Abhanga- Krupawant Bhala Sadguru Labhala | SwarSanjeevani | Swami Swaroopanand

Музыка

शमिका भिडे हिच्या स्वरांत
‘स्वर- संजीवनी’ या तिच्या अभंगमालेतील हे तिसरे पुष्प -
कृपावंत भला सद्गुरू लाभला
पावस, रत्नागिरी येथिल श्री. स्वामी स्वरूपानंद हे लाखो भक्तांचे अध्यात्मिक दैवत. ‘ सोहम् ‘ साधनेचा पुरस्कार करून
लोकोद्धार करणाय्रा स्वामी स्वरूपानंदांनी उपदेशात्मक लिहिलेले अभंग ‘ संजीवनी गाथा ‘ या ग्रंथात प्रसिद्ध केले आहेत. हे केवळ अभंग नसून प्रत्येकासाठी मार्गदर्शक अशी जीवन मूल्ये आहेत. स्वामींच्या गुरू परंपरेतील संत ज्ञानेशवरांच्या समाधी उत्सव (आळंदी) निमित्त हा संजीवनी गाथेतील अभंग समर्पित .. 🙏🏻🌸
रचना - प. पू. स्वामी स्वरूपानंद
गायिका - शमिका भिडे
संगीत - केदार दिवेकर
संगीत संयोजन- गौरव कोरगांवकर
वादक -
तालवाद्य - केदार मोरे , पद्माकर गुजर
व्हायोलीन - श्रुती भावे
ध्वनिमुद्रक - अभिषेक काटे ( ॲाडीओ टाॅकीज, पुणे)
ध्वनिमिश्रण - गौरव कोरगांवकर
संकलन - मयुरेश बवरे
©ShamikaBhide

Пікірлер: 427

  • @amrutakarambelkar3985
    @amrutakarambelkar39852 жыл бұрын

    शमिका तुझा आवाज खूपच गोड आहे आणि स्वामी स्वरूपानंद माझे परात्पर गुरू , मला तुझे सगळेच अभंग खूप आवडतात , दिवसातून चार चार वेळा ऐकते तरी समाधान होत नाही , खूप खूप धन्यवाद , अशीच गात रहा

  • @ShamikaBhide15

    @ShamikaBhide15

    2 жыл бұрын

    Khup khup Dhanyawad! 🙏🏻😀 chan vatla tumhi maza Abhanganna itka prem ani ashirwad detay.

  • @nitinwaykole7425

    @nitinwaykole7425

    Жыл бұрын

    @@ShamikaBhide15 very nice & divine sound blessed by Swami swarupanand 🙏all abhangas sung by U taking us to inner soul immediately 🙏we are always grateful to you & swamiji🙏

  • @abhijeetdeshmukh3503

    @abhijeetdeshmukh3503

    Жыл бұрын

    🌹🌸🌺🙏🌼🚩गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः🚩🌼🙏🌺🌸🌹

  • @avinashbapat8415

    @avinashbapat8415

    Жыл бұрын

    ​@@nitinwaykole7425

  • @uttamjaveri7058

    @uttamjaveri7058

    Жыл бұрын

    उत्तम कितीही ऐकुन समधान होत नाही अतिशय सुंदर

  • @chandrabapat805
    @chandrabapat8052 жыл бұрын

    देव पण काय जादू करतो; आवाजातून भक्ती वाहते आणि स्वरातून तो स्वतः अवतरतो! श्री राम कृष्ण हरी ।।

  • @ShamikaBhide15

    @ShamikaBhide15

    Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻

  • @ramvivek1053

    @ramvivek1053

    Жыл бұрын

    @@ShamikaBhide15 🙏

  • @manoharkalamkartravelandli3194
    @manoharkalamkartravelandli31945 күн бұрын

    आज तूझ्या आवाजाने मंत्रमुग्ध झालो , तूझ्या आवाजात साक्षात सरस्वती बसलेली आहे , काय तूझा आवाज , काय तो सूर , साक्षात भगवंत भेटला , असं वाटायला लागलं , समिक्षा तूझ्या आवाजात प्रत्यक्ष सद्गुरू बसलेले आहेत

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare798725 күн бұрын

    सद्गुरू कृपा आवाजात लाभली आहे, अप्रतिम सुंदर.❤

  • @madhavigokhale6017
    @madhavigokhale601718 күн бұрын

    प्रिय शमिका.आत्ता पहिल्यांदाच हे गीत ऐकल.एकदम तंद्रीच लागली.सुमधूर, श्रवणीय. माझा दिवसच तुझ्या भूपाळीने सुरू होतो..सोहम् घोषची घुमत रहावा......त्यामुळे न विसरता तुझी आठवण येतेच...खूप खूप शुभेच्छा.

  • @shreeram1664
    @shreeram16642 жыл бұрын

    शमिकाजी, आपल्या या सुरेल व भावपुर्ण अभंग गायनाने आम्हा सद्गुरु शिष्य भक्तगणांचे प्रेम आणि आशीर्वाद आपणांस अखंड मिळत राहतीलच! आपणाकडून गाऊन घेण्याची योजना माऊलींची व परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद स्वामींची असावी असे मला वाटते . त्यांच्या कृपाआशीर्वादामुळेच अभंग अवीट, गोड आणि मधुर झाला आहे. हा एक अभंग आपणास अमर करेल यात मला शंका वाटत नाही ... होय , आपल्या जन्माचे सार्थक झाले असे मला वाटते... हरी ओम गुरुदेव l

  • @ShamikaBhide15

    @ShamikaBhide15

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद 🙏🏻 आशिर्वाद असुदेत

  • @dattatraypednekar2797

    @dattatraypednekar2797

    Жыл бұрын

    वरील रिप्लाय अगदी खरंच आहे असं मलाही वाटते

  • @dattatraypednekar2797

    @dattatraypednekar2797

    Жыл бұрын

    अशोक सासने यांचा रिप्लाय

  • @neelamkokatay

    @neelamkokatay

    3 ай бұрын

    🎉❤❤❤

  • @arundhatithete9484
    @arundhatithete9484Ай бұрын

    खूप छान.मन एकदम शांत होते.ऐकतच रहावे....ऐकतच रहावे.खरचं सद्गुरुंची रुपा.राम क्रुष्ण हरी

  • @sangeetaparitkar7471
    @sangeetaparitkar747122 күн бұрын

    मंत्रमुग्ध आवाज..साक्षात देव भेटतात असे वाटते..🕉️🙏

  • @sangitapawar4188
    @sangitapawar41882 жыл бұрын

    वाह 👌🏽👌🏽👌🏽 तुमचे गाणे म्हणजे जणू काही ध्यान च... शब्द च अपूर्ण आहेत वर्णन करण्यास.. 🌹🙏🏻 तुमच्या भजनातून गुरूंविषयी असलेली आस्था.. प्रेम.. समर्पण.. वाह 👌🏽👌🏽 अंतरंगाला छेडणारे तुमचे स्वर आणि आवाज म्हणजे गुरूंच्या चरणी वाहिलेलं एक सुवसिक फुलचं.. 🌹

  • @gajananpandhare8149

    @gajananpandhare8149

    2 жыл бұрын

    Good post

  • @ShamikaBhide15

    @ShamikaBhide15

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 🙏🏻🙂

  • @sunilwange6037

    @sunilwange6037

    Жыл бұрын

    आपण सर्वच रचना उत्तम गायल्या आहेत

  • @sangitanatekar6020
    @sangitanatekar602011 ай бұрын

    खुप खुप सुंदर म्हंटले आहे

  • @madhusudanchoudhari2501
    @madhusudanchoudhari25015 ай бұрын

    साक्षात श्री सद्गुरु माऊली समोर ऐकतात अशी अनुभूती येऊ लागते इतक्या गोड आवाजात गाता शमिका ताई तुम्ही. ईश्वर आपल्या आवाजातील गोडवा कायम ठेवो ही मन:पूर्वक प्रार्थना.🙏 ❤ 5:52

  • @vrundajoshi3514
    @vrundajoshi3514 Жыл бұрын

    खूपच सुंदर आवाज... किती मनापासून गायले आहे... 👌👌👌 भाव प्रकट होत आहेत.. 🙏

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil47398 ай бұрын

    शमिकाजी तुमचा स्वर खूपच मधूर आहे. आणि तुम्ही जेव्हा राग गातात तेव्हा रागाचा स्वर आत्म्याला स्पर्श करतो. भजनाचे मधूर स्वर कानांच्या वारुळात शिरताच मन भक्ती रसात तल्लीन होऊन जाते. very very.🎉🎉🎉❤❤❤

  • @jayantdatar7185
    @jayantdatar71855 ай бұрын

    मन आनंदून जाते,ताई, तुमचं अभंग गायन ऐकून.स्वामी स्वरुपानंदांची कृपा तुम्हाला सदैव लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना.

  • @chaitanyaprem6823
    @chaitanyaprem68233 жыл бұрын

    जय सियाराम. आपला आवाज भावयुक्त आहे आणि गायकी अर्थ, भाव प्रवाहित करणारी आहे. स्वामी स्वरूपानंदांसह इतरही सत्पुरूषांच्या रचना आपल्या स्वरात ऐकण्याची उत्सुकता आहे. धन्यवाद. - चैतन्य प्रेम

  • @ShamikaBhide15

    @ShamikaBhide15

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 🙏🏻

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187Ай бұрын

    खूपच छान आणि अप्रतिम शमिका. तूझ्या आवाजात कमालीचा गोडवा आहे.

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil47398 ай бұрын

    हृदय स्पर्शी स्वर.nice musik.nice singing. melodious voice and very nice presentation. very nice 👍👍🙏🙏🎉🎉🎉❤❤❤

  • @manasivaidya8598
    @manasivaidya85982 жыл бұрын

    शमिका , खूप गोड आवाज ,स्वामीजींच्या अभंगाला समर्पक चाल आणि भावपूर्ण गायन 🙏 परात्पर सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांचा अभंग ऐकून जणू त्यांचे आशीर्वादाच मिळाले. मी तुझी गाणी ऐकते ,मला ती खूप आवडतात. तुझी सा रे ग म मधील सर्व गाणी मला आवडली होती. तुला अनेक शुभेच्छा 🙏💐

  • @smitasmita2147
    @smitasmita21472 жыл бұрын

    शामिका तुमचा आवाज दैवी आहे, शांत, सरल, तुमच गायन मनाला आनंद देते धन्यवाद , अनेक गीत ,भजन, तुमच्या आवाजत ऐकायला मिळो

  • @jyotibhandari9753
    @jyotibhandari97532 жыл бұрын

    शमिका किती गोड आवाज 👌👌 सद्गुरू कृपा

  • @sangitanatekar6020
    @sangitanatekar6020Ай бұрын

    सद्गुरू कृपा आहे तुझ्यावर नक्की 😊

  • @sadashivshete403
    @sadashivshete4032 жыл бұрын

    ।।ॐ॥ शमिका भावपूर्ण स्वामींच्या अभंगाचे गायन मन तल्लीन करते!अभिनंदन व धन्यवादही!

  • @aniruddhabehere9836
    @aniruddhabehere98364 ай бұрын

    उत्कृष्ट गायन, आवाज इतका पारदर्शक आहे की अभंग मनाला भिडतो. ज्ञानेश्वरांच्या शब्दात "ये हृदयाचे ते हृदयी घाटले"

  • @kajalshedge7478
    @kajalshedge7478Ай бұрын

    अप्रतिम गायन अगदी मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे Love It❤️👌🏻🎶😍

  • @popatpalve7584
    @popatpalve75842 ай бұрын

    Jai Hari Mauli. Shamika beta,you have sung so sweetly. Chall and awaaj both are excellent .

  • @user-ol8qe8nn4v
    @user-ol8qe8nn4v8 ай бұрын

    Chhaya Jayswal 🙏🌹God gala ahe tumcha, sakshat awajat sarswati

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638 Жыл бұрын

    श्रीसद्गुरवे नमः 😊🙏 शमिका खूप च सुंदर गातेस तू। तुझ्या संजू आते ची मी मैत्रीण 🙏 तू गायलेली भूपाळी ऐकल्याशिवाय माझी सकाळ च होत नाही 👍👍 श्रीसद्गुरू कृपा आहेच तुझ्यावर 🙏🙏

  • @ShamikaBhide15

    @ShamikaBhide15

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @hemantnagarhalli905
    @hemantnagarhalli9054 ай бұрын

    सद्गुरु तुझे विशेष भले करो, खुप छान.

  • @ashoknarkar1163
    @ashoknarkar1163Ай бұрын

    कृपावंत भला सद्गुरू लाभला

  • @mangeshkamat6455
    @mangeshkamat64555 ай бұрын

    खूप छान वाटले.मंगेश कामत.डोंबिवली.

  • @rajashreemisal3246
    @rajashreemisal3246 Жыл бұрын

    * सुदंर हृदयस्पर्शी आवाज आणि स्वामीचा अभंग मनाला आर्त भिडणारा. 🙏🙏 शमिका अशीच मोठी हो. God Bless You 🙏🙏🙏*

  • @narayanashturkar2014

    @narayanashturkar2014

    Жыл бұрын

    शमिका आपला आवाज खूपच गोड आहे माझ्या सद्गुरु चे ते मोक्षगुरू आहेत .अशा दोन्हीही गुरूनां साष्टांग प्रणिपात

  • @shailadeshpande5042

    @shailadeshpande5042

    Жыл бұрын

    खुप गोड दिसतेस आवाजही गोड आहे. खूप शुभेच्छा

  • @mangeshkamat6455
    @mangeshkamat64555 ай бұрын

    ताई,तुझे आवाज, गाणे स्वर्गीय ठेवा,पूर्ण आनंद देऊन गेला.धन्यवाद.😅😊

  • @neelamkokatay

    @neelamkokatay

    3 ай бұрын

    अप्र तीम swrgiy सूर.

  • @shaileshbhatkar6488
    @shaileshbhatkar6488 Жыл бұрын

    Aati sundar

  • @vinayakvlogs4296
    @vinayakvlogs429611 ай бұрын

    ॐ राम कृष्ण हरी 🙏

  • @murlidhargurumukhi4776
    @murlidhargurumukhi47763 ай бұрын

    धन्यवाद, माउली दंडवत

  • @panduranggaikwad598
    @panduranggaikwad5982 жыл бұрын

    Shamika.....अलौकिक गीतरचना...अलौकिक गायन ...अलौकिक आवाज...अशीच सद्गुरू भजन गात रहा..सद्गुरू तूम्हावर अखंड कृपा करोत हीच मनस्वी तळमळ!!!!

  • @mamathavyas9374

    @mamathavyas9374

    2 жыл бұрын

    🙂🙏🙂

  • @pranilsatelkar4101

    @pranilsatelkar4101

    Жыл бұрын

    Shee. Is Brahm chaitnnya gankokila,

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole70049 ай бұрын

    👌💐👍 शमिका भिडे ! 💐 गोड आवाज ! गोड भक्तिभाव ! गोड सादरीकरण ! 👌💐 स्वामी स्वरूपानंद यांचे चरणी ... सच्चित गोडबोले व कुटुंबियांचा साष्टांग दंडवत ! 💐💐

  • @pradeepkulkarni1676
    @pradeepkulkarni16762 жыл бұрын

    अप्रतिम गीत व गायन... शमिका आपल्या स्वरातील आर्जव भारुन टाकते... हार्दिक शुभेच्छा।

  • @pratibhajunjarkar4385
    @pratibhajunjarkar43858 ай бұрын

    खूपच सुंदर आवाज शमिका तुमचा तुमच्यावर गुरूंची बरसात झालेली आहे त्याशिवाय हे घडू शकत नाही अशाच मोठ्या व्हा ही माझी सदिच्छा मन अगदी भरून जाते तुमच्या आवाजाने मी पावसला येऊन गेलेली आहे 👍🙏🙏

  • @anitakarandikar3182
    @anitakarandikar3182 Жыл бұрын

    🙏🏼शमिका, तुझ्या आवाजात. स्वामी चे उदारा जगदाधारा देई मज असा वर ही प्रार्थना ऐकायला खूप आवडेल वाट पहाते आहे

  • @prajaktajamdagni1850

    @prajaktajamdagni1850

    7 ай бұрын

    मला पण ऐकायला आवडेल

  • @sarikakumbhar5226
    @sarikakumbhar5226Ай бұрын

    खूप सुंदर व सात्विक आवाजात गायिलात आपण दिदी 🙏🙏

  • @suvarnajogalekar5245
    @suvarnajogalekar5245 Жыл бұрын

    खरच स्वामींची सदैव कृपा राहो असे छान अभंग आम्हाला ऐकायला मिळोत

  • @baburaokeskar9151
    @baburaokeskar9151 Жыл бұрын

    अप्रतिम partwatacha स्पर्श लाभलेला आवाज

  • @sandiip146
    @sandiip14611 ай бұрын

    ।। ॐ राम कृष्ण हरि ।।

  • @sangitanatekar6020
    @sangitanatekar6020Ай бұрын

    फार फार छान म्हटले आहे रियाझ खूप आहे

  • @manishajoshi4637
    @manishajoshi4637Ай бұрын

    Khuach chan aiktach rhawese watate swaratun bhakti wahat ahe.

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar64152 жыл бұрын

    जय जय रामकृष्ण हरी!खूप सुंदर व श्रवणीय आहे.👌💐👌

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 Жыл бұрын

    अप्रतिम शमिका, खूप छान गायली आहेस. स्वामी तूला उदंड यश देतील. स्वामींची अभंग रचना अशीच गात राहा. स्वामी तुझ्या पाठीशी कायम उभे राहतील.

  • @jagannathpatil1818

    @jagannathpatil1818

    Жыл бұрын

    🙏

  • @narendrapatil6679
    @narendrapatil6679 Жыл бұрын

    मी पहिल्यांदा च ... आपले भजन, आवाज ऐकून भावविभोर झालो, अंतराला "त्या" दिव्यत्वाची प्रचिती येते असा आवाज आपला आहे. आपले हृदयापासून धन्य वाद 🙏

  • @simonmartin8281
    @simonmartin82819 ай бұрын

    फारच सुंदर पहाटेच्या प्रार्थनेवेळी ऐकत असतो. मन शांत होते.

  • @chiudubbukidschannel...str2150
    @chiudubbukidschannel...str2150 Жыл бұрын

    श्रमिका तू अप्रतिम गायली। महाराजाच्या चरणी chayaन सेवा दिली आहेस। तुझ्या पुढील काळात महाराज तुला काही कमी पडू देणार नाही। अशीच सेवा तुझ्या कडून घडो हीच गुरू चरणी प्रार्थना। सुभाष देशपांडे।पुणे।

  • @ShamikaBhide15

    @ShamikaBhide15

    Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻

  • @sunitakarkare6236
    @sunitakarkare6236 Жыл бұрын

    शमिका फारच सुंदर गायलात. सुकुन हा शब्द या अभंगात शोभतो

  • @ajitsinhghatage7756
    @ajitsinhghatage7756 Жыл бұрын

    दीदी खूपच छान... अतिशय आत्मीयतेने गायलं आहे . माझ्या दिवसाची सुरवात ही तुमच्या भूपाळी आणि अभंगाने होते.. सद्गुरुंचा कृपाशीर्वाद आपणास लाभो हीच प्रार्थना...

  • @Prem-Srushti
    @Prem-Srushti Жыл бұрын

    अद्वितीय अद्भूत ऊकृष्ट

  • @deepamayekar2396
    @deepamayekar23964 ай бұрын

    मी पावस गावात पोहचले रत्नागिरीत धन्यवाद

  • @sangitanatekar6020
    @sangitanatekar6020Ай бұрын

    खुप खुप छान आवाज व भावपूर्ण गायले आहे ❤

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy2 жыл бұрын

    ꧁☘️☘️❤️🔔🦚🔔❤️🌟🌿🌺🌿☀️🧡☀️☘️ ।। ॐ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।☘️ ☀️🧡☀️🌿🌺🌿🌟❤️🔔🦚🔔❤️☘️☘️ ꧂

  • @minaxighosalkar8649
    @minaxighosalkar864910 күн бұрын

    Khoop chaan abhang aahe

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil47398 ай бұрын

    मॅडम तुमच्या मुखातून निघालेले मधूर स्वर व राग चे गोड स्वर कानात शिरताच मन मंत्र मुग्ध होउन जाते. अद्भुत अप्रतिम 🎉❤

  • @prafullgole4631
    @prafullgole4631 Жыл бұрын

    सद्गुरू लाभलाच असनार आपण इतकं सुरेख सुंदर गायन करता सर्व भजन गाणं छान अप्रतिम देवाची देणगी आहे ही

  • @kalpananaik5156
    @kalpananaik51565 ай бұрын

    🌄🙏🌹शमिका तुझ्या आवाजात स्वामींचे अभंग ऐकणे म्हणजे एक मनःशांती आणि परत ऐकावेसे वाटतात.... लिटील चॅम्प्स पासूनचा प्रवास आणि सातत्यपूर्ण रियाज पूर्णतः अभंगात जाणवतो, तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद....💐💐

  • @nandiniraval7554
    @nandiniraval75549 ай бұрын

    Anant koti koti dhanyawad bless you ❤

  • @krishnagore8528
    @krishnagore85282 жыл бұрын

    तुम्ही गायलेलं हे भजन खूप वेळेस ऐकले आणि ऐकतोय.. एका वेगळ्याच विश्वात नेतो तुमचा आवाज स्वर.. जणू सहजच माझ्या निर्गुण अवस्थेतील सद्गुरूंची प्रत्यक्ष भेट घडत आहे.. आणि त्या स्वर्गीय क्षणाची वारंवार अनुभूती अनुभवत आहे.. आणि माझ्या लाडक्या सद्गुरूंच्या श्री चारणावर अश्रूचा रुद्राभिषेक आपसूक घडत आहे 🙏

  • @ShamikaBhide15

    @ShamikaBhide15

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद ! 🙏🏻

  • @rekhadoshi1204
    @rekhadoshi1204 Жыл бұрын

    शमिका तू छान गाते मी स्वामींची अनुग्रहित .मन प्रसन्न होते.तुझे अभंग ऐकून.,,

  • @ShamikaBhide15

    @ShamikaBhide15

    Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻😀

  • @gdt1691951
    @gdt1691951 Жыл бұрын

    शमिका, तुझे गाणे मनाला भिडणारे आहे, अगदी डोळ्यात पाणी येते ! अशीच गात रहा, तुला उदंड श्री श्रीगुरु कृपा लाभो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना.

  • @manjushamagadum6074
    @manjushamagadum60742 жыл бұрын

    शमीकाजी खूप गोड गाता, मला खूप आवडता तुम्ही आणि तुमचं गायन ,आवाजात खूप भाव असतो ,तुमच्यवर देवाची अखंड कृपा असो आणि अस गाऊन तुमची कृपा आमच्यावर होऊ दे नमस्कार

  • @ShamikaBhide15

    @ShamikaBhide15

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद 🙏🏻😇

  • @rameshnaik5949
    @rameshnaik59492 ай бұрын

    🙏 खूप खूप खूप सुंदर मधुरा आवाज आहे तुझा साक्षात देवाचे दर्शन घडतं आशिष सुंदर गात जा श्री स्वामी समर्थ तुझे सर्व मनकामना पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना

  • @mohinikardale5618
    @mohinikardale56185 ай бұрын

    खुपच rhudayspsrshi eikun छान वाटते

  • @ananddeshpande2448
    @ananddeshpande2448 Жыл бұрын

    खूप खूप छान अभंग आहेत शमिका. अतिशय गोडवा आहे तुझ्या आवाजात. खूप आवडले मला. श्री स्वरूपानंदस्वामी परात्पर गूरूआहेत आम्हा सर्वांचे, अभंगाचे निमित्ताने त्यांचे स्मरण व दर्शन घडते.

  • @radhamohite31
    @radhamohite317 ай бұрын

    विलक्षण प्रेम...अप्रतिम....नतमस्तक..❤❤❤❤❤❤

  • @nitinmhasawade7765
    @nitinmhasawade776511 ай бұрын

    om ram krishna hari

  • @Zeeshan-bv7mo
    @Zeeshan-bv7mo4 ай бұрын

    ।। हरि ॐ ।। 🙏🏻🌼🌿

  • @digambargosavi4085
    @digambargosavi4085 Жыл бұрын

    अतिशय सुंदर गोड आवज

  • @bhartikhedkar2231
    @bhartikhedkar22312 жыл бұрын

    आजवर का ही कृपा का झाली नाही ! अप्रतिम कृपा ईश्वराची आपल्यावर ताई 🙏

  • @shrimatbhagwatkhandalikar11
    @shrimatbhagwatkhandalikar112 жыл бұрын

    प्रासादिक आवाज. केवळ कृपा . जय सद्गुरु नाथ.. अप्रतिम गीत. सुंदर संगीत.शमिका ताई धन्यवाद.

  • @kanchanjoshi1994
    @kanchanjoshi1994 Жыл бұрын

    ऐकतच राहावा असा आवाज .भावस्पर्शी अभंग आणि सुमधुर संगीत अप्रतिम 👌🏻👏🏻👏🏻

  • @madhavrao1745
    @madhavrao17453 ай бұрын

    Wah.🎉 mantramugdha. Avit godwa. Shamika i am hearing today only after years of ur performance in Sa re gama marathi. Thanks for you tube. Subscribed immediately. Carry on the good work.

  • @krishnakantdeore5513
    @krishnakantdeore5513 Жыл бұрын

    तन्मयतेने गाणारी गोड आवाजाचे गायिकेचे भविष्य उज्ज्वल आहे. तिला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐😊 मी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे शासकीय अधिकारी होतो१९८१ ला. तेव्हा रत्नागिरी शमिकेचे आवाजासारखी गोड होती. Now am 67 years old senior citizen and has enjoyed Shamika’s भावपूर्ण भजन.

  • @madhavikherdekar7880
    @madhavikherdekar78802 жыл бұрын

    गुरूदेवांच्या कृपेचे फळ म्हणुन तुम्हाला मधूर आवाज लाभला. खुप छान आवाज ऐकून कान तृप्त झाले.

  • @madhavitambat8540
    @madhavitambat8540 Жыл бұрын

    शमिका खूप छान गायली आहेस

  • @madhavitambat8540

    @madhavitambat8540

    Жыл бұрын

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शमिका

  • @ramakantbarhale4848
    @ramakantbarhale48483 ай бұрын

    Mazya divisache survat prasan ganyne hote.khup chan

  • @vilasdewoolkar3235
    @vilasdewoolkar32352 жыл бұрын

    ताई तुझ्या आवाजातील गोडवा आमचा सद्गुरु भाव वाढवत जातो आणि मन प्रसन्न होते

  • @pnpanchpor3593

    @pnpanchpor3593

    Жыл бұрын

    Apan swami anughrahit ahat ka?

  • @suchetakulkarni4066
    @suchetakulkarni4066 Жыл бұрын

    पावस प्रसाद छानछान

  • @hareshwalimbe4995
    @hareshwalimbe49952 жыл бұрын

    मनाला शांती देणारा उत्तम अभंग सुंदर गायला

  • @mohinibacholkar1499
    @mohinibacholkar1499 Жыл бұрын

    Khup sundar v shravniy bhajan

  • @sharmiladasharath9535
    @sharmiladasharath9535 Жыл бұрын

    खूप सुंदर,भावस्पर्शी म्हटले आहे , मी रोज ऐकते , खूप शुभेच्छा

  • @anuradhaparalikar577
    @anuradhaparalikar5777 ай бұрын

    शमिका बेटा विलक्षण गोड आणि आर्त आवाज आहे तुझा! कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते! स्वामींचे अभंग तर अप्रतिम पण संगीत ही सुरेख! खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद!

  • @hmj001
    @hmj0016 ай бұрын

    अगदी पावसेला गेल्याचा आभास झाला..... आणि आनंद प्राप्ती झाली ती वेगळीच... खूप छान... कितीही वेळा ऐका मन अतृप्त च राहते.,.... धन्यवाद.

  • @rajendrawakade9483
    @rajendrawakade9483 Жыл бұрын

    सज्जनगडावर झालेल्या कार्यक्रमात शमिकाच गाणं ऐकलं होतं. बरीच वर्ष झाली या गोष्टीला. असो. आजही तसाच गोड आवाज ऐकायला मिळाला. स्वामीजीचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो. 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @maheshdhamaskar6312

    @maheshdhamaskar6312

    Жыл бұрын

    Superb Voice 👌👌

  • @mohanranade3913
    @mohanranade391310 ай бұрын

    Shameka avaja FARA chana.🤝👌

  • @sakshibadarayani8787
    @sakshibadarayani87877 ай бұрын

    शमिका ताई, अप्रतिम भावोत्कट गायले आहे. स्वामी स्वरूपानंद जी माझे परात्पर गुरू आहेत. पण अलीकडेच अनुग्रह प्राप्त झाल्याने आपल्या अभंगातील भावना ह्या माझ्याच मनातल्या खोल, अतिशय जवळच्या वाटतात. सद्गुरुंचे स्थान आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे आणि ते लाभल्यावर अगदी कृतकृत्य झाल्याची भावना दाटून येते अशाच सुमधुर गात रहा..आपल्याला मन:पूर्वक शुभेच्छा.👌👏🏻🙏🙏💫🚩🌟

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 Жыл бұрын

    शमिका खूप गोड ग तुझा आवाज अशीच गात रहा स्वामींचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत 👍👍🙏

  • @jayantshidhaye7730
    @jayantshidhaye77307 ай бұрын

    शमिका अग किती भाव पूर्ण, अर्थ पूर्ण पद गायलस.आवाजाची देन आहे अशीच गात रहा रिझवत रहा.जय जय स्वामी महाराज.

  • @alkayerawar-oh5wy
    @alkayerawar-oh5wy Жыл бұрын

    खूप खूप सुंदर, मी दिवसभरात किती वेळा तरी ऐकतो.खूप खूप शुभेच्छां.

  • @anuradhakulkarni7328
    @anuradhakulkarni73283 ай бұрын

    अतिशय नादमधुर कर्णमधुर... भक्तीरसात डुबवून टाकणारा अभंग 🙏🏻🙏🏻🙏🏻अशीच गात रहा बेटा 🌹🌹🌹

  • @anujasurve291
    @anujasurve2919 ай бұрын

    शमिका खूप अप्रतिम!माझ्या माहेरचे पावसचे आमचे सद्गुरू म्हणून मला खूप ओढ आहे तिकडची. तुझ्या आवाजात ही तीच ओढ जाणवली.अगदी सवरुपंनदांच्या सनिध्या त असल्याचा भास झाला.खूप छान शमिका!

  • @jayganeshgothoskar
    @jayganeshgothoskar3 жыл бұрын

    ❤️❤️💐💐💐💐👌🏻👌🏻👌🏻 khup chaan

  • @ravindrabalasahebdeshmukh2528
    @ravindrabalasahebdeshmukh2528 Жыл бұрын

    तुमचा आवाज खुप सुमधूर आहे. त्याला जेंव्हा देवाचे अधिष्ठान लाभते तेंव्हा ऐकणाऱ्याला स्वर्ग अनुभूती होते.

  • @umeshphadnis9858
    @umeshphadnis9858 Жыл бұрын

    अतिशय सुंदर धन्यवाद

  • @pravinsontakke4275
    @pravinsontakke42752 жыл бұрын

    दैविक आवाज.

Келесі