sudhirgore5239
    @sudhirgore52397 ай бұрын

    एक अप्रतिम कार्यक्रम... चौदा वर्षा पूर्वीचा..सलग ऐकला. कान तृप्त झाले.या पिता पुत्रांना अनेकदा ऐकलंय.बाबूजींनी गीत रामायण ऐकवले.तर श्रीधर जी दिवाळी पहाट मध्यें.असो.८० पार झालेत तरी या आवाजाची जादू संपत नाही. दत्ता जोशी आपले आभार.धनश्री लेले आपले सूत्र संचलन म्हणजे बहरून आल्या मंजिरी ची प्रचिती येते.असो. धन्यवाद.......

  • @anitakhadilkar6876
    @anitakhadilkar68763 ай бұрын

    हे गगना तू माझ्या गावी हे गाणं खुपच सुंदर आणि गायन पण त्याहून अधिक सुंदर ❤

  • @nitingore3738
    @nitingore3738Ай бұрын

    श्रीधरजी आपण बाबूजींच्या पोटी जन्मला हे महाराष्ट्रावर फार उपकार, मराठवाडय़ातील सर्वांचेच आभार

  • @umadeshpande5813
    @umadeshpande58136 ай бұрын

    सुंदर कार्यक्रम..... बाबूजींची खूप खूप आठवण येते.... आता १जानेवारी २०२४ पासून आकाशवाणी वरुन पुन्हा बाबूजींनी प्रथम गायिलेले आणि संगीतबध्द केले ले....ग.दि.मा.नी रचलेले गीतरामायण प्रक्षेपित केले जाते..... रोज सकाळी ६.१५ ते६.३० मी रोज ऐकून च फिरायला जाते..... पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो.....❤❤😊

  • @girishchavan8348
    @girishchavan83488 ай бұрын

    Shridhar phadke kaka Tumhi gatana Babuji yanchi athavan jhali awesome ani yaman kalyan raag madhe bhakti ras shrungar ras ani Dukhit ras khup chan shridhar kaka Awesome apratim Adbhut kaka

  • @manishkarnik4212
    @manishkarnik42122 ай бұрын

    अप्रतिम.. कौतुकास शब्द कमी पाडतील.......! सर्व महानुभवाना विनम्र प्रमाण.......!!💐💐💐💐💐💐💐

  • @rajanbadri6977
    @rajanbadri6977 Жыл бұрын

    सदर कार्यक्रम प्रस्तुत केल्याबद्दल आभार.माननीय श्रीधर फडके यांना त्रिवार वंदन.

  • @kalpanamayekar2676
    @kalpanamayekar26763 ай бұрын

    आदरणीय श्रीधर फडके तुम्हाला किती अभिमान वाटत असेल ही गाणी म्हणताना तुमच्यासुध्दा आवाजाला एक विशेष शैली आणि गोडवा आहे तो असाच वृद्धींगत होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना . खूप छान आहे हा कार्यक्रम धनश्री लेले यांनी छान न्याय दिला आहे. मनापासून शुभेच्छा ❤

  • @drvishwasparlikar9451
    @drvishwasparlikar94516 ай бұрын

    I miss Babuji so much now when Shri Ram Temple in Ayodhya has become a reality. His Geet Ramayan must be broadcasted on radio and TV. 🙏🙏🙏🙏🙏

  • @kanchanmohare9685

    @kanchanmohare9685

    6 ай бұрын

    //मस्त

  • @PandurangBharti-rz7th

    @PandurangBharti-rz7th

    5 ай бұрын

    जंल ए😢❤😊 ​@@kanchanmohare9685

  • @arjunpatil3446
    @arjunpatil34466 ай бұрын

    खूपच सुंदर, प्रत्यक्ष ऐकणारे किती भाग्यवान असतात.

  • @ravindrajoshi8760
    @ravindrajoshi8760 Жыл бұрын

    महाराष्ट्र बाबूजींच्या नेहमीच ऋणात राहील

  • @poojachandak1115
    @poojachandak11157 ай бұрын

    खूप छान. अप्रतीम. परत एकदा असाच अप्रतीम video expected.

  • @dnyneshwarjoshi9912
    @dnyneshwarjoshi9912 Жыл бұрын

    वा, फारच छान, श्री बाबुजी आज नहीत,....तरी पण दुधाची तहान ताकावर भागविण्या सारखेच...जयश्रीराम, वंदेमातरम.....

  • @sunandakshirsagar1808
    @sunandakshirsagar1808 Жыл бұрын

    मला स्वर्गीय परमपुज्य बाबुजींची गाणी लहानपणापासुनच खुप आवडतात आणि त्यात अगदी कानांना ऐकायला मधुर पण जीवनाचे किंवा अध्यात्माचे जे ज्ञान सांगीतलेले ऐकताना आपण नकळत विचारांनी समर्थ होत जातो.सादर प्रणाम कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्व कलाकारांना आणि संयोजकांना. धन्यवाद

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Жыл бұрын

    बाबुजी हे yak सुंदर व्यक्तिमत्त्व नमस्कार आहे

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 Жыл бұрын

    अतिशय सुंदर मैफल बाबूजींची गाणी किती ऐकली तरी कंटाळा येत नाही .

  • @surver1807

    @surver1807

    Жыл бұрын

    Very good superb singing and nivedan

  • @user-tl2wg1sh4f
    @user-tl2wg1sh4f Жыл бұрын

    बाबूजींचे संगीत आणि त्यावर श्रीधर फडके यांचा कार्यक्रम म्हणजे पर्वणीच आणि बरोबरीने उत्तम निवेदन धनश्री लेले यांचे... दुधात साखरच... 👍

  • @sulabhadesai954
    @sulabhadesai954 Жыл бұрын

    अप्रतिम कार्यक्रम श्री.श्रीधर फडकेजींनी बाबुजींची लोकप्रिय भावगीते प्रस्तुत केली खुप छान वाटले.

  • @mayasawarkar288
    @mayasawarkar288 Жыл бұрын

    ज्योती कलश एकदम ,सुंदर,मस्त आवाज ,गायकीसुद्धा

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 Жыл бұрын

    कर्ण मधूर आणि मनमोहक गाणी बाबूजी आणि श्रीधरजी त्रिवार वंदन 🙏

  • @abhaybapat8439
    @abhaybapat8439 Жыл бұрын

    दुसरे सत्र लगेच upload करा ही अवीट मैफिल सोडवत नाही. अप्रतिम आठवणी, सुंदर पेशकश, अलंकारिक पण सहज गप्पा मारल्या सारखे, बोजड न वाटणारे निवेदन, करंदीकर या गायिकेचा आश्वासक आवाज. क्या बात है!

  • @shridharkulkarni1693
    @shridharkulkarni16938 ай бұрын

    Beautiful musical function . Babuji is music composer, singer & patriot and his son Shridharji is equally great all in one .

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Жыл бұрын

    श्री श्रीधर फडके यांनी अतिशय सुमधुर गाणी सादर केली.कान तृप्त झाले. धन्यवाद सर

  • @avinashkhire1117
    @avinashkhire1117Күн бұрын

    किती सुंदर वर्णन कर्णाय्स शब्दच नाहीत.

  • @vivekanandsarde7722
    @vivekanandsarde77228 ай бұрын

    स्व.बाबूजीनी स्वतः गायिलेली सुमधुर गाणी ऐकाला त्रिकाल हवे-हवेसे वाटतात. आज रोजी ५० वर्षाचे वर ज्यांचे वय आहे ती मंडळी तर त्यांचे स्व-सुरांची दर्दी अजूनही आहेत. त्यांची गाणी आज रोजी कोणत्याही गायकाचे स्वर कंठा तून ऐकले की ऐकणाऱ्याला भूतकाळात घेऊन जातात. आजचे स्वर मैफिलीत सामाविस्ट सर्व गायक - गायिका व निवेदक सर्वच अप्रतिम व अतुलनीय आहेत.बाबूजीचे सुपुत्र आदरणीय श्रीधरजी फडके यांचे स्वर म्हणजे प्रत्यक्षात बाबूजीनाच आपण एकतो आहे असा भास होतो. ह्या मैफिलीत सर्व समाविष्ट कलाकार( गायक, निवेदक, संगीत देणारे) यांचे विनम्रपणे आभार व धन्यवाद.😮

  • @user-gl5tj1ox2g
    @user-gl5tj1ox2g5 күн бұрын

    🙏 व्वा ! दर्जेदार कार्यक्रम ऐकला . खुप आवडला .

  • @jayashreekothavale5390
    @jayashreekothavale5390 Жыл бұрын

    I always like Shree dhar Phadake. Baapase beta swami.wa kya baat hai. Tribhai dehuda is my favorite song.

  • @swarmagna

    @swarmagna

    7 ай бұрын

    Beta has done well that’s all you can say ….. Sudhirji was creative genius…his voice ,singing,and ability make the words more meaningful while singing….and most of all coming up with the TUNE= CHAL,…He was Unique…. Nobody comes even close …. Do some study …

  • @nandakumarkhaladkar8012
    @nandakumarkhaladkar8012 Жыл бұрын

    दत्ताजी बाबूजींनी गायलेले गीत रामायणाचे विडिओ उपलब्ध असल्यास ते लोकांना खुले करावा ही आर्त विनंती

  • @hemantkulkarni640
    @hemantkulkarni640 Жыл бұрын

    अतिशय सुंदर कार्यक्रम. संपूर्ण टीम चे अभिनंदन. धनश्री लेले यांचं सूत्रसंचालन आणि श्रीधर फडके आणि विद्या ताई यांचे सूर अप्रतिम. वाद्यवृद खूपच छान. असे कार्यक्रम परत परत होवो हीच अपेक्षा आणि कळकळीची विनंती 🙏🙏

  • @deepashreenabar382

    @deepashreenabar382

    Жыл бұрын

    हेमंत कुलकर्णीच्या अभिप्रायासाठी मी पूर्ण सहमत आहे.धन्यवाद ❤

  • @sushmasurve2635

    @sushmasurve2635

    7 ай бұрын

    Apratim program dhnyavad

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar52368 ай бұрын

    खुप छान सादरीकरण मन प्रसन्न झाल नमस्कार धन्यवाद

  • @ramkrishnaabhyankar6806
    @ramkrishnaabhyankar6806 Жыл бұрын

    Farach sunder karyakram adhikadhik asech aaikayla milave. Babujicha sakshatkar nakkichjhala .asech barech aikayla milat raho hich shree charni prarthana

  • @sunilgodse6042
    @sunilgodse6042 Жыл бұрын

    Atishay Sundar programme

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Жыл бұрын

    अपलोडींगसाठी खूप खूप धन्यवाद 🙏

  • @dr.gajananzadey9160
    @dr.gajananzadey916011 ай бұрын

    Very nice thanks for to have this on you tube

  • @dattaramjadhav5319
    @dattaramjadhav5319 Жыл бұрын

    अतीशय सुंदर अप्रतिम

  • @chandrashekharbhatawadekar5637
    @chandrashekharbhatawadekar5637 Жыл бұрын

    अतिशय सुंदर मैफिल सुंदर निवेदन

  • @vijaypachpande9974
    @vijaypachpande9974 Жыл бұрын

    अतिशय सुंदर मनाला मोहुन टाकणारा कार्यक्रम सतत ऐकत रहावे असा आहे

  • @anjaliboramanikar2037
    @anjaliboramanikar20377 күн бұрын

    😍😍खूप खूप अप्रतिम 😍😍😍🙏

  • @madhusmitaabhyankar2196
    @madhusmitaabhyankar21968 ай бұрын

    पुन्हा पुन्हा ऐकावा असा कार्यक्रम .

  • @deelipjayphalkar9389
    @deelipjayphalkar93894 жыл бұрын

    अत्यंत सुंदर कार्यक्रम आहे.

  • @sudhirj.9676
    @sudhirj.96769 ай бұрын

    अप्रतिम सूत्र संचालन

  • @ushasoman75
    @ushasoman7523 күн бұрын

    अलभ्यलाभ झाला. अत्यंत श्रवणीय.

  • @sonamchavan4912
    @sonamchavan4912 Жыл бұрын

    सुंदर निवेदन लेले मॅडमना सलाम

  • @umasalvi7643
    @umasalvi7643 Жыл бұрын

    खूप दिवसांनी अशी मैफिल ऐकण्यास आणि पाहण्याची संधी मिळाली धन्यवाद

  • @sangeetashirvalkar2331
    @sangeetashirvalkar23318 ай бұрын

    मन आणि कान तृप्त झाले

  • @asavaridekhane7845
    @asavaridekhane7845 Жыл бұрын

    फारच सुंदर. Eikun कान तृप्त झाले. Nivedan prashanch नाही. Shridharjinche गाणे eikane उत्तमच. खूप दिवसानी अशी maifal eikali. धन्यवाद. आभारी आहे.

  • @maheshmore865
    @maheshmore8659 ай бұрын

    Khoopach Chaan

  • @ahilyathombare6016
    @ahilyathombare6016 Жыл бұрын

    अतिशय सुंदर बापुजिंचे गाणं म्हणजेच अफलातून गायनाच्या गायनाला तोडच नाही.आप़ोआपच हृदय भरून आले आहे

  • @ujwalasabharanjak8988
    @ujwalasabharanjak89888 ай бұрын

    श्रवणीय कार्यक्रम! धन्यवाद!

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt3 ай бұрын

    श्रीधर जी आयोजकांनी ते मी लिहिलंय ते यासाठी बाबूजी आणि मी मी म्हणजे त्यांचा पुत्र असं त्यांना म्हणायचंय

  • @chandrakantbirajdar359
    @chandrakantbirajdar3594 жыл бұрын

    फारच सुंदर आणि कर्णमधुर आणि तृप्त करणारी गाणी धन्यवाद दत्ता

  • @saralamali3551
    @saralamali3551 Жыл бұрын

    अतिशय सुंदर कार्यक्रम.....

  • @jayantpandit5004
    @jayantpandit5004 Жыл бұрын

    अप्रतिम खूपच छान मस्त आहे

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Жыл бұрын

    अतिशय सुंदर संगीत मैफिल. मंत्रमुग्ध झाले

  • @rajeevnarang5029
    @rajeevnarang5029 Жыл бұрын

    Maharashtra is imbedded with an awe inspiring Indian culture.

  • @user-zb4sm7ez8e
    @user-zb4sm7ez8e6 ай бұрын

    गीतरामायण अतिशय प्रिय आहे ❤

  • @prabhakarkaregonkar8996
    @prabhakarkaregonkar8996 Жыл бұрын

    फार दिवसांनी अशी अप्रतिम गाणी सादर केली.दोन्ही गायक अप्रतिम.आभारी आहे .

  • @ajayagokhale6269

    @ajayagokhale6269

    Жыл бұрын

    खुपच छान गायन गायकाची नांव काय. आहेत

  • @girishchavan8348
    @girishchavan83488 ай бұрын

    Babuji was patriot desh bhakt singer composer and music director great

  • @seemapalkar6273
    @seemapalkar6273 Жыл бұрын

    सुंदर ,खूपच छान

  • @ushaprabhadesai2575
    @ushaprabhadesai2575 Жыл бұрын

    वा दत्ताजी .फारच सुंदर कार्यक्रम सादर करत आहात. आणखी अशाच सुंदर सुंदर कार्यक्रमांंच्या मेजवानीची अपेक्षा करायला हरकत नाही . जुनी आवडती गाणी खूप दिवसांनी ऐकायला मिळताहेत.अप्रतीम. धन्यवाद.

  • @meghatarhalkar1425

    @meghatarhalkar1425

    Жыл бұрын

    Wa apratim karykram

  • @nandapatil2928
    @nandapatil2928 Жыл бұрын

    Aprtim gayan❤

  • @suhaspathak5664
    @suhaspathak566410 ай бұрын

    छान ! बाबुजींंच्या जीवनातील अनेक उत्तम प्रसंग श्रीधरजींनी सांगीतली.

  • @shalakagawade8232
    @shalakagawade8232 Жыл бұрын

    खूपच छान कान तृप्त झाले निवेदन उत्कृष्ठ,श्रीधरजीचे किस्से त्यांची गायकी लाजवाब धन्यवाद दत्ताजी अशा आठ‌णीचा ठेवा दिल्याबद्दल

  • @narayankulkarni9289

    @narayankulkarni9289

    Жыл бұрын

    अप्रतिम!

  • @snehaldeshpande3764
    @snehaldeshpande3764 Жыл бұрын

    Khupach manmohak maihfil anubhali🙏

  • @ashokpawar9785
    @ashokpawar97856 ай бұрын

    सर जी असे समजाऊन कोणीच सांगत नाही असे काहितरी सांगत रहा खूपचं छान अभिनंदन

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Жыл бұрын

    अप्रतिम बैठक

  • @vilassawant8286
    @vilassawant82868 ай бұрын

    Dattagi आपले आभार व श्रीधर फडके मुका

  • @ashalande4768
    @ashalande4768Ай бұрын

    अप्रतिम.... शतशः धन्यवाद

  • @rajendrashevade1752
    @rajendrashevade1752 Жыл бұрын

    Very nice

  • @ratnakartrikutkar7586
    @ratnakartrikutkar7586 Жыл бұрын

    एकदम सुंदर .

  • @priyavadanshah9413
    @priyavadanshah94137 ай бұрын

    Most enjoyable time.. Many thanks for uploading... 👍👍🙏🙏💐💐

  • @vinodwairagar2744
    @vinodwairagar27443 ай бұрын

    ऱ्हस्व आणि दीर्घ शब्द उच्चार अगदी चपखल. अप्रतिम. तोडच नाही.

  • @chandrkantdeshpande7124
    @chandrkantdeshpande7124 Жыл бұрын

    खूप सुंदर अप्रतीम झाले गायन. फार फार आनंदायी आहे धन्यवाद !!

  • @avinashshekdar3884
    @avinashshekdar38847 ай бұрын

    सुरेख मैफिल,सह क्या बात है 🎉🎉🎉❤❤. साक्षात बाबूजी उपस्थित अहेज असेच वाटले मला. कार्यक्रम सुबुद्ध आणि उघाच बडबड तल्याबद्दल, विदुषी संचालिजेच अभिनंदन. सर्वच कलाकार, बाबूजींच्या "खास" चाहत्या असल्याने "! उत्तम संगीताच्या धबी "आहेत, हे जाणवतात. .🎉 कृपया, असलीच छान mahafil भरावत राहुल हे नाव वर्षाची विनंती. धन्यवाद 🎉❤😊😊,.

  • @sampatkurane3731
    @sampatkurane3731 Жыл бұрын

    कार्यक्रम अतिशय उत्तम आणि रंगतदार आहे .बऱ्याच जण मुद्दाम वन्दे ,राम हे का वापरतात हेच समजत नाही .आपल्या प्रवृत्ती मध्ये सुधारणा व्हावी . कार्यक्रम चांगले च होतं राहणार हे १००% खरं आहे . कावळ्याच्या शापामुळे घाबरणाचआ आर्शिवाद आहेच .

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 Жыл бұрын

    अतिशय अप्रतिम.

  • @prabhakarkhasale4616
    @prabhakarkhasale46166 ай бұрын

    ❤❤खूप सुंदर प्रयत्न केले असून त्यात दंडवत प्रणाम घ्यावा ❤❤

  • @prajaktamulay1245
    @prajaktamulay1245 Жыл бұрын

    ..very very nice programme

  • @ashokkelkar272
    @ashokkelkar2728 ай бұрын

    दत्ताजी अशी सुंदर मैफिल आपण ठेवली त्याबद्दल शतशः धन्यवाद 🙏

  • @anaghasant8137
    @anaghasant8137 Жыл бұрын

    Jai shriraam mala पूजनीय बाबूजी यांचे गीतरामायण ह्यातील गाणी फार आवडली.

  • @advnitinkulkarni2136
    @advnitinkulkarni2136 Жыл бұрын

    खूप सुंदर ,ओघवते निवेदन,अगदी श्रीधरजी यांच्या सुरांसारखे

  • @adhikraosadamate5911
    @adhikraosadamate59114 жыл бұрын

    अतिशय सुंदर मेजवानी धन्य झालो

  • @anuradhajoglekar5756

    @anuradhajoglekar5756

    Жыл бұрын

    अप्रतिम!!🙏🙏

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 Жыл бұрын

    सुंदर कार्यक्रम.👌धनश्री ताईंचे निवेदन म्हणजे दुधात साखर...गायिका अतिशय गोड गायली आहे❤

  • @rekhagokhale
    @rekhagokhale Жыл бұрын

    धनश्री लेले यांचे निवेदन याला शब्दात काय सांगायचे सुंदर आहे त्यांच्या बोलण्यातून जाणवते

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 Жыл бұрын

    अतिशय सुंदर आणि मुलायम

  • @girdharbhanushali4945
    @girdharbhanushali49453 жыл бұрын

    Wah wah shridhar phadkeji jio jio

  • @user-zj6zr1ec9g
    @user-zj6zr1ec9g4 ай бұрын

    Enjoyed fully. ❤

  • @swatibhagwat8044
    @swatibhagwat80448 ай бұрын

    तुम्ही आणि माझे यजमान मित्र, रामचंद्र विनायक भागवत, तुमचे गाणे म्हणजे प्रत्येक वेळी, अधिकच सुंदर ऐकण्याचा अनुभव असतो. आम्हां दोघांच्या तुम्हाला खुप शुभेच्छा. 👌👌🙏🙏11

  • @umadeshpande5813

    @umadeshpande5813

    8 ай бұрын

    सुंदर कार्यक्रम..... बाबूजींची खूप आठवण आली.....❤❤😊😊

  • @suhasbabtiwale254
    @suhasbabtiwale254 Жыл бұрын

    ATI SUNDAR.🙏🙏🙏

  • @maheshpaithankar533
    @maheshpaithankar5334 жыл бұрын

    मा.दत्ताजी जोशी,आपल्या उपक्रमांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन .....

  • @priyankatalekar6328

    @priyankatalekar6328

    Жыл бұрын

    25:47 25:47 25:49

  • @subhashjoshi7050
    @subhashjoshi7050 Жыл бұрын

    वावा खूप सुंदर नो चालेंज दोन्ही गायकांना पण मनाव तेवढे धन्यवाद कमीच

  • @mhendradhakwal2227
    @mhendradhakwal22276 ай бұрын

    खुप छान मैफिल , धन्यवाद 🙏

  • @user-ks1dr4kf8e
    @user-ks1dr4kf8e Жыл бұрын

    अतिशय ऊत्तम परत असाच एक व्हिडिओ यूट्रुब वर टाकावे

  • @surekhakulkarni5043
    @surekhakulkarni5043 Жыл бұрын

    श्रवणीय!👌💐

  • @maheshpaithankar533
    @maheshpaithankar5334 жыл бұрын

    केवळ अप्रतिम

  • @deepakpatil6045
    @deepakpatil6045 Жыл бұрын

    बापुजी अमर आहेत

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar8424 Жыл бұрын

    हा कार्यक्रम म्हणजे संगीत रसिकांना एक सुंदर मेजवानीच आहे

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Жыл бұрын

    निवेदनही तितक्याच तोडीचे आहे. लेले मॅडम खूप छान ओघवती वाणी

  • @satishashar664
    @satishashar6645 ай бұрын

    स्वर्गीय आनंद

  • @madhavikavishwar1932
    @madhavikavishwar1932 Жыл бұрын

    फारच सुंदर

Келесі