Aarti Shri Ramanand Maharaj । S.Ajinkya । SadguruCharanankit Dasanudas

Музыка

|| श्रीराम समर्थ ||
आज मार्ग शीर्ष कृष्ण द्वादशी आज श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे थोर शिष्य श्रीरामानंद महाराज तथा पांडुरंगबोवा यांची पुण्यतिथि या निर्मित प.पू. सद्गुरू श्री रामानंद महाराजंच्या आरती चे प्रकाशन एस.अजिंक्य ओफिशियल यूट्यूब चॅनल वर प्रकाशित झाले आहे. सर्व सद्गुरू भक्तांनी या ऑडियो व्हिडिओ चा लाभ घ्यावा व इतर भक्ताणापण शेयर करावा..
श्री रामानंद महाराजां चरणी विनम्र अभिवादन🙏🙏
Title : Aarti Shri Sadguru Ramanand Maharaj
Music Direction : S.Ajinkya
Produced Released : S.Ajinkya
Singers : Sadguru Charanankit Dasanudas.
Album : ' Pralhadacha Ramanand '
Recording Studio : GLR Bliss Sound Digital Audio Recording Studio Production House. S.Ajinkya Pune.
This Aarti is Dedicated to Shri Ramanand Maharaj.
Aarti Sharing Link : • Aarti Shri Ramanand Ma...
श्री रामानंद महाराजांचे थोडक्यात चरित्र :
वऱ्हाडातील चांदकी या गावी सन १८८६ मध्ये श्रीपांडुरंगबुवांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना भजनकीर्तनाची आवड होती. आठव्या वर्षी त्यांची मुंज झाली.* लहानपणी वडील वारले, म्हणून त्यांचे मामांनी त्यांना नागपूर येथे घरी नेले व शाळेत घातले.
पुढे ते काशीला गेले. काशीक्षेत्री चार महिने राहून अनुष्ठान केले. अनुष्ठान समाप्तीचे वेळेस त्यांना समर्थांचा दृष्टांत झाला - गोदातीरी जा, तिथे तुला दीक्षा मिळेल. तेथे लोक त्यांना श्रीपांडुरंगमहाराज म्हणू लागले. काशीहून ते गोदातीरी मंगरूळ क्षेत्री आले. तेथील मठाचे अधिकारी पुरुष श्रीअंबादास यांनी त्यांना रामदासी दीक्षा दिली व रामानंद हे नाव ठेवले. पुढे जालना येथे श्रीआनंदसागर यांचेकडे जाण्यास त्यांना सांगितले. श्रीआनंदसागरांनी त्यांना गोंदवल्यास श्रीमहाराजांकडे नेले.
श्रीमहाराजांनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले व जवळ बसवून अनुग्रह दिला. श्रीमहाराज त्यांना पांडुरंगबुवा म्हणून हाक मारीत . एक वर्षाच्या वास्तव्यानंतर श्रीमहाराजांनी त्यांना आज्ञा केली की, एका वस्त्रानिशी तीर्थाटनास निघावे, जवळ भांडेही ठेवू नये. भिक्षा मागून रामरायास नैवेद्य दाखवून अन्न भक्षण करावे. मौन धरून नामस्मरण करीत जावे. रात्री भजन करावे. याप्रमाणे चातुर्मास करून तीर्थाटन करून परत येऊन भेटावे. याप्रमाणे आज्ञापालन करून परत आल्यावर श्रीमहाराज प्रसन्न झाले.
चातुर्मास मौन आणि निरशन, फक्त द्वादशीस नैवेद्य, तेच भोजन व तीर्थाटन - असे व्रत सांगून, श्रीगुरुपौर्णिमेस गोंदवल्यास यावे अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे रामानंदांनी कित्येक वर्षे बारा ज्योतिर्लिंगे, सप्तपुर्या, चारीधाम, गंगाप्रदक्षिणा अशा तीर्थयात्रा केल्या. बद्रीनारायणास तीन वेळा जाऊन आले. रामनवमी जालना येथे, गुरुपौर्णिमा गोंदवले येथे व दासनवमी मंगरूळ येथे, असे तीन क्षेत्री न चुकता जात असत.
श्रीमहाराजांनी त्यांना अनुग्रहाचा अधिकार देऊन श्रीरामोपासनेचा प्रसार करण्यास सांगितले. श्रीमहाराजांनी त्यांचा विवाह गोंदवले येथे स्वत:च्या समोर श्रीआनंदसागरांच्या कन्येशी करून दिला.
श्रीमहाराजांनी त्यांना उपासनेसाठी गंडकी शिळेवर ओतलेले श्रीराम पंचायतन दिले. परंपरेने प्राप्त झालेले हे पंचायतन आजही साखरखेर्डा येथील मंदिरात पाहावयास मिळते.
श्रीमहाराजांचे आज्ञेप्रमाणे त्यांनी वऱ्हाडात व मराठवाड्यात श्रीरामनामाचा खूप प्रसार केला. परस्त्री मातेसमान मानून सांगितलेला जप जो करील त्याला ते अनुग्रह देत.
खडतर वैराग्य व सदगुरुभक्तीच्या दिव्य तेजाने अल्पावधीतच अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. जालना येथील श्रीआनंदसागरांनी उभे केलेल्या राममंदिरची व्यवस्था त्यांनी सांभाळली. एका सधन भक्ताने सभामंडपाचा सर्व खर्च देऊ केला असता तो नाकारून श्रीरामानंदांनी भिक्षेने पैसे जमा करून मंदिराचा मोठा सभामंडप आपल्या देखरेखीखाली बांधविला. ते अभिजात कवी होते. त्यांची काव्यशक्ती फार मोठी होती. त्यांनी श्रीमहाराजांवर सुंदर कवने केली आहेत. गोंदवले येथील नित्योपासना ग्रंथात त्यांनी केलेली पदे दिली आहेत. त्यांनी महाराजांवर अनेक सुंदर भावपूर्ण कवने केली आहेत. ते भजनेही फार सुंदर म्हणत. एकतारीवर ते भजन म्हणू लागले म्हणजे त्यांचे देहभान हरपून जाई.
गोंदवल्यास देह ठेवण्याचे भाग्य श्रीरामानंदांना मिळाले. त्यांची तशी इच्छा होती, ती श्रीमहाराजांनी पुरविली. रामानंदांची श्रीमहाराजांवर अत्यंत निष्ठा होती. त्यांच्या आज्ञेचे ते तंतोतंत पालन करीत असत. १९३० साली बुवांनी गोंदवल्यास आपला देह ठेवला. त्यांच्या पद्यातील चरण त्यांनी सत्य *करून दाखविले -
*धन्य तेचि भूमी । धन्य ते चरण । धन्य ते मरण । तया ठायी ॥🙏
🌹श्री राम जय राम जय जय राम 🌹

Пікірлер: 36

  • @mangalayadwadkar1058
    @mangalayadwadkar1058 Жыл бұрын

    खूप च सुंदर गायली आहे . प. पू. श्री सद्गुरू श्री रामानंद महाराजांची आरती .👌👌🙏🙏🌹🌹

  • @mangalayadwadkar1058
    @mangalayadwadkar1058 Жыл бұрын

    प. पू. श्री सद्गुरू श्री रामानंद महाराजांची आरती खूप च छान गायिली आहे.👌👌🙏🙏🌹🌹

  • @sonalimuzumdar1235
    @sonalimuzumdar12352 ай бұрын

    Khup chhan aahe Aarti

  • @govindkale5483
    @govindkale5483 Жыл бұрын

    श्रीराम जय राम जय जय राम🙏

  • @pralhadjavalekar7755
    @pralhadjavalekar77552 жыл бұрын

    अप्रतिम खुपच छान

  • @theisticsacrals5889
    @theisticsacrals58892 жыл бұрын

    व्वा! केवळ अप्रतिम 🙏🏼🙏🏼

  • @lakshmanbhawsar6873
    @lakshmanbhawsar68736 ай бұрын

    जयश्रीराम

  • @naynagiridhar6336
    @naynagiridhar6336 Жыл бұрын

    श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

  • @chinmaychincholkar9031
    @chinmaychincholkar90312 жыл бұрын

    श्रीराम जयराम जयजयराम

  • @mangalayadwadkar1058
    @mangalayadwadkar1058 Жыл бұрын

    जय श्रीराम🙏🙏

  • @shubhangidani7618
    @shubhangidani76182 ай бұрын

    अप्रतिम चाल लावली आहे आरतीला

  • @avinashdeshmukh4323
    @avinashdeshmukh43232 жыл бұрын

    Uttam Jay shriram

  • @prabharaghuwanshi4371
    @prabharaghuwanshi4371 Жыл бұрын

    I Shree Ram Jay Ram Jay jay

  • @sunilmondhe7156
    @sunilmondhe71569 ай бұрын

    श्रीराम जय राम जय जय राम प्रभू सद्गुरु श्रीहरी महाराज की जय

  • @dr.anildeshpande1755
    @dr.anildeshpande1755 Жыл бұрын

    सुंदर! भविष्यासाठी शुभेच्छा.

  • @chinmaychincholkar9031
    @chinmaychincholkar90312 жыл бұрын

    IIश्रीराम समर्थII 🚩 *श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद समर्थ सद्गुरू श्री श्रीरामनंद महाराज की जय*💐💐 श्रीराम जयराम जयजयराम

  • @nikhilpathak6221
    @nikhilpathak62212 жыл бұрын

    खुपच छान video बनवलाय अजिंक्य... जय श्रीराम🌹😊

  • @user-tg4dz7po7k
    @user-tg4dz7po7k4 ай бұрын

    खूप सुंदर चाल.. जय श्रीराम 🙏🙏

  • @adhokshajp
    @adhokshajp2 жыл бұрын

    रामानंद महाराज की जय 🙏🏻🚩🌹 जय श्रीराम 🙏🏻🚩🌹

  • @cbrahme
    @cbrahme2 жыл бұрын

    वा खूप छान

  • @avtarrampal2257
    @avtarrampal225710 ай бұрын

    Ram Guru Dev Namo

  • @ketakisabde6923
    @ketakisabde69232 жыл бұрын

    खूप सुंदर दादा👌👌🙏 श्रीराम समर्थ🙏

  • @avtarrampal2257
    @avtarrampal225710 ай бұрын

    Jai shree Ram, please translate full Arti in English with thanks Jai ho

  • @srisaiankita
    @srisaiankita2 жыл бұрын

    Please make video of Sri Ram Jai Ram Jai Jai Ram for 108X 13 Mala for this Ram Navami..13 times because is 13 letter mantra...Thank you very much...RAm bless you .Jai Sri Ram Ram

  • @sakharambrahmapurikar8392
    @sakharambrahmapurikar839210 ай бұрын

    जय श्रीराम

  • @avtarrampal2257
    @avtarrampal225710 ай бұрын

    Jai shree Ram.please try to supply Arti in HINDI OR ENGLISH with thanks

  • @chinmaychincholkar9031
    @chinmaychincholkar90312 жыл бұрын

    दादा, समर्थ सद्गुरू श्री श्रीराम महाराजांच्या वर पण वीडियो करा।

  • @ajinkyashroutys.ajinkya8452

    @ajinkyashroutys.ajinkya8452

    2 жыл бұрын

    Nakkich maharaj karavun ghevot mala aawdel Jaishriram

  • @theisticsacrals5889

    @theisticsacrals5889

    2 жыл бұрын

    @@ajinkyashroutys.ajinkya8452 खरे आहे तुमच्याकडून ही सगळी कामे महाराज च करवून घेत आहेत बघा

  • @sudhirsutavani8040
    @sudhirsutavani8040 Жыл бұрын

    खुप सुंदर .

  • @madhavideshpande5827

    @madhavideshpande5827

    Жыл бұрын

    अजिंक्य अभीनंदन! आरती छान झाली आहै .खुपखुप शुभेच्छा!

  • @avtarrampal2257
    @avtarrampal225710 ай бұрын

    Jai shree Ram,full Arti be shown in this columns with thanks

  • @ajinkyashroutys.ajinkya8452

    @ajinkyashroutys.ajinkya8452

    9 ай бұрын

    Jaishriram sir definitely will try

  • @avtarrampal2257
    @avtarrampal225710 ай бұрын

    Sir,if you Know the Gur Parnali please share with thanks, Jai shree Ram.

  • @shubhangidani7618
    @shubhangidani76182 ай бұрын

    2:38

  • @mangalayadwadkar1058
    @mangalayadwadkar1058 Жыл бұрын

    जय श्रीराम🙏🙏

Келесі